Home > Blogs > Cardiac Surgery > हृदयाचा ठोका चुकून देऊ नका

हृदयाचा ठोका चुकून देऊ नका

हृदयाचा ठोका चुकून देऊ नका

हृदय हे आपल्या शरीरातील सर्वांत महत्वाचा अवयव असून आपल्या शरीराला प्राणवायू आणि पोषक घटकांसह रक्तपुरवठा करते.आपले हृदय प्रत्येक सेकंदाला प्रत्येक घटकाला काम करत असते आणि याचे चांगले आरोग्य मनुष्याच्या जीवन आणि मृत्युमधील फरक असू शकतो.

हृदयामध्ये चार कप्पे असतात.दोन वरच्या बाजूस ज्यांना राईट व लेफ्ट आर्टरिया म्हणतात आणि खालील दोन बाजू असलेले कप्पे ज्याला राईट व लेफ्ट व्हेंट्रिकल असे म्हणतात.आरोग्यदायी हृदयाचे महत्त्व याबाबत जागृती वाढत असली तरी जगभरात दरवर्षी अनेक लोकांना हृदयविकार होतो अणि हाच हृदयविकार जगातील मृत्युच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.

हृदय विकार होण्याची कारणे ही वेगवेगळी असू शकतात.त्यामध्ये हृदयात जन्मजात असलेले दोष,कार्डिओमायोपॅथी म्हणून संबोधले जाणार्या कारणांमध्ये उच्च रक्तदाब,संसर्ग,कर्करोग,स्वयंप्रतिकारक रोग,हृदयविकाराचा झटका,आघात आणि अ‍ॅरिथनिया,हृदयाच्या झडपांचा विकार यांचा समावेश आहे.

 

जोखीम वाढवणारे घटक

हृदयविकाराला कारणीभूत ठरणारे अनेक जोखमीचे घटक आहेत.जोखीम वाढविणारी जीवनशैली जसे की,मद्यपान,धुम्रपान,वर्जित पदार्थांचे सेवन यामुळे हृदयविकार वाढतो.शारीरिक हालचालींची अभाव असलेली जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे असलेला लठ्ठपणा हा हृदयविकार्‍याच्या झटक्यापासून ते हृदय निकामी होणे यासारख्या विकारांची जोखीम वाढवतेे.

हृदयविकाराची जोखीम वाढण्याची अनेक कारणे असतात.ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात,त्यामध्ये कुटुंबात त्याबाबत असलेला वैद्यकीय इतिहास (हृदयाचा झटका,मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी),वाढते वय यांचा समावेश आहे.मात्र ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत,त्यामध्ये जीवनशैली हा एक सर्वांत महत्त्वाचा घटक आहे,ज्यावर आपण नियंत्रण ठेऊ शकतो.

लक्षणे

हृदयविकारांच्या प्रमुख लक्षणांमध्ये छातीत दुखणे,पायात सूज,श्‍वास घेताना त्रास होणे,थकवा वाटणे,धडधड वाढणे,छाती जड वाटणे इत्यादींचा समावेश आहे.

 

निदान

हृदयविकार आहे की नाही याच्या निदानाकरिता डॉक्टर वैद्यकीय इतिहास, रक्तदाब व हृदयाचे ठोके मोजतात.त्याशिवाय रक्ताच्या चाचण्या केल्या जाऊ शकतात. गरज भासल्यास रूग्णाच्या वैद्यकीय स्थितीनुसार ईसीजी,एक्स रे,इकोकार्डिओग्राफी,स्ट्रेस टेस्ट,कार्डिअ‍ॅक सीटी,कार्डिअ‍ॅक एमआरआय,थॅलियम स्कॅन किंवा कोरोनरी अँजिओग्राफीचा सल्ला देऊ शकतात,ज्यामुळे हृदयाच्या प्रतिमा आणि हृदयामध्ये नेमके काय चालू आहे हे कळू शकते.

