Home > Blogs > IVF > स्तनपान: सुदृढ आयुष्याचा पाया

स्तनपान: सुदृढ आयुष्याचा पाया

स्तनपान: सुदृढ आयुष्याचा पाया मातृत्वही स्त्रीत्वाची ओळख समजली जाते. स्त्रीमध्ये जन्मजात असलेल्या ममत्वाच्या भावनेला एक नवा आयाम मातृत्वामुळे मिळतो. स्तनपान ही मातृत्वामध्ये एक अत्यंत महत्वाची बाब आहे. बाळ मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आईच्या दुधाला अनन्यसाधारण महत्व आहे. स्तनपान म्हणजे आई आणि बाळाला जोडणारा दुवा आहे. त्यामुळे मातृत्वाच्या प्रवासात स्तनपानाला महत्व दिले जाते. आईचे दुध हा मुलासाठी पोषणाचा उत्तम स्त्रोत आहे. स्तनपान आई आणि मूल असे दोघांसाठी फायदेशीर आहे. जन्मानंतर पहिले सहा महिने तरी मुलाला केवळ आईचे दूधच दिले गेले पाहिजे. कारण आईचे दुध मुलाला विविध संक्रमण आणि अनेक आजारांपासून दूर ठेवते. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यांत मुलाला दिले गेलेले आईचे दुध त्याच्या आयुष्यभराच्या आरोग्यावर खोलवर परिणाम करत असते. मूल लहान असताना त्याला स्तनपानाचा फायदा तर होतोच,मात्र पुढील आयुष्यातही मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच अनेक असाध्य रोगांपासून दूर ठेवण्यासाठी स्तनपान महत्वाचे ठरते. स्तनपान करणे आईसाठी सुद्धा तितकेच फायदेशीर आहे जितके ते मुलासाठी असते. स्तनपानाने मातांमधील स्तन आणि अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

स्तनपान कधी सुरु करावे आईचे पहिले पिवळे दूध ज्याला कोलॉस्ट्रम म्हटले जाते त्याला बाळाचे प्रथम लसीकरण म्हणता येईल कारण ते इम्यूनो ग्लोबुलिन ने युक्त असते. जरी हे दूध कमी प्रमाणात असले तरीही यामध्ये अधिक प्रमाणात अँटीबॉडी,वाढीचे घटक आणि जीवनसत्त्वे उपलब्ध असतात म्हणूनच, बाळ जन्मल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांच्या आतच शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरु केले पाहिजे. जेवढ्या लवकर स्तनपान करण्यास आरंभ होईल तितके जास्त चांगले याचसह स्तनपान करताना बाळाचे तोंड योग्यरित्या स्तनाच्या संपर्कात असणे गरजेचे आहे ज्याद्वारे योग्य प्रमाणात बाळाला दूध मिळते आणि आईच्या स्तनाग्रास दुखापत होत नाही. स्तनपान लवकर का सुरु करावे बाळाचे शरीर जन्मानंतरच्या पहिल्या 30 ते 60 मिनिटांमध्ये सर्वात जास्त सक्रीय असते.त्यामुळे आईच्या दुधातील पोषणद्रव्ये बाळाच्या शरीराद्वारे चांगल्या प्रकारे शोषून घेतली जातात. तसेच स्तनपानाची सुरुवात लवकर केल्यामुळे स्तन सुजणे आणि दुखणे यांसारखे त्रास मातेला होत नाहीत आणि बाळंतपणानंतर होणारा रक्तस्रावही कमी होतो.स्तनपान किती काळ करावे.आईआणि मुलाला जितके दिवस स्तनपान करण्याची इच्छा वाटते तितके दिवस ते केलेपाहिजे. त्याकरिता वैद्यकीयदृष्ट्या कोणताही कालावधी ठरलेला नाही.

जागतिक आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार मुलाला कमीतकमी 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ स्तनपान केले गेले पाहिजे. ते मुलं आणिआई असे दोघांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. 2 वर्षापर्यंत मुलाला सगळे पोषण आईच्या दुधातून मिळत असते. त्यामुळे किमान 2 वर्ष मुलाला स्तनपान केले पाहिजे. स्तनपानानंतर स्तनातून दुध गळण्याची समस्या येत असेल तर काय करावे. हीकाही काळाकरिता उद्भवणारी अगदी सामान्य समस्या आहे. दुध गळत असल्यास हाताच्या कोपर्‍याच्या मदतीने स्तनाच्या बाहेरच्या बाजूने दाब द्यावा. असे केल्याने दुध बाहेर येणे थांबते. आई आजारी असेल तर तिला स्तनपान करता येऊ शकते का? नक्कीच करू शकते. काही आजारांचा बाळावर स्तनपानाद्वारे परिणाम होत नाही. आईला टायफॉईड, मलेरिया, क्षयरोग,कावीळ किंवा कुष्ठरोग यांसारखे आजार असेल तरी देखील स्तनपान बंद करू नये.पोषणाबरोबरच स्तनपानाचे बाळाला, आईला, कुटुंबाला तसेच समाजाला होणारे फायदे अनेक आहेत. स्तनपान हे निसर्गाने महिलेला दिलेले एकवरदान आहे. मातृत्वामध्ये स्तनपानाचे आरोग्याच्या दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीनेमहत्व खूप मोठे आहे.

बाळाला होणारे फायदेः *स्तनपान बाळाला अस्थमा आणि कानाचे इन्फेक्शन यांपासून दूर ठेवते. कारण स्तनपानाने बाळाच्या नाकात आणि घशामध्ये संरक्षक आवरण तयार करते. *आईचे दुध मुलाकरिता सहज पचण्याजोगे असते. त्यामुळे बाळाला पचनाचा त्रास होत नाही.उलट ते बाळाची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. *स्तनपानहा खर्च न करता सहज उपलब्ध होणारा आहार आहे. गाईच्या दुधामुळे काही मुलांनाअलर्जी होते. स्तनपान हा मुलाकरिता परिपूर्ण आणि पोषक आहार आहे. *आईच्या दुधाचा बाळाची बुद्धिमत्ता चांगली होण्यास मदत होतो तसेच दृष्टी सुधारण्यास फायदा होतो. आईशी शारीरिक तसेच भावनिक नाळ जुळून चांगले नाते तयार होण्यास मदतहोते. कारण त्यामध्ये चरबीयुक्त आम्लाचे (फॅटी अ‍ॅसिड) प्रमाण जास्त असते ज्यामुळे बाळाच्या मेंदूंचा चांगला विकास होण्यास मदत होते. आईला होणारे फायदेः*पीपीएच आणि अशक्तपणा कमी करते. *स्तनआणि अंडाशयाच्या कर्करोगापासून रक्षण करते *लठ्ठपणा प्रतिबंधित करते आणि शरीर सुडौल ठेवते. मुलाच्यासंपूर्ण आयुष्यात स्तनपानाचे स्थान महत्वाचे असते. कारण ते त्याच्या एकूण शारीरिकआणि बौद्धिक विकासात महत्वाची भूमिका बजावत असते. स्तनपान हा सुदृढ आयुष्याचा पाया आहे.

About Author

dr-supriya-puranik

Dr. Supriya Puranik

Infertility Expert
Contact: 8806252525
Email – ask@sahyadrihospitals.com

  Appointment Form
  For a quick response to all your queries, do call us.

  Patient Feedback

  Expert Doctors

  Emergency/Ambulance
  +91-88888 22222
  Emergency/Ambulance
  +91-88062 52525
  Call Now

  Generic selectors
  Exact matches only
  Search in title
  Search in content
  page
  post