Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > Obstetrics And Gynaecology > प्रसूतीपश्चात उदासिनता”( ‘Postpartum Depression -PPD )

प्रसूतीपश्चात उदासिनता”( ‘Postpartum Depression -PPD )

Postpartum Depression

काल एका जवळच्या मैत्रिणीचा फोन आला; बर्‍याच दिवसांनी बोलत होती. माझी डेंटिस्ट असलेली ही मैत्रीण अत्यंत हुशार, चुणचुणीत, तगडा आत्मविश्वास असणारी अन् कामाप्रती अति उत्कटता असणारी! आता हिने आयुष्याच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश केला होता; एका गोंडस बाळाला जन्म देऊन! फोनची सुरूवात तशी छान झाली पण, मॅडम रडायलाच लागल्या! खोदून विचारल्यावर सांगू लागली “अगं मला सारखं रडायला येतं, खूप नकारात्मक वाटतं, सर्व निरर्थक वाटतं. खूप चिडचिड होते, भांडणं होतात, अतिसंवेदनशील झालीये मी! कधी तर हे सर्व एवढं विकोपाला जाऊन मला जीवन संपवावं वाटते!”

बाप रे! आता एक मैत्रीण अन् स्त्रीरोग तज्ञ म्हणून खरी कसोटी माझी होती. प्रत्यक्षात भेटून तिचे समुपदेशन केले व तिला योग्य औषधोपचार सुरू केले . २-३ महिन्यांच्या औषधोपचार व समुपदेशनानंतर एक हरवलेली मैत्रीण तिच्या मूळ स्वरूपात परतली. आता २ वर्षानंतर ती एक यशस्वी आई, मुलगी, पत्नी, सून व दंतरोगतज्ञ आहे.

तर मैत्रिणींनो याला “प्रसूतीपश्चात उदासिनता” (Postpartum Depression – PPD ) म्हणतात. प्रसूतीपश्चात आपल्या शरीरातील संप्रेरकांमध्ये होणारे बदल सोबतच आजूबाजूच्या परिस्थितीत होणारे बदल यांत होणार्‍या परस्पर क्रियेतून(interaction ) PPD उगम पावतो; जसे की बाळासाठी होणारी अपुरी झोप, Career मध्ये आलेला खंड, नूकतेच झालेले लग्न, कुटुंबाशी अन् कुटुंबियांशी जुळवून घेताना अचानक उद्भवलेली गर्भधारणा व प्रसूती व त्यामुळे शरीरात झालेले संप्रेरकांचे असंतुलन इत्यादी कारणांमुळे या मुली PPD च्या शिकार होतात. या मुलींना घरच्यांच्या, साथीदाराच्या मानसिक व शारीरिक आधाराची गरज असते. पण योग्य वेळी लक्षात आल्यास, योग्य उपचाराने व समुपदेशनाने (counselling) अगदीच काही आठवडे वा महिन्यात कमी होणारा हा आजार आहे.

नवीन “आई” झालेल्या पण त्याचा आनंद न मिळू शकणार्‍या सर्व “आईंना” हा आनंद मिळू शकतो व सर्व बालकांना एक “आनंदी” आई!

#POSTPARTUM DEPRESSION
#Each Complain Matters
#Every complain has a treatment
#Be wise & Consult a Specialist Doctor
#Improve Your Quality Of Life

Have queries or concern ?

    About Author

    dr stock

    Dr. Manisha Kulkarni

    Consultanat Obstetrics & Gynecology
    Contact: +91 88888 22222
    Email – [email protected]

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222