Home > Blogs > Liver Transplant > Questions to Ask About the Liver (Marathi)

Questions to Ask About the Liver (Marathi)

लिव्हर सिर्‍हॉसिसची लक्षणे कोणती?

रोजच्या जीवनासाठी आपले शरीर यकृताच्या केवळ 30 टक्के क्षमतेचाच वापर करते. उर्वरित 70 टक्के क्षमता नेहमी अतिरिक्त असते आणि अडीनडीच्या वेळी शरीर ती वापरते. त्यामुळे यकृत जेव्हा 60-70 टक्के खराब होते तेव्हाच त्याची पहिली लक्षणे दिसू लागतात. अशक्तपणा व थकवा हे यकृत खराब होण्याचे पहिले लक्षण असू शकते.

दारूचे व्यसन असणार्‍यांमध्येही ताजेतवाने न वाटणे, कामात लक्ष न लागणे, रात्री झोप न येणे या तक्रारी प्रामुख्याने दिसतात. यावर उपाय म्हणून अनेकदा ही मंडळी दारू सेवनाचे प्रमाण वाढवतात; पण त्यामुळे यकृताची स्थिती बिघडत जाते. त्यानंतर पायावर सूज येणे, पोट फुगणे, पोटात पाणी होणे, वजन कमी होणे, आणखी पुढच्या टप्प्यात स्नायू सैल पडणे, त्वचा कोरडी व काळसर पडणे, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात. रक्ताच्या उलट्या होणे, मूत्रपिंडावर ताण येणे, फुप्फुसात पाणी होणे, मेंदूच्या गोंधळलेल्या अवस्थेपासून कोमा’पर्यंतही लिव्हर सिर्‍हॉसिसच्या रुग्णांची लक्षणे जाऊ शकतात.

यकृताच्या कार्यक्षमतेची चाचणी म्हणजे काय ?

कोणताही मोठा आजार उद्भवल्यानंतर यकृत योग्य प्रकारे काम करीत आहे किंवा नाही हे शोधून काढण्यासाठी यकृत कार्यक्षमता चाचणी केली जाते. या चाचणीला लिव्हर फंक्शन टेस्ट (एलएफटी) असे म्हणतात. यामध्ये टोटल बिलीरुबिन,एएसटी, एएलटी, जीजीटी आणि टोटल प्रोटिन अशा प्रकारच्या अनेक चाचण्यांचा समावेश असतो. अतिथकवा, सतत उलट्या होणे, पोटात वेदना होणे,पायांवर सूज येणे,पोटात पाणी होणे,वेगाने वजन वाढणे किंवा कमी होणे,डोळ्यांचा आणि लघवीचा रंग पिवळसर होणे ही लक्षणे दिसल्यास यकृत कार्यक्षमता चाचणी करणे जरूरी आहे.

लिव्हर सिर्‍हॉसिसकरिता प्रतिबंध कसा करावा?

आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणे हाच लिव्हर सिर्‍हॉसिस होऊ नये यासाठीचा उत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. ज्यांना दारू पिण्याची सवय आहे, त्यांनी कुठे थांबावे याचा वेळीच विचार करणे गरजेचे आहे. मद्यपी व्यक्तींनी वेळोवेळी यकृतासाठीच्या तपासण्या करणे व त्यांनी यकृत आणखी खराब होणे टाळण्यासाठी दारूचे सेवन थांबवून जीवनशैलीत सकारात्मक बदल करावे. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदललेल्या जीवनशैलीत चाळीस वर्षांवरील व्यक्तींनी पन्नास वर्षांचे होईपर्यंत प्रत्येक तीन वर्षांनी प्रतिबंधक तपासणी करणे, तर पन्नास वर्षांनंतर प्रतिवर्षी तपासणी करून घेणे योग्य ठरेल. यात काही रक्तचाचण्या व यकृताच्या अल्ट्रासाऊंड चाचणीचा समावेश होतो.

निरोगी यकृतासाठी कोणत्या प्रकारच्या आहाराचे सेवन करावे ?

आपले यकृत निरोगी ठेवण्यासाठी परिपूर्ण आहार घ्यावा.ज्यामध्ये फायबरयुक्त आहारामध्ये ताजी फळे,भाज्या,भात आणि तृणधान्ये ,रेड मीट वगळता सर्व प्रकाराचे मांसाहारी पदार्थ खाणे योग्य,दुग्धजन्य पदार्थांमध्ये कमी चरबीयुक्त दूध आणि थोडेसे चीज यांचा समावेश असावा. व्हेजिटेबल ऑईल,शेंगदाणे आणि मासे मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकतात. दररोज भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.तसेच आहारामध्ये कॅलरीयुक्त पदार्थ,सॅच्युरेटेड फॅटस,रिफाईंड कार्बोहायड्रेटस आणि साखर यांचे प्रमाण कमी असावे.

Have queries or concern ?

    About Author

    dr-supriya-puranik

    Dr. Bipin Vibhute

    Liver & Multi-organ Transplant & Hepatobiliary Surgeon
    Contact: +91 88888 22222
    Email – ask@sahyadrihospitals.com

      Book Appointment

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1246" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222