Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blog > Endocrinology > टाइप 1, 2 मधुमेह म्हणजे काय?

टाइप 1, 2 मधुमेह म्हणजे काय?

why-is-diabetes-awareness-so-important

टाइप 1 मधुमेह म्हणजे काय?

टाइप 1 मधुमेहामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असल्याने लक्षणे देखील तीव्र असतात.काही रूग्णांमध्ये डिहायड्रेशन होऊ शकते. श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि साखर 500/600 च्या वर असू शकते.

टाइप 1 मधुमेह प्रामुख्याने 4 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आढळतो. त्यापुढेही प्रौढांमध्ये दिसू शकतो. टाइप 1 मधुमेहामध्ये स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन तयार होत नाही किंवा याचे प्रमाण अगदी नगण्य असते.त्यामुळे टाइप 1 मधुमेहाच्या रुग्णाला इन्शुलिन गरजेचा आहे.

टाइप 2 मधुमेह म्हणजे काय?

स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन हे संप्रेरक तयार होते,जे साखरेवर नियंत्रण ठेवते.टाईप 2 मधुमेहामध्ये इन्शुलिन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही व त्याची परिणामकारकता देखील कमी असते.याला इन्शुलिन प्रतिरोध असेही म्हणतात.टाईप 2 मधुमेह असलेल्या बर्याचशा लोकांमध्ये लठ्ठपणा,कुटुंबियांमध्ये वैद्यकीय इतिहास व वय चाळीस पेक्षा अधिक असते.

बर्याच जणांना लक्षणे दिसून येत नाहीत आणि कुठल्यातरी तपासणीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक आहे,असे दिसून येते. औषधे, आहार आणि व्यायामाने 8-10 वर्षे हा मधुमेह नियंत्रणात राहतो. मात्र त्यानंतर रुग्णाच्या वैद्यकीय परिस्थितीनुसार इन्शुलिन ची गरज पडू शकते.

गर्भावस्थेतील मधुमेह (जेस्टेशनल) म्हणजे काय?

गर्भावस्थेतील मधुमेह सातव्या महिन्यानंतर दिसून येऊ शकतो. गर्भावस्थेतील मधुमेह हा संप्रेरकांमधील बदलामुळे होऊ शकतो व प्रसूतीनंतर बहुतांश वेळा निघून जातो.

मात्र हे लक्षात घेणे गरजेचे आहे अशा महिलांमध्ये भविष्यात टाइप 2 मधुमेहाची शक्यता जास्त असते.

सेकंडरी डायबिटीस म्हणजे काय?

सेकंडरी डायबिटीस विशिष्ट कारणांमुळे होतो जसे की औषधे, स्टिरॉइड्स,स्वादुपिंडावर विपरीत परिणाम करणारे रोग,स्वादुपिंडाची अकार्यक्षमता,संप्रेरकांशी निगडीत आजार इ.जर या विशिष्ट समस्यांवर उपचार केले गेले, तर अशा प्रकारे कारणीभूत मधुमेहावरही उपचार करता येऊ शकतात.

Have queries or concern ?

    About Author

    Endocrinologist and Diabetologist in pune

    Dr. Uday Phadke

    Endocrinologist and Diabetologist
    Contact: +91 88888 22222
    Email – [email protected]

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222