Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > इन्फ्लुएंझा किंवा फ्लू म्हणजे काय ?

इन्फ्लुएंझा किंवा फ्लू म्हणजे काय ?

prevent-parkinsons-disease
इन्फ्लुएंझा हा विशिष्ट हंगामात बळावणारा संसर्गजन्य आजार असून पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जास्त दिसून येतो. इन्फ्लूएंझा विषाणूचे ए,बी,सी असे तीन प्रकार आहेत. इन्फ्लुएंझाच्या ए प्रकारामध्ये स्वाइन फ्लूचा समावेश आहे. स्वाईन फ्ल्यू इन्फ्लुएंझा विषाणूंमुळे मुलांमध्ये खोकला आणि तापाची समस्या सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. मात्र याला घाबरण्याची गरज नाही. यावर लवकर निदान आणि उपचार केल्यास मुले लवकरात लवकर बरे होऊ शकतात. स्वाईन फ्ल्यूचे निदान झालेल्या बहुतांश मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत नाही. मात्र यावर वेळीच लक्ष न दिल्यास त्याला न्युमोनिया होण्याचा धोका असू शकतो.

मुलांना लक्षणे असल्यास पालकांनी काय करावे ?

खोकला, सर्दी आणि जास्त ताप येत असेल आणि तो कमी होत नसेल तर घरच्या घरी औषधे घेऊन उपचार करून नका. लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटा, जेणेकरून त्यावर लवकर उपचार सुरू करता येतील.हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की प्रत्येक इन्फ्लूएंझा हा स्वाइन फ्लू नसतो.सामान्य इन्फ्लूएंझा देखील असतो. सामान्य इन्फ्लूएंझा हा फ्ल्यू सारखाच असतो

इन्फ्लूएन्झा झाल्यावर काय करावे?

तुमचे मूल आजारी असल्यास, त्याला शाळेत पाठवू नका,कारण त्यामुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो. तापाची लक्षणे वाढत असल्याचे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.जर मुल 5 वर्षांपेक्षा मोठे असेल तर त्याला मास्क लावण्यास सांगा.नियमितपणे हात धुणे गरजेचे आहे.मुलांचा आहार सकस असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.इन्फ्लूएन्झा हा कोविड सारखा श्वसनाचा विषाणू आहे मात्र तितका गंभीर नाही. काही मुलांमध्ये सर्दी-खोकला ताप गेल्यानंतरही बरेच दिवस राहताना दिसत आहे.औषधोपचार सुरू असल्यास सर्दी-खोकला आपोआप कमी होत जातो.म्हणूनच वेळेवर उपचार घ्यावे.

Have queries or concern ?

    About Author

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222