Home > Blogs > Pulmonary Care > अस्थमा

अस्थमा

अस्थमा

अस्थमा ही शरीराची अशी एक स्थिती असते ज्यामध्ये श्वसननलिका सुजतात व अरुंद होतात आणि अतिरिक्त श्लेष्मा (म्युकस) तयार होतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. खोकला येतो व श्वास बाहेर सोडतांना शिट्टी सारखा आवाज येतो. काही व्यक्तींमध्ये अस्थमा हा एक छोटा अडथळा ठरतो,पण काहींना यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात ही एक मोठी समस्या बनते व काहींमध्ये जीवघेण्या अस्थमा अटॅकचा धोका बळावतो. अस्थमा पूर्णपणे बरा होऊ शकत नसला तरी याच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवता येते.

अस्थमा हा काळानुसार बदलत जातो,म्हणूनच डॉक्टरांशी नियमित संपर्कात राहून लक्षणांवर देखरेख आणि त्यानुसार उपचार हे गरजेचे आहे.

अस्थमाची लक्षणे ही प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकतात. अस्थमा अटॅक येण्याचा कालावधी पण वेगळा असू शकतो . लक्षणे सतत किंवा व्यायाम करतांना जाणवू शकतात. सर्वसाधारण आढळणार्‍या लक्षणांमध्ये श्वास घ्यायला त्रास होणे, छातीत दुखणे किंवा घट्ट जाणवणे, श्वास बाहेर सोडतांना शिट्टी सारखा आवाज येणे ( जे लहान मुलांमध्ये साधारणतः दिसून येते ), फ्लू ,सर्दी सारख्या संसर्गजन्य रोगांमुळे खोकला / श्वास सोडतांना येणारा आवाज अधिक तीव्र होणे यांचा समावेश आहे.

अस्थमा जर अधिक तीव्र होत असेल तर लक्षणे देखील वारंवार दिसायला लागतात व आपल्याला काळजीत टाकू शकतात. फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेची चाचणी करण्यासाठी उपकरणाचा वापर करतांना देखील श्वास घायला त्रास होत असल्यास तीव्रता वाढत आहे हे दिसून येते. कधी कधी इन्हेलर वारंवार वापरावा असे वाटणे देखील हे दर्शिवते. काही लोकांच्या बाबतीत काही परिस्थतीमध्ये अस्थमा अधिक तीव्र होत जातो. जसे की वातावरण कोरडे आणि थंड असतांना व्यायाम केल्यामुळे लक्षणे तीव्र होऊ शकतात. रसायन, धूळ, वायू ज्या कामकाजाच्या ठिकाणी आहेत, तिथे अस्थमा अधिक तीव्र होऊ शकतो.काही लोकांना परागकण यासारख्या हवेतील घटकांमुळे देखील अलर्जी होऊ शकते.

अस्थमाचा त्रास काही लोकांना का होतो याचे नेमके कारण माहित नसले तरी पर्यावरणीय व अनुवंशिक घटक एकत्रितपणे यासाठी कदाचित कारणीभूत असू शकतात.कुटुंबात कुणाला अस्थमाचा वैद्यकीय इतिहास असेल तर ही तुमच्यासाठी जोखीम ठरू शकतो.त्याशिवाय जोखमीच्या घटकांमध्ये धुम्रपान,वजन जास्त असणे,नाक वाहणे किंवा डोळ्यांना खाज येणे,त्वचेला खाज सुटणे यांसारखे इतर अ‍ॅलर्जीक स्थिती,कामकाजाच्या ठिकाणी रसायनांशी संपर्क,धूळ किंवा प्रदूषण यांचा समावेश आहे.वेळेवर लक्ष न दिल्यास यामध्ये गुंतागुंत होऊ शकते आणि याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो.मात्र योग्य वेळी उपचार घेतल्यास अल्प व दीर्घ कालावधींमधील संभाव्य गुंतागुंत आपण रोखू शकतो.

अस्थमाचे निदान करण्यासाठी डॉक्टर हे तपासणी करून तुमच्या लक्षणांच्या आधारावर चाचण्या सांगू शकतात.यामध्ये स्पायरोमेट्री,पीक फ्लो सारख्या चाचण्यांचा समावेश आहे,जे फुप्फुसाची कार्यक्षमता जाणून घेण्यास मदत करतात.त्याशिवाय छातीचा एक्स-रे अ‍ॅलर्जीसाठी त्वचा किंवा रक्ताची चाचणी इत्यादी देखील करण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात.अस्थमाच्या तीव्रतेनुसार एखाद्या व्यक्तीला असलेल्या रोगाचे वर्गीकरण केले जाते,त्यानुसार उपचार व औषधांची पुढची दिशा ठरते.एखाद्या व्यक्तीमधील अस्थमा कुठल्या घटकांमुळे अधिक तीव्र होतो,हे जाणून घेणे दीर्घकालीन उपाययोजनांसाठी महत्त्वाचे ठरते.व्यक्तीचे वय,लक्षणे,अस्थमा तीव्र होण्याची कारणे यांवर उपचार अवलंबून असतात.

Have queries or concern ?

    About Author

      Book Appointment

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1272" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222