Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > Obstetrics And Gynaecology > What Are The Contraceptives Methods?

What Are The Contraceptives Methods?

Postpartum Depression

काल माझ्या पूर्विची सिझेरियन प्रसुती असलेल्या पेशंटची ऐच्छिक सिझेरियन प्रसुती ठरवताना सवयीचा प्रश्न विचारला , ” काय गं तूझा मूलगा आता ६वर्षांचा ना? करूयात का कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया या वेळी? “

समोरून आलेली प्रश्नांची सरबत्ती ” मॅडम पण या शस्त्रक्रियेमुळे खुप वजन वाढते ना? मला extra rest लागणार ना? यासाठी ऊभे टाके घेणार का? मला जास्त ञास होणार का?”

त्याच संध्याकाळी एक विवाहीत जोडपे Contraceptive Advise घेण्यायसाठी आले . Mrs : डॅाक्टर ,मी ५ वर्षांपासून IUCD (copper T ) वापरत आहे मला सारखेच vaginal Infection व्हायचे आता मला दूसरा पर्याय हवा आहे!”

आणखी एक अगदीच तरूण कॅालेजगोईंग जोडपे सल्ला घेण्यास आले

” Mam We had Unprotected contact 2 days back, for that we took i-pill immediately but again now we had same contact ,but i m sure it will help as its written here that its to b taken within 72 hours , Correct ? ” ……

असे व अनेक प्रसंग सांगून जातात “There should be contraceptive awareness !! “

गर्भनिरोधक ऊपाययोजना(Contraceptive Methods )

  1. कायमस्वरूपी(Permanent/Irreversible )
  2. तात्पुरत्या(Temporory/ Reversible)

1. कायमस्वरूपी(Permanent/Irreversible )

  • शस्त्रक्रिया(Sterilisation)

A. पुरूष नसबंदी (Vasectomy ) : सर्वात सोपी ,नगण्य भूलेखाली (Local Anaesthesia) व कमीत कमी वेळेत केली जाते व कमीत कमी जोखीम यात असते.

B. स्त्री नसबंदी(Tubectomy) :

(i) कायमस्वरूपी शस्त्रक्रिया— या शस्त्रक्रियेनंतर जाडी वाढणे,पाळीत अनियमितता येणे असे कुठलेही side effects होत नाहीत .

(ii) सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान केल्या जाणार्‍या कुटुंबनायोजनाच्या शस्त्रक्रियेदरम्यान वेगळे टाके (incision ) घ्यावे लागत नाहीत,शस्त्रक्रियेपश्चात अतीरिक्त आरामही लागत नाही व या शस्त्रक्रियेचा Success Rate कमी असतो हा गैरसमज आहे.

(iii) दूर्बिणीद्वारे होणारी शस्त्रक्रिया कमीत कमी वेळेत पार पडते व त्यानंतर लवकरात लवकर दिनक्रम पहिल्यासारखा सुरू करता येतो.

(iv) दूर्बिणीद्वारे होणारी शस्त्रक्रिया ही कमी प्रमाणात यशस्वी होते हा निव्वळ गैरसमज (Myth) आहे.

2. तात्पुरत्या गर्भनिरोधक ऊपाययोजनाTemporory/ Reversible):

i. निरोध( Barrier Contraceptives Male & Female Condoms ) –

या प्रकारच्या ऊपाययोजना अवलंबिल्याने गर्भनिरोधन तर होतेच शिवाय लैंगिक संक्रमणातून ( Sexually Transmitted Diseases) होणारे आजार जसे की AIDS ,HBsAg ,Syphilis etc यांपासूनही संरक्षण मिळते.

ii. तांबी (Copper T /Cu-T ) : 

  • प्रसुती झालेल्या स्त्रीयांसाठी हि सर्वोत्तम ऊपाययोजना! इतरही ही पद्धती वापरु 
  • सुरूवातीचे काही दिवस पाळीत अतिरिक्त रक्तस्त्राव होऊ शकतो परंतू डॅाक्टरांचे योग्य मार्गदर्शन व सुरूवातीचे काही दिवस सोबत रक्तस्त्राव कमी करणारीऔषधी घेतल्यास ही ऊपाययोजना दिर्घकाळ चालणारी आहे(5/10 Years)
  • CuT गर्भाशयात असताना Vaginal Infection वाढतात हागैरसमज आहे .लैंगिक सक्रिय असणार्‍या सर्व स्त्रीयांमध्ये हे प्रमान समानच असते.
  • Cu -T गर्भाशयात असताना ती कुठेही टोचत नसते किंबहुना ती जाणवत देखील नाही!

3. गर्भनिरोधक औषधी

A. गोळ्या (Oral Contraceptive Pills)
B. ईंजेक्शन( Depot Injections )
C. आपत्कालीन गर्भनिरोधन

a व b ही ऊपाययोजना देखील सोपी व सुटसुटीत आहे ,रोज एक गोळी किंवा दर ३ महिन्यांनी ईंजेक्शन घेऊन गर्भधारणा टाळता येते.ज्या स्त्रियांमध्ये Irregular Periods किंवा अतिरीक्त रक्तस्त्रावाची समस्या असते त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम पद्धती आहे.

याप्रकारची उपाययोजना अवलंबन्यापूर्वी डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

c. आपत्कालीन गर्भनिरोधन ही क्वचीतच अवलंबण्यासाठी असते .काही लोक या पद्धतीचा वारंवार उपयोग करतात जे आरोग्यास हाणीकारक ठरू शकते.

P.S Every Contraceptive Method has a minimal failure rate but if its used effectively and with a sound advise from Your Doctor may Provide you maximum success rate .

#CONTRACEPTIVE AWARENESS 
#HIGH NEED OF TIME 
#CONSULT YOUR DOCTOR

Have queries or concern ?

    About Author

    dr stock

    Dr. Manisha Kulkarni

    Consultanat Obstetrics & Gynecology
    Contact: +91 88888 22222
    Email – [email protected]

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222