SAHYADRI HOSPITAL
blog post

वंध्यत्व आणि आयव्हीएफ तंत्रज्ञान

By Dr. Supriya Puranik

वंध्यत्वाबद्दल असलेले ज्ञान मर्यादित असण्यासह याबाबत तितकेच गैरसमज देखील आहेत. जगभरातील बर्‍याच भागात वंध्यत्वाबद्दल अपुरे ज्ञान आहे. सर्वांत मोठा गैरसमज म्हणजे ही समस्या फक्त स्त्रियांशी निगडीत आहे.आपण एक लक्षात घेतले पाहिजे की,बाळ होण्यासाठी स्त्री आणि पुरूष हे दोघेही आवश्यक आहेत. संसारवेलीवर एक फूल उमलणे हा आयुष्यातील अतिशय मोठा टप्पा असतो,पण काही जोडप्यांमध्ये वंधत्वाची समस्या(problem of infertility) हा आनंद हिरावून घेतो.आयव्हीएफ (In Vitro Fertilization) या तंत्रज्ञानाने अपत्यहीन जोडप्यांचे जीवन सुखमय केलं आहे.

आपण निश्चिातच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मागे आहोत.जनजागृतीच्या माध्यमातून तंत्रज्ञान हे जनमानसापर्यंत पूर्ण पोहचणे अतिशय गरजेचे आहे. भारतातील ग्रामीण भागात अजूनही तंत्रज्ञान पोहचू शकलेले नाही. त्यामुळे या नागरिकांपर्यंत अद्ययावत सुविधा पोहचू शकत नाही. आधुनिक काळात जीवनशैलीमधील बदलांमुळे वंध्यत्वाच्या समस्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे,त्यामध्ये धकाधकीचे जीवन,दूषित वातावरण,चुकीच्या आहारपध्दती,व्यसने याव्यतिरिक्त व्यायामाचा अभाव,उशिरा झालेले लग्न,अपत्यप्राप्तीसाठी उशिरा केलेले प्रयत्न,पीसीओडीची समस्या(PCOD problems) ही मुख्य कारणे आहेत. वाढत्या वयाबरोबर स्त्रियांच्या गर्भाशयात काही बदल घडून येतात. म्हणजे फायब्रॉईडसारख्या गाठी किंवा स्त्रीयांच्या स्त्रीबीजाचा दर्जा खालावला जातो. वंध्यत्वाच्या समस्येचे प्रमाण स्त्रियांइतकेच पुरूषांमध्येही आहे. कामाचा ताण,स्पर्धात्मक कामाचे स्वरूप,अनेकविध व्यसने,व्यायामाचा अभाव,पुरेशी विश्रांती नाही,चुकीचा आहार यामुळे पुरूषांच्या वंधत्वाचे(men infertility) प्रमाण वाढत चालले आहे.

वंध्यत्वाची कारणांमध्ये(Causes of infertility) नियमित स्त्री बीज तयार न होता किंवा स्त्री बीज प्रकियेत अडथळा निर्माण होणे,गर्भनलिका बंद असणे,गर्भनलिकेची कार्यक्षमता कमी होणे,पुरूषांमध्येही वंध्यत्वाचे(infertility in males ) कारण म्हणजे शुक्राणूंची संख्या किंवा हालचाल तसेच रचनेमध्ये बिघाड असणे यांचा समावेश आहे.

वर्षभरात अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न केल्यानंतर देखील जोडप्याला बाळ होऊ शकत नसेल तर अशा परिस्थितीला वंध्यत्व(infertility) म्हणतात. अशांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.पण तरी सुध्दा स्त्रीचे साधारण वय 35 पेक्षा अधिक असेल, तिच्या पोटाच्या काही शस्त्रक्रिया झाली असेल,तिची मासिक पाळी ही अनियमित असेल किंवा तिच्या जोडीदाराच्या शुक्राणूंची संख्या कमी-जास्त असेल,हालचाल कमी असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वंध्यत्वाची उपचाराची(treatment of infertility) सुरूवातच तपासण्यांनी होते. स्त्रीचे शरीर गर्भधारणेसाठी योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी स्त्रीयांच्या रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात , त्याचप्रमाणे तिच्या शरीरात हार्मोन्सचे प्रमाण योग्य आहे की नाही,यासाठी हार्मोन्सची चाचणी करावी लागते.स्त्रीयांची रक्त तपासणी झाली की,पुरूषांच्या वीर्याची(sperm of the men) तपासणी केली जाते. वीर्यामध्ये असलेल्या शुक्राणूंची संख्या,हालचाल , रचना , डीएनए फ्रॅगमेंटेशन इंटेक्स या सर्वांची तपासणी करावी लागते. या चाचण्यांनंतर सर्वांत महत्त्वाचा अवयव जो,गर्भधारणेसाठी(pregnancy) अतिशय महत्वाचा असतो तो म्हणजे गर्भनलिका(fallopian tube ). या गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचे मिलन होत असते. जर या गर्भनलिका बंद असतील तर नैसर्गिक गर्भधारणा हे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे गर्भनलिकेची तपासणी गर्भाशयाच्या एक्स रे किंवा गर्भनलिकाचा एक्स रे काढून करण्यात येते. गर्भनलिकेची तपासणी साधारणत: पाळीच्या 7 व्या किंवा 8 व्या दिवशी केली जाते.पाळीच्या 11 व्या दिवसापासून स्त्रीबीज कधी तयार होत आहे,त्याची वाढ कशी होत आहे,त्याचा आकार,त्याचा योग्य आकार होतोय की नाही,याचे निरीक्षण केले जाते. त्याचबरोबर गर्भ रूजण्यासाठी आतमध्ये एंडोमेट्रियम अस्तर व्यवस्थित निर्माण होते की नाही,याचे देखील निरीक्षण करावे लागते. या तपासण्यानंतर 15 दिवसांत समजते की,त्या जोडप्यामध्ये वंध्यत्वाचे नेमके कारण काय आहे.

