Home > Blogs > Infectious Diseases > म्युकरच्या उपचारावर एक नजर

म्युकरच्या उपचारावर एक नजर

म्युकरच्या उपचारावर एक नजर

रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करत असतांना स्टिरॉइड्सचा योग्य वापर, ऑक्सिजनसाठी वापरण्यात येणारे पाणी निर्जंतुक असणे, तसेच त्या पाण्याचे कंटेनर रोजच्यारोज साफ कोरडे करून मगच वापरणे, रुग्णाची मौखिक स्वच्छता राखणे ही महत्वाची ठरते. कोविड -१९ मधून बरे झालेल्या रुग्णांनी काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात.

डिस्चार्ज मिळाल्यावर रोजच्या रोज धरीच ग्लुकोमीटरने रक्तातील साखरेची नोंदणी डायरीत करणे , व त्याप्रमाणे आपल्या डॅाक्टरांना वेळोवेळी कळविणे , काही दिवस तरी विनाकारण बाहेर जाण्याचे टाळले पाहिजे. थोडा काळ बागकाम करणे टाळा कारण माती आणि झाडांच्या इथे बुरशी असू मोठ्या प्रमाणावर असते. बागकाम सुरु केल्यानंतर मास्क, ग्लोव्हस आणि बुट परिधान करा. नियमित व्यायाम, रोजच्यारोज रक्तातील साखरेवर नियंत्रण, नाक -तोंडाची स्वछता आणि घरात आणि आसपास स्वच्छता ही प्राथमिक तत्वे पाळली तर बुरशी होण्याची शक्यता टाळतां येईल.

बुरशीचा रंग काळा नसतो. काळी बुरशी हे म्युकोरमायसिस चे नामकरण गैरसमजातून झालेले आहे . बुरशीचे बीजाणू शरिरात रुजल्यानंतर जो परिणाम द्रुष्य स्वरुपात जाणवतो तो म्हणजे काळी खपली किंवा निर्जीव असा शरीराचा भाग . बुरशीचा शिरकाव रक्तवाहिन्यांच्या पोकळीत होतो व तिथूनच ती झपाट्याने गुणाकाराने फोफावते , पुढे जाताना मागचा भाग निर्जीव करते ज्यावर इतर सूक्ष्म जीव जंतू सुध्दा या आयत्या मिळालेल्या खाद्यावर वाढू लागतात.

बुरशीविरोधात वापरली जाणारी औषघे रक्तातून (आयव्ही) व तोंडावाटे गिळून ( ओरल )दिली जातात परंतू त्यांना बुरशीपर्यंत पोहोचण्यासाठी रक्तामार्गेच जावे लागते व हवा तो परिणाम साधतां येतो.

ही औषघे बुरशीने संक्रमित झालेल्या निर्जीव भागांत पोहचवणे अशक्य असल्यानेच हा शरीराचा निर्जीव भाग तातडीच्या शस्त्रक्रियेने काढून टाकणे अत्यंत गरजेचे असते .तसेच शस्त्रक्रिये आधी व शस्त्रक्रियेनेनंतर बराच काळ पर्यंत नियमितपणे औषधोपचार चालू ठेवणे आणि गरज पडल्यास दुसर्र्यांदा शस्त्रक्रिया करणे याच उपायांनी ह्या निगरगट्ट बुरशीवर यशस्वीपणे मात करणे शक्य होते.

जर या बुरशीचा प्रसार खोलवर झाला नसेल तर अँटीफंगल औषधे तोंडावाटे किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून दिली जातात. याशिवाय रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण आणि मूत्रपिंड आणि इतर अवयवांचे कार्य सुरळीत चालू आहे याची खात्री करून घेणे देखील गरजेचे आहे. मात्र जर रुग्ण नंतरच्या टप्प्यात निदान व उपचारासाठी आले तर गुंतांगुंत होण्याचा धोका बळावतो.नाक व सायनसेसची शस्त्रक्रिया , डोळे,जबड्याची शस्त्रक्रिया किंवा व्यापक शस्त्रक्रिया हाच एक पर्याय उरतो. याचा चेहर्‍याच्या ठेवणीवर व दिसण्यावर परिणाम होऊ शकतो आणि तो पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आण्यासाठी सुधटन पुनर्रचनात्मक प्रक्रिया /शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

म्युकरमायकोसिसच्या उपचारांमध्ये विविध टप्यात बहुविभागीय सहभाग असतो. यामध्ये मधुमेह तज्ञ, संसर्गजन्य रोग तज्ञ,नेत्रतज्ञ,सायनस एंडस्कोपी कान -नाक-घसा तज्ञ ,ओरल सर्जन, पॅथोलोजिस्ट रेडीओलोजिस्ट,मायक्रोबायोलॉजिस्ट,मेंदूविकार तज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट आदींचा समावेश असतो.

म्युकरमायकॉसिसचे नंतरच्या टप्प्यातील परिणाम जरी गंभीर असले तरी,घाबरून जाण्याचे कारण नाही. लक्षणांबाबत सतर्क राहून आणि वेळेवर उपचार घेऊन आपण यावर मात करू शकतो.

Have queries or concern ?

    About Author

      Book Appointment

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1238" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222