Home > Blogs > Oncology > गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे काय?

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे काय?

Dr. Tushar Patil | Oncologist

breast-cancer-screening

सर्व्हिक्स हा अवयव गर्भाशयाच्या खाली स्थित असतो, जो कालांतराने स्त्रियांमध्ये अनेक बदल दर्शवितो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्तनाच्या कर्करोगानंतर सर्वात जास्त आढळणारा कर्करोग आहे. हा ग्रामीण भागात सर्वात सामान्य आहे आणि 45 ते 60 वयोगटातील महिलांमध्ये आढळतो.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाची कारणे कोणती?

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे प्रमुख कारण म्हणचे विषाणू संसर्ग,(ह्युमन पॅपिलोमाव्हायरस). या विषाणूच्या काही प्रजाती आहेत ज्यांमुळे कर्करोग होऊ शकतो. प्रथम हा विषाणू त्या अवयवावर हल्ला करतो,ज्याला सर्व्हिसायटिस म्हणतात.

ज्यामुळे गर्भाशय मुखामध्येे सूज होते. 90% स्त्रियांमध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर हा शरीरातून काढून टाकला जातो, परंतु काही स्त्रियांमध्ये याचा संसर्ग कायम राहतो ज्याला क्रॉनिक सर्व्हिसायटिस म्हणतात.अशा संसर्ग मुळे नंतर पुढे जाऊन 10 किंवा 15 वर्षांनंतर त्याचे कर्करोगात रूपांतर होऊ शकते. हे संसर्ग होण्याचे वेगवेगळे टप्पे आहेत.

या पूर्व-कर्करोेग टप्प्यात निदान व उपचार केल्यास कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो. हा कर्करोग 70% व्यक्तींमध्ये विषाणूमुळे होतो, परंतु 30% लोकांमध्ये त्याचे कारण अद्याप माहित नाही.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती ?

योनीतून असामान्य स्त्राव किंवा रक्तस्त्राव आणि ओटीपोटात वेदना होणे ही लक्षणे आहेत.बरेचदा महिला अशा प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.

Have queries or concern ?

  About Author

   Appointment Form

   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222