Home > Blogs > Genetics > अनुवंशिकता,कर्करोग आणि जेनेटिक टेस्टींग

अनुवंशिकता,कर्करोग आणि जेनेटिक टेस्टींग

heredity-cancer-and-genetic-testing

कर्करोग हा एक जनुकीय आजार (जेनेटिक डिसीज) आहे. याचाच अर्थ,आपल्या पेशींचे कार्य (विशेष करून ज्या पध्दतीने ते वाढतात आणि विभागतात) नियंत्रित करणार्या जनुकांमध्ये काही विशिष्ट बदल हे कर्करोगास कारणीभूत ठरतात.जनुके हे आपल्या पेशींमध्ये बरेचसे काम करणारी प्रथिने तयार करण्याच्या सूचना देतात. या जनुकांमध्ये काही बदल झाले तर पेशींमध्ये होणार्या वाढींवर सामान्य नियंत्रण राहत नाही आणि परिणामी कर्करोग होतो. कर्करोगास कारणीभूत ठरणारे जनुकीय बदल हे आपल्या पालकांकडून येऊ शकतात.

विशेष करून जर हे बदल बीजांडे आणि शुक्राणूंसारख्या पुनरूत्पादक पेशींमध्ये असतील तर हे बदल बालकाच्या पेशींमध्ये आढळू शकतात. अशा प्रकारच्या अनुवंशिकतेने आलेल्या जनुकीय बदलांमुळे कारणीभूत ठरलेेले कर्करोगाचे प्रमाण सर्व कर्करोगांच्या 5 ते 10 टक्के इतके आहे. मात्र कुटुंबामध्ये वैद्यकीय इतिहास असेल तर याची जोखीम पाल्यांना आहे की नाही हे समजण्यासाठी जेनेटिक समुपदेशन व चाचण्या उपयोगी ठरत आहे.

अनुवांशिक कर्करोगाच्या जोखमीचे मूल्यांकन आणि कर्करोगाचा इतिहास असल्यास कुटुंबातील सदस्याला अनुवंशिकरित्या कर्करोगाची जोखीम असते. ज्या रूग्णांना कर्करोगाची त्यांना असलेली जोखीम माहित असते,त्यांना निदान,उपचार आणि वेळप्रसंगी प्रतिबंधात्मक शस्त्रक्रियांबाबत अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता येतात. ज्यामुळे कर्करोगाचा धोका आणि त्याचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिणाम कमी होऊ शकतो.

जेनेटिक कन्सल्टेशन शक्य होईल तितक्या लवकरात लवकर करावे,कारण :-

  • कर्करोग अनुवंशिक आहे की नाही हे जाणून घेता येते
  • कर्करोगाची वाढ,पुन्हा होणे,प्रसार किंवा भविष्यात एखादा नवीन किंवा वेगळ्या प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता याची जोखीम जाणून घेणे
  • लक्षित उपचार पध्दती ओळखण्यासाठी (ट्युमरच्या उतींची अनुवंशिक चाचणी करून)
  • नातेवाईकांना असलेली जोखीम समजून घेणे
  • जर कर्करोग अनुवंशिक नसेल/कुटुंबामध्ये वैद्यकीय इतिहास नसेल तर जेनेटिक कन्सल्टेशन केल्यास कर्करोगाबाबत असणारी जोखीम आणि तपासणी करता येणे शक्य होते – ट्यूमर टिश्यू जेनेटिक टेस्टींग
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही जेनेटिक टेस्टसाठी लक्षित उपचार पध्दती ओळखण्यासाठी ट्युमरच्या उतींची जेनेटिक चाचणी गरजेची आहे.त्याचबरोबर चाचणीच्या आधी व नंतर पात्र मेडिकल जेनेटिसिस्ट (वैद्यकीय अनुवंशशास्त्रज्ञ)

Have queries or concern ?

    कोणत्या टप्प्यात रूग्णाने जेनेटिक कन्सल्टेशनसाठी जावे ?

    अनुवंशिक समुपदेशन (जेनेटिक कौन्सिलिंग) हे कधीही करू शकतो मात्र, जेनेटिक कन्सल्टेशन हे उपचारादरम्यानच करणे आवश्यक आहे,उपचारानंतर नाही. जनुकीय चाचणीमुळे कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये कर्करोगाची जोखीम आहे की,नाही हे कळू शकते.अगदीच तातडीची गरज असल्याशिवाय किंवा चाचणीमुळे उपचारांवर परिणाम होणार असल्याशिवाय जेनेटिक कन्सल्टेशनबाबत कोणतीही घाई करू नये.याबाबतीत हे समजणे महत्त्वाचे आहे की,जनुकीय चाचण्या या नेहमीच्या रक्त चाचण्यांसारख्या नसतात.

    विविध पातळीवर,विविध प्रकारच्या चाचण्या असू शकतात.त्यापैकी नक्की कोणत्या चाचण्या करायच्या आहेत,या चाचण्या करण्यामागे हेतू काय,त्याने काय साध्य होणार आहे हे महत्त्वाचे असून प्रत्येक रूग्णाच्या आणि कुटुंबियांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे याबाबत सल्ला देणे महत्त्वाचे ठरते. एकदा चाचणी झाली की,भविष्यातील उपचाराबाबतची दिशा समजून सांगण्यासाठी समुपदेशन केले जाते.

      Book Appointment

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1238" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222