पण कित्येक वेळेला सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत,कुठल्याही तपासणीमध्ये कोणतीच समस्या नाही,असे असल्यास मायक्रोस्कोपिक तंत्रज्ञानाच्या(microscopic technology) आधारे म्हणजेच अंडाशयाच्या बाहेरील कवच खूप टणक असेल किंवा शुक्रांणूंची अॅpक्रोसीमल कॅप व्यवस्थित आहे की,गर्भनलिकांच्या आतील रचनांबद्दल निरीक्षण करणे गरजेचे असते.

टेस्ट ट्युब बेबीद्वारे(test tube baby) जन्माला येणारे मूल हे नैसर्गिक पध्दतीने जन्माला आलेल्या बाळासारखेच सामान्य,सशक्त,निरोगी असते.या तंत्रज्ञानामध्ये आपण स्त्रीयांची अंडी बाहेर काढून घेतो ,पुरूषांचे शुक्राणू बाहेर काढतो,त्यांचे फलन आपण करतो.आयव्हीएफमध्ये(IVF) होणारे मूल हे त्या जोडप्याचेच असते. आयव्हीएफ प्रक्रिया घेणार्याा स्त्रीला इंजेक्शन्स देऊन तिच्या शरीरात अंडी तयार केली जातात.ती अंडी योग्य आकाराला पोहचली की बाहेर काढावी लागतात.बाहेर काढल्यानंतर लॅबमध्ये स्त्रीच्या जोडीदाराचे शुक्राणू घेण्यात येतात. ते शुक्राणू धुवून त्यांचे मिलन हे अंड्याबरोबर केले जाते आणि तयार होणारा गर्भ स्त्री मध्ये सोडला जातो. आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान(IVF procedure ) 10 ते 12 दिवस इंजेक्शन्स घ्यावी लागतात.स्त्रीची अंडी जेव्हा बाहेर काढतात,त्याला ओव्हम पिकअप प्रक्रिया म्हटले जातेे. रोपण करायची प्रक्रिया वेदनाविरहीत प्रक्रिया आहे. यासाठी हॉस्पिटलमध्ये काही तास विश्रांती घेणे गरजेचे असते. एकदा गर्भ रूजला की,त्यापुढील सर्व प्रक्रिया ही नैसर्गिक असते. एकदा रोपण झाल्यानंतर, उर्वरित गर्भधारणा अत्यंत सामान्य असते. त्यामुळे पूर्ण विश्रांतीची आवश्यकता भासेलच असे नाही.

आयव्हीएफ प्रक्रिया करणार्या 40 ते 45 टक्के जोडप्यांना पहिल्या प्रयत्नात अपत्यप्राप्ती(miscarriages) होते. तर काहींना त्यानंतरही प्रयत्न करावे लागतात. जर पहिलाच प्रयत्न अयशस्वी झाला तर अनेक जोडपे सामान्यत: आशा गमावतात. ते डॉक्टर बदलण्याचा पर्याय निवडतात आणि पुन्हा नव्याने सुरूवात करतात. मात्र मागील डॉक्टरांनी केलेला अभ्यास वाया जातो. अंड्यांची गुणवत्ता, शुक्राणूंची गुणवत्ता , एंडोमेट्रियल अस्तर, गर्भाशयातील रक्तपुरवठा यासारख्या अनेक कारणांमुळे ही प्रक्रिया अयशस्वी ठरू शकते.शक्यतो आयव्हीएफ प्रक्रियेच्या सायकलमध्ये अंतर असू नये.

Blog Admin

By Dr. Supriya Puranik
(OBGY & Infertility Consultant) at Sahyadri Speciality Hospital Nagar Road, Pune
Contact: 8806252525 Email - ask@sahyadrihospitals.com