Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > Oncology > कर्करोगाची शक्यता कमी करण्यासाठी जीवनशैली नियंत्रणात ठेवा.

कर्करोगाची शक्यता कमी करण्यासाठी जीवनशैली नियंत्रणात ठेवा.

National Cancer Survivors Day

भारतात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून ही एक गंभीर बाब आहे. भारतात सर्वसामान्यपणे आढळणार्‍या कर्करोगांमध्ये फुफ्फुस,स्तन,गर्भाशय आणि कोलोरेक्टल (आतडे आणि गुदद्वार) यांचा समावेश आहे. तरूण पिढीमध्ये या प्रकारचे कर्करोग वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनुवंशिकतेमुळे होणार्‍या कर्करोगाचे प्रमाण फक्त 5 ते 10 टक्के असते,तर बहुतांश वेळा आपण स्वत:वर टाळता येण्याजोगी परिस्थिती ओढावून घेतो.

4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो.यावर्षीची संकल्पना क्लोज द केअर गॅप ही असून पुढील तीन वर्षे ही संकल्पना सुरू राहणार आहे.याचा केंद्रबिंदू उपचारामध्ये सर्वांसाठी समानता आणणे हा आहे.

आपली बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव,सक्रीय नसणे, खाण्याच्या चुकीच्या सवयी,स्थुलता,रसायनयुक्त भाज्या-फळे, हवेतील वाढते प्रदूषण, धुम्रपान,तंबाखू, अंमली पदार्थ ही कर्करोगासाठी जोखमीची घटके ठरत आहेत. या जोखमीच्या घटकांमध्ये वाढलेल्या मानसिक व शारीरिक तणावाचा देखील समावेश आहे. म्हणूनच कर्करोगासारख्या गंभीर आजाराला टाळायचे असेल तर जीवनशैली नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

जीवनशैलीशी निगडीत कर्करोग हे टाळण्याजोगे असतात.म्हणूनच वेळीच या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा.चांगली जीवनशैली अंगीकारली तर कर्करोगाशिवाय इतर आजारांना देखील आपण दूर ठेऊ शकतो.

काही दशकांपूर्वी कर्करोग होणे ही एक घाबरवणारी स्थिती असायची.त्यावेळेस भारतात उपचार देखील तेवढे अद्ययावत नव्हते,मात्र आता विविध तज्ञ,अद्ययावत उपचार सुविधा व आधुनिक उपकरणे यामुळे आपल्या देशात कर्करोग उपचाराची स्थिती चांगल्या प्रकारे सुधारली आहे.

कर्करोगाचे उपचार करताना रेडिएशन आँकोलॉजिस्ट,सर्जिकल आँकोलॉजिस्ट व मेडिकल आँकोलॉजिस्ट अशी तज्ञांची टीम एकत्ररित्या निर्णय घेऊन उपचाराची दिशा ठरवितात. त्यामुळे रूग्णाला तपासण्या,बायोप्सी,शस्त्रक्रिया,केमोथेरपी,रेडिएशनबाबत योग्य मार्गदर्शन मिळते. आधुनिक उपकरणांमुळे व उपचारपध्दतींमुळे कमीत कमी दुष्परिणाम होतात आणि रूग्णासाठी उपचार सुसह्य होतात.

हे लक्षात ठेवले पाहिजे की,कर्करोग हा एका दिवसात होत नाही. कर्करोग हा कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो आणि योग्य वेळेस निदान न झाल्यास जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे लवकर निदान झाले तर कर्करोग बरा होऊ शकतो.कर्करोगाला न घाबरता सामोरे जाऊन दृढ निश्‍चयाने त्यावर मात केली पाहिजे.

Have queries or concern ?

    About Author

    dr-supriya-puranik

    डॉ.शोना नाग

    वरिष्ठ कर्करोग तज्ञ व आँकोलॉजिस्ट विभागाच्या संचालिका,सह्याद्रि हॉस्पिटल्स
    Contact: +91 88888 22222
    Email – [email protected]

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222