Why do Humans Want to Have Babies?
काही दिवसांपूर्वी मी माझा 22 वर्षांचा मुलासोबत चर्चा करत असताना त्याला म्हणाले, “आज दवाखानाच्या पायऱ्या चढताना एका आजोबांच्या कडेवर असलेलं एक हसरं लहान बाळ बघून सहजच माझा मनात विचार येऊन गेला की अरे, मला सुदा अजून काही वर्षांनी अस नातवंड होणाची वेळ आलीय की ! यावर तो मला हसतच म्हणाला, “अग आई, अशी दिवास्वप्ने बघणे बंद कर. कारण मला मूल होणार नाहीये हे नक्की!”
आश्चर्यचकीत होऊन मी त्याला विचारले, “अरे बाबा, असे का म्हणतोस ?
त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून मी विचारात पडले. तो म्हणाला “अगं आई, माझे लग्न होऊन, मूल होईपर्यंत उजाडेल 2032 वर्ष आणि माझं मुलं 25 वर्षांचे होईपर्यंत उजाडेल 2057 वर्ष. तो पर्यंत ह्या पृथीवर जिवंत राहण्यासाठी किती कठीण परिस्थितीतुन जावं लागणार ह्याचा अंदाज आहे का तुला ?”
त्याचा म्हणण्यानुसार जगाची लोकसंखा अगोदरच पचंड वाढली आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, धर्म -जात- प्रदेश या वरून कुठे ना कुठे नेहमी संघर्ष सुरु असतो. थोडक्यात – जग आता आहे, त्यापेक्षा भविष्यात ते अधिक वाईट असण्याची शक्यता जास्त आहे.
मग अशा संघर्षमय जगात एक अपत्य का आणून सोडायचे ? आणि तेही आपला स्वार्थासाठी व व त्याने इच्छा वक्त्य केली नसताना ?
आता समजूत काढण्याची वेळ माझी होती. मी त्याला म्हणाले, मित्रा अपत्य निर्मिती हि नैसर्गिक प्रेरणा आहे. गेली पंचवीस वंध्यत्व चिकित्सक व स्त्री रोग तज्ञ म्हणून काम करताना मी कितीतरी जोडप्यांना यासाठी मदत केली आहे.
मूल झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवणर्नीय असतो. तुला सुद्धा ही गोष्ट अजून काही वर्षांनी कळेलच. ही नकारात्मकता तुझ्या विचारात कदाचित खूप सारे Sci-fi अमेरिकन चित्रपट बघून आली असावी ज्यात जगाचा अंत जवळ आलेला असतो आणि कुणीतरी एक हिरो अचाट कृत्य करून ते थांबवतो.
पण प्रत्यक्षात असे खरच असते का? नैसर्गिक आपत्ती, युद्ध, रोगराई या आणि अशा अनेक संकटातून मानव बाहेर पडला आहे व यापुढेही पडत राहील. यावर आमची चर्चा थांबली पण पुढे मी या मुदयावर विचार करू लागले आणि ठरवले की आपल्याकडे उपचारासाठी येणाऱ्या काही जोडप्यांची आपण या विषयावर नक्की बोलूयात.
ज्यांना मूल होऊ शकत नाही, महागडे इंजेक्शन्स व उपचार घेऊन मुल झाले मध्ये किंवा शस्त्रक्रिया करवून घ्याव्या लागल्या, वेदना सहन करावी लागली अशाही काही जोडप्यांशी मी बोलले. एवढे सगळे सहन करून अपत्य निर्मितीसाठीची त्यांची प्रेरणा नेमकी कशाने बरं टिकून राहिली असेल ?
गेल्या काही दिवसात साधारण शंभर जोडप्यांशी याबद्दल चर्चा केल्या नंतर त्यांचे खालील प्रमाणे अभिप्राय मूळ होण्यासाठीची कारणे मला ऐकायला मिळाली….
१. आज वर आम्ही फक्त दोघे होतो आता आम्हाला आमचे स्वतःचे कुटुंब हवे आहे, Family हवी आहे. आता आम्हाला असे वाटते की आमचे दोघांचे एक अपत्य असावे ज्याला आमचा चेहरा, गुणसूत्रे आणि संस्कार असतील. मूल घरात आल्यावर कदािचत आमचे वाद कमी होतील,आम्ही दोघे मुलांसाठी म्हणून अधिक जबाबदारीने वागू
२. आमचे बाळ लहानाचे मोठे होतानाचा आनंद आम्हाला अनुभवायचा आहे . निस्वार्थी प्रेमाचा अनुभव घ्यायचा आहे
३. लग्नानंतर एक-दोन वर्षांनी याबाबत घरी व इतर विचारणा होऊ लागली आहे की पाळणा कधी हलणार तुमच्याकडे ? घरच्या लोकांचे खूपच प्रेशर आहे.
४. स्त्री म्हणून मला आई होण्याचा आनंद अनुभवायचा आहे. आता मला त्यािशवाय अपूर्ण वाटतं.
५. आम्हाला एक मुल आहे. त्याला सोबत असावी म्हणून दुसरे मूल व्हावे असे वाटते. आमच्या नंतर त्याला रक्ताचं आपलं कोणीतरी असलं पाहिजे असं वाटतं.
६. मला मूल झाले नाही तर पती दुसरे लग्न करेल अशी भीती वाटते. सासू सासरे त्याचे दुसरे लग्न करायला निघाले आहते.
७. नवर्याचे संसारात लक्ष नाही, मूल झाल्यावर त्याला बाळाचा लळा लागेल व तो घरी थांबेल
८. मला मूल झाले म्हणजे जगासमोर माझे पुरुषत्व सिद्धी होईल.
९. माझा वंश टिकून राहावा अशी माझी/ माझ्या घरच्यांची इच्छा आहे.
१०. माझ्याकडे असलेल्या वडिलोपार्जित संपत्तीला वारसदार हवा आहे आणि माझे स्वता:चे मूल असेल तरच ह्या संपतीचा हक्क मला मिळेल असे सुद्धा मला एका जोडप्याने सांगितले
११. आम्ही वृद्ध झाल्यावर आमची काळजी घेण्यासाठी कुणीतरी असावं ही सर्व उत्तरे ऐकून मला लक्षात आले की मूल होणे ही एक मूलभूत जैविक अंतःप्रेरणा तर आहेच पण या विषयाला किती तरी
सामािजक, आर्थिक व वैयक्तिक पदर आहेत.एकंदरीतच प्राणीमात्र असोत की मनुष्य,सर्वानाच संतती, अपत्यप्राप्ती व वंश सातत्य टिकवून ठेवणे जरी आवश्यक वाटत असले तरी हे सर्व करताना आपण ज्या पृथ्वीवर राहतो, तिची योग्य काळजी घेऊन येणार्या पिढ्यांसाठी ती अधिक रहाण्या योग्य बनवणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे व ती योग्य रीतीने पार पाडणे हेही आपले कतर्व्य आहे.
आता पुढच्या वेळी मुलाशी चर्चा करतांना त्याला नेमके काय सांगावे हे मला उमगले होते !
कृपया काळजी घ्या, सुरिक्षत रहा !
– डॉ. वैशाली चौधरी
Have queries or concern ?
About Author
Dr. Vaishali Chaudhary
Director – IVF & Fertility
Contact: +91 88888 22222
Email – ask@sahyadrihospitals.com
Patient Feedback
Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde
All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade
All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap
All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.