Home > Blog > Cardiology > हृदय विकार म्हणजे काय
हृदय विकार म्हणजे काय? (Heart Disease in Marathi)
हृदय विकार म्हणजे काय ?
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकार (कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज) हा हृदयाशी संबंधित विकार आहे,ज्यामध्ये रक्तवाहिन्या,हृदय,हृदयाचे ठोके इत्यादींचा समावेश असतो.हृदयाला रक्तपुरवठा करणार्या तीन मुख्य रक्तवाहिन्यांपैकी कोणत्याही रक्तवाहिनीमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित होतो तेव्हा त्या स्थितीला आपण हृदयविकाराचा झटका (heart attack) म्हणतो.
हे देखील वाचा: हार्ट अटैक (Heart Attack) लक्षण, कारण, उपचार क्या है?
हृदयविकार होण्यास कारणीभूत जोखमीचे घटक कोणते ?
हृदयविकाराची जोखीम कमी करण्याकरिता टाळता येणार्या जोखमीच्या घटकांकडे लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे.यामध्ये चुकीचा आहार,व्यायामाचा अभाव,अपुरी झोप,मद्यपान,धुम्रपान,तंबाखूसे
ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा वैद्यकीय इतिहास आहे,त्यांनी घाबरून जाऊ नये.चांगल्या जीवनशैलीचा पर्याय निवडून आपण हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी करू शकतो.
हे देखील वाचा: हदयरोगाची जोखीम कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक
तरुणांमध्ये हृदय विकार वाढण्याची करणे कोणती ?
आधी हृदयविकार हा पन्नाशीच्या पुढील व्यक्तींमध्ये दिसून यायचा,मात्र आता तरुण पिढीला देखील या विकाराने विळखा घातलेला दिसत आहे. बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण नसणे,बैठी जीवनशैली,वाढता ताण-तणाव आणि मानसिक आरोग्य या सर्व गोष्टी यात भर घालत आहेत.बाहेरचे खाद्यपदार्थ किती खावेत याला मर्यादा असावी. मद्यपान आणि धुम्रपान या समाजासाठी चिंताजनक बनत चालल्या आहेत. महामारीच्या काळात आणि त्यानंतर वर्क फ्रॉम होमच्या काळात शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत आणि बैठी जीवनशैलीच्या दुष्परिणामांमध्ये यामुळे आणखी भर पडली आहे.
आपण अनेक वेळा असे बघतो की,एखादा चांगला चालता बोलता व्यक्ती अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळतो. त्याचे कारण या तरूण व्यक्तींच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमलेली रक्ताची गुठळी. एकीकडे ताणतणाव दुसरीकडे अतिश्रम केल्यामुळे काही वेळेला रक्तवाहिन्यांमध्ये चीर जाते व रक्ताची गुठळी तयार होते.थोड्या कालावधीतच ही रक्ताची गुठळी संपूर्ण जागा व्यापून टाकते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.कुठलीही पूर्व लक्षणे नसल्यामुळे तो व्यक्ती अचानक कोसळतो.म्हणूनच चांगल्या जीवनशैलीला आजच्या परिस्थितीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हृदयविकाराच्या लक्षणांकडे(Heart attack Symptoms) दुर्लक्ष करू नये.
हृदयविकाराची लक्षणे ही प्रामुख्याने श्रम केल्यानंतर लक्षात येतात. थोडेसे चालल्यानंतरही दम लागणे आणि छातीमध्ये जडपणा वाटणे,घाम येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेष करून मधुमेही व उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांनी सौम्य लक्षणांकडे देखील गांभीर्याने पाहावे.
Have queries or concern ?
हृदय विकार टाळण्यासाठी काय करावे ?
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहारात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने असलेले पूरक पदार्थ (सप्लीमेंटस) घेणे गरजेचे आहे. स्नायू मजबूत करण्यासाठी स्टिरॉइड्सचा वापर केल्यास हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी घरातील अन्नातूनच सकस आहार घ्यावा. याबरोबरच व्यायाम सुरू करण्यापूर्वी देखील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याची गरज आहे.
हृदयविकाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. हृदयविकाराची लक्षणे ही प्रामुख्याने श्रम केल्यानंतर लक्षात येतात. थोडेसे चालल्यानंतरही दम लागणे आणि छातीमध्ये जडपणा वाटणे,घाम येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेष करून मधुमेही व उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांनी सौम्य लक्षणांकडे देखील गांभीर्याने पाहावे. सक्रीय व चांगली जीवनशैली अंगीकृत करून आपले आरोग्य जपावे.
व्यायाम करणे जोखीमीचे ठरू शकते का ?
तरुण आणि मध्यमवयीन फिटनेस प्रेमी व्यक्ती अचानक हृदयविकाराच्या झटक्याने बळी पडल्याच्या घटना आपण ऐकत असलो तरी, सीव्हीडीमुळे होणार्या हृदयविकाराच्या तुलनेत एकूण प्रमाण अजूनही नगण्य आहे. अशा घटना जरी आपल्या समोर येत असल्या तरी न घाबरता धावणे,पोहणे,जिम,एरोबिक सारखे व्यायाम करण्यापासून परावृत्त होऊ नका. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याची गरज आहे.
व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला न घेण्याची चूक अनेक लोकं करत असतात. रक्तदाबासारखे सहव्याधी असलेल्या व्यक्तीला डॉक्टर काय करावे आणि कोणत्या प्रकारचे व्यायाम टाळावे हे सांगू शकतात. उदा. एखाद्या व्यक्तीला रक्तदाब असल्यास, डॉक्टर त्या व्यक्तीला मागे झुकलेल्या स्थितीत (डिक्लाईन्ड पोझिशन) (पाय वर आणि डोके खाली) असा व्यायाम न करण्याचा सल्ला देऊ शकतात. तसेच कार्डिओ किंवा वेट लिफ्टिंग सारखा कोणताही व्यायाम सुरू करताना अचानक वेग किंवा तीव्रता वाढविणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी योग्य नाही. कोणताही व्यायाम वॉर्म अप किंवा थोड्याशा हालचालींने सुरू झाला पाहिजे, त्यानंतर मध्यम तीव्रतेचा व्यायाम आणि शेवटी त्याची तीव्रता कमी (कुलिंग डाऊन) केली पाहिजे. हे सगळं करत असताना आपण पुरेसे पाणी पित आहोत का याकडे लक्ष द्या.
About Author
Dr. Abhijit Palshikar
Cardiologist
Contact: +91 88888 22222
Email – ask@sahyadrihospitals.com
Patient Feedback
Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde
All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade
All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap
All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.