Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > Gastroenterology > हेपॅटायटिस – पावसाळ्यात ​घ्यावयाची काळजी

हेपॅटायटिस – पावसाळ्यात ​घ्यावयाची काळजी

पावसाळ्यामध्ये दूषित पाणी आणि हवामानातील बदल यांमुळे अनेक व्याधींचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. हेपॅटायटिस (कावीळ) हे त्यापैकीच एक आहे. मद्यसेवन,आम्ली पदार्थ,चयापचयाचे आजार यांमुळे प्रामुख्याने जरी कावीळ होत असली तरी पावसाळ्यामध्ये बाहेर रस्त्यावरच्या स्टॉल्सवर खाणे कटाक्षाने टाळावे,कारण दूषित पाणी आपल्या शरीरात गेल्यावर हेपॅटायटिस सारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. वैश्विक पातळीवर हेपॅटायटिस विषाणू संक्रमण ही एक लक्षणीय आरोग्य समस्या आहे. यकृताला सूज किंवा दाह झाल्यास त्याची कित्येक कार्ये प्रभावित होतात. हेपॅटायटिस चे दोन प्रकार आहेत.

तीव्र हेपॅटायटिस आणि घातक हेपॅटायटिस रुग्णांमध्ये आढळून येणार्‍या लक्षणांवरून त्याचे स्वरूप नि​​श्चित होते.तीव्र हेपॅटायटिसच्या लक्षणांमध्ये भूक न लागणे, मळमळ,थकवा,उलटी,पोटदुखी हे त्रास होतात. जर उपचार न केल्यास हेपॅटायटिस गुंतागुंतीचा होऊ शकतो. हेपॅटायटिस वर उपचार न केल्यास यकृताचा कर्करोग व लिव्हर सिरॉसिस उद्भवू शकतात. हेपॅटायटिस हे ए,बी,सी,डी,ई या पाच प्रकारात विभागले गेले आहे. हेपॅटायटिस ए हे दूषित अन्न-पाणी शरीरात गेल्यावर किंवा याचा संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्कात आल्यावर होऊ शकतो. हेपॅटायटिस बी व सी हे सामान्यत: आढळतात व याचा प्रसार इंजेक्शनच्या जुन्या सुया वापरल्याने,दाढी करताना रेझर इतरांबरोबर शेअर केल्याने,संसर्ग झालेल्या व्यक्तीशी असुरक्षित शारीरिक संबंध यांमुळे उद्भवू शकतात. हेपॅटायटिस बी हा त्या मानाने दुर्मिळ आजार असून तो हेपॅटायटिस बी संसर्ग झाल्यावर त्याच्या जोडीने उद्भवू शकतो.यकृताला होणार्‍या सर्वांत गंभीर आजारांपैकी एक आहे.

हेपॅटायटिस ई हा दूषित पाण्यामुळे होणारा असून स्वच्छता कमी असणार्‍या परिसरात आढळून येतो. त्यामुळे विशेष करून पावसाळ्यात हेपॅटायटिसबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे.त्वचा पिवळी पडणे,डोळे पांढरे पडणे,भूक न लागणे,उलट्या होणे,थकवा येणे,पोटात दुखणे व अतिसार ही हेपॅटायटिसची लक्षणे असू शकतात.व्हायरल हेपॅटायटिस हा भारतात गंभीर आजार म्हणून समोर येत असून आपण याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे.

अशा आजारांचा प्रतिबंध हा नक्की होऊ शकतो.स्वत:ची स्वच्छता,आपल्या परिसरातील स्वच्छता,स्वच्छ पाणी (याबाबत शंका असल्यास पाणी उकळून पिणे),शक्यतो शिजलेले अन्न खाणे,रस्त्यावर अस्वच्छ ठिकाणी खाणे टाळणे,वेळोवेळी हात स्वच्छ धुणे,बाहेर ज्युस किंवा इतर पेय घेताना बर्फ टाळणे इत्यादी गोष्टी आपण नक्की करू शकतो.विशेष करून लहान मुले,आजारी व्यक्ती,गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी पावसाळ्यात या सर्व गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

Have queries or concern ?

    About Author

    dr-supriya-puranik

    Dr. Bipin Vibhute

    Liver & Multi-organ Transplant & Hepatobiliary Surgeon
    Contact: +91 88888 22222
    Email – [email protected]

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222