उपचार

अनेक प्रकारचे हृदय विकार असल्याने उपचार हे वैद्यकीय स्थितीनुसार केले जातात.उदा.हृदय निकामी झाल्यास त्याचे कारण शोधून रूग्णांवर औषधोपचार केले जातात.औषधांबरोबरच हृदयाचे कार्य सुधारण्यासाठी पेसमेकर सारखी उपकरणे रोपित केली जाऊ शकतात आणि या सर्वाचाच परिणाम होणार नसेल तर हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला देखील दिला जाऊ शकतो.त्याचप्रमाणे हृदयाच्या झडपांच्या विकारामध्ये शस्त्रक्रिया करून झडपांमधील बिघाड दुरूस्त केला जातो किंवा नवीन झडपा बसविल्या जातात.हृदयातील रक्तवाहिन्यांच्या विकारामध्ये (हृदयांच्या वाहिन्यामध्ये अडथळे),यावर उपचार म्हणून मेडिकेटेड स्टेंटस वापरून अँजिओप्लास्टी आणि कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया हे पर्याय असतात.

Have queries or concern ?

    हृदय प्रत्यारोपणाची गरज कधी

    जेव्हा इतर सर्व उपचार करूनही फरक पडत नाही आणि जेव्हा रूग्ण हृदय निकामी होण्याच्या अंतिम टप्प्यात असतात तेव्हा हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जाऊ शकतो.अशा रूग्णांचे हृदयाचे कार्य जे 10 ते 20 टक्केच असते,त्यांची वर्षभर जिवंत राहण्याची शक्यता फक्त 5 टक्के असते.हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये रूग्णाचे हृदय काढून मेंदूमृत झालेल्या दात्याचे आरोग्यदायी हृदय प्रत्यारोपित केले जाते.हृदय प्रत्यारोपणानंतर वर्षभर जगण्याची शक्यता ही 95 टक्क्यांपेक्षा जास्त असते आणि औषधोपचारांबाबत (इम्युनो सप्रेसंट मेडिकेशन) ची शिस्त पाळल्यास आणि रूग्णावर चांगली देखरेख झाल्यास दीर्घकाळ देखील चांगला फायदा होऊ शकतो.

    हृदयविकार टाळण्यासाठी ज्यांना जन्मजात हृदयाचा विकार आहे,त्यांनी नियमितपणे आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहावे.मात्र ज्यांना कुठलाही आजार नाही,त्यांनी आपली जीवनशैली चांगली ठेवली तर हृदयविकार आपण टाळू शकतो.नियमित व्यायाम,योग्य आहार,धुम्रपान व तंबाखुजन्य पदार्थ टाळणे याचे महत्त्व सर्वांनाच माहित आहे.मात्र याकडे आपण पुरेसे लक्ष देत नाही.शारीरिक आरोग्याबाबत मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे.त्याशिवाय जसे वय वाढत जाईल तसे मधुमेह,उच्च रक्तदाब,वजन,कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराचा धोका बळावणार्या जोखमीच्या घटकांवर वेळोवेळी देखरेख करणे गरजेचे आहे.

    एकंदरच आपले हृदय हे शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे.आपल्या शरीराला आपण कॉम्प्युटर किंवा महत्त्वाचे उपकरण समजले तर हृदय हे विद्युत पुरवठादारासारखे आहे.हृदयाशिवाय हे उपकरण चालूच शकत नाही.म्हणूनच चांगले हृदय असण्याकडे लक्ष द्या आणि हृदयाचा ठोका चुकवू नका.

    About Author

    dr-supriya-puranik

    Dr. Manoj Durairaj

    Cardio-Thoracic Surgeon/ Heart Transplant Surgeon
    Contact: +91 88888 22222
    Email – ask@sahyadrihospitals.com

      Appointment Form




      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Generic selectors
      Exact matches only
      Search in title
      Search in content
      page
      post
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222