Home > Blogs > Opthlamology > Diabetic Retinopathy

Diabetic Retinopathy

संपूर्ण जगात 40 कोटी पेक्षा जास्त लोकं मधुमेह(डायबिटीज़ मेलिटस)च्या आजाराने ग्रस्त आहेत. त्याच्यातले जवळपास 8 कोटी रुग्ण भारतात आहेत. गेल्या 40 वर्षात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यांच्यातल्या जवळपास 30 टक्के लोकांना मधुमेहामुळे डोळ्याच्या पडद्यावर दुष्परिणाम (डायबेटिक रेटिनोपथी- डी आर) असतो.

डीआर असण्याची महत्वाची कारणं म्हणजे

  • वाढलेली शुगर
  • खूप वर्षांपासून असलेला मधुमेहाचा आजार
  • वाढलेली HbA1C – एचबीएवनसी (ही रक्त तपासणी मागच्या 3 महिन्यात वाढलेल्या शुगरची रिपोर्ट असते)
  • उच्च रक्तचाप(वाढलेला ब्लड प्रेशर – हाइपरटेन्शन )
  • डायबेटिक नेफ्रोपथी ( मधुमेहामुळे किडनीवर दुष्परिणाम)
  • वाढलेलं कोलेस्ट्राॅल ( रक्तातलं तूपामुळे वाढलेलं चिकटपण)

पण सर्वात महत्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे डोळ्याच्या आजाराकडे दुर्लक्ष करणे – अर्थात डायबेटोलाॅजिस्टने सांगितल्यावरही वेळ राहता डोळ्याच्या (पडद्याच्या) डाॅक्टरांकडे तपासणी व उपचारासाठी न जाणे.

डीआर मध्ये मुख्य2 प्रकाराचे आजार असतात –

  1. पडद्यावर अनावश्यक रक्ताच्या शिरा निर्माण होणे- प्राॅलिफरेटिव डायबेटिक रेटिनोपथी- पी डी आर –
    या आजारामध्ये पडद्यासमोर रक्त येतो- विट्रिअस हीमरेज (वी एच) किंवा पडदा जागेवरून निसटतो – ट्रॅक्शनल रेटिना डिटॅचमेंट (टी आर डी)
    या आजारांमध्ये अचानक नजर कमी होते आणि पडद्याच्या आॅपरेशनची गरज पडू शकते. उपचार न केल्यास आयुष्यभरासाठी अंधत्व होऊ शकतो. लवकर उपचार केल्यास फक्त रेटिना लेज़र करून डोळ्यांना आणि नजरेला सुरक्षित करु शकतो.
  2. पडद्याच्या मधल्या भागावर सूज येणे – डायबेटिक मॅकुलर एडीमा (डी एम ई ) – या आजारामध्ये नजर धुरकट होते आणि लांबचं कमी दिसायला लागतं. या आजारात सूज कमी करण्यासाठी आणि नजर वाढवण्यासाठी डोळ्यात एकापेक्षा जास्त इंजेक्शन लागू शकतात. उशीर केल्यास धुरकटपणा आयुष्यभरासाठी राहू शकतो.

मधुमेहामुळे होणार्‍या पडद्याच्या आजारांपासून जगातल्या सगळ्या लोकांनी स्वतःला वाचवावे आणि आजार असल्यास वेळेवर उपचार करून अंधत्वापासून स्वतःला वाचवावे हीच आमची आपणांस विनंती आणि देवाला प्रार्थना.

Have queries or concern ?

    About Author

    dr-supriya-puranik

    Dr. Vishvesh Agarwal

    Consultant Opthalmology
    Contact: +91 88888 22222
    Email – ask@sahyadrihospitals.com

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222