Home > Blogs > Pulmonary Care > फुप्फुसाची काळजी
फुप्फुसाची काळजी
कोरोना महामारीने भारतात प्रवेश करून 9 महिने झाले आहेत,याबाबत जनजागृती देखील मोठ्या प्रमाणावर झाली. तरीपण अनेक लोकं अजून कोरोनाच्या दुष्परिणामाबाबत गाफील आहेत. थोडे दिवस विश्रांती घेतली की आपले दैनंदिन आयुष्य पूर्ववत होते,असा समज लोकांमध्ये आहे. संसर्ग झालेले बहुतेक रूग्ण बरे झाले असले तरी मध्यम किंवा गंभीर स्वरूपाच्या आजारातून मुक्त झालेल्या रूग्णांनी कोविडपश्चात फुप्फुसाची काळजी घेणे गरजेचे आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की,कोविडचे विषाणू फप्फुसांवर आक्रमण करतात. परिणामी काही लोकांमध्ये संसर्गानंतर फुप्फुसाचे गंभीर आजार उद्भवतात,त्यामध्ये सर्वांत गंभीर म्हणजे लंग फायब्रोसिस. त्याशिवाय दम लागणे,ज्यांना दमा आहे त्यांचा दमा वाढणे इत्यादी समस्या देखील उदभवतात.
फायब्रोसिस म्हणजे फुप्फुसामध्ये व्रण तयार होतात.जेव्हा आपल्याला कोणतीही जखम होते ती बरी होताना ज्याप्रमाणे व्रण मागे राहतो तसेच कोविड-19 ने फुप्फुसावर हल्ला केल्यावर न्युमोनियाचा धोका बळावतो व हा न्युमोनिया बरा होताना व्रण तयार होतात. लंग फायब्रोसिसमुळे फुप्फुसाच्या कार्यक्षमतेमध्ये बाधा निर्माण होते. याचा गंभीर दुष्परिणाम म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे व दम लागणे. पल्मनरी फायब्रोसिस मध्ये फुफ्फुसांमधील ऊतींना नुकसान झालेले असते आणि या घट्ट आणि कडक झालेल्या ऊतींमुळे फुफ्फुसांना योग्यरित्या कार्य करणे कठीण होत जाते. जसजसे फुफ्फुसाचा फायब्रोसिस वाढू लागतो तसतसे फुप्फुसाकडून शरीराला जाणारे प्राणवायू अपुरे पडते आणि श्वसनाचा त्रास उद्भवतो.यामुळे अशक्तपणा,चिडचिड देखील होत असते.
मात्र योग्य काळजी घेतल्यास हा फायब्रोसिस बरा होऊ शकतो.याला साधारण 2 ते 3 महिने लागू शकतात.कोविडपश्चात फुप्फुसांची काळजी घेताना फुप्फुस व श्वसनाचे व्यायाम हा एक महत्त्वाचा भाग असतो,याला पल्मनरी रिहॅबिलिटेशन म्हणतात.तसेच अँटीफायब्रोसिस मेडिसिन देखील दिले जाऊ शकते.ही फुप्फुसाची काळजी घेताना उपचाराचे मुख्य लक्ष हे फुप्फुसाची कार्यक्षमता वाढविण्यावर असते.ही कार्यक्षमता वाढविण्यासाठी श्वसनाच्या व्यायामामध्ये काही उपकरणांचा देखील वापर केला जाऊ शकतो.हे करत असताना मोठ्या स्नायुंचे व्यायाम,स्नायुंचे ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न,योग्य आहार व मानसिक आरोग्य हे देखील महत्त्वाचे ठरतात.
एकंदरच कोविड-19 मुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही,परंतु कोविडपश्चात काळजी घ्या.जर थकवा किंवा दम लागणे अशी लक्षणे दिसून येत असतील तर त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करा.
Have queries or concern ?
About Author
Dr. Ajit Kulkarni
Pulmonologist
Contact: +91 88888 22222
Email – ask@sahyadrihospitals.com
Patient Feedback
Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde
All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade
All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap
All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.