Home > सह्याद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर

सह्याद्रि हॉस्पिटल्स, स्व-रूपवर्धिनी आणि उदय गुजर फौंडेशन यांचा संयुक्त प्रकल्प

सह्याद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर

१०वी किंवा १२वी झालेल्या वय १८ ते ३५ मधील मुलं, मुली तसेच महिलांसाठी.

सध्या जगात काय चाललं आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे. कोरोना मुळे सारं जगच, आपला देश, आपलं महाराष्ट्र राज्य आणि खास करून आपले पुणे या पॅनडेमिक मध्ये होरपळून निघाले आहे. अश्या परिस्थितीत समाजाला गरज आहे ती वैद्यकीय व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तींची व हातांची.

जगामध्ये विविध क्षेत्रांमध्ये व्यावसायिक मंदी आली आहे परंतु त्याचवेळी वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. म्हणुनच ही कमतरता भरून काढण्या करता आणि लोकांचे जीव वाचवण्याकरता, त्यांना ह्या आजारातुन बरे करण्याकरता तुम्ही देवदूत म्हणुन येऊ शकाल का ? तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात उतरून अश्या प्रकारच्या संकटांना सामोरे जाण्या करता जे लागणारे स्किल्स आहे ते शिकण्यासाठी याला का ?

पुण्यातील नामांकित वैद्यकिय संस्था – सह्याद्रि हॉस्पिटल्स व त्याचे संस्थापक डॉ . चारुदत्त आपटे यांनी या परिस्थितीवर मात करण्या करता जो प्रयत्न चालवला आहे त्यातीलच एक महत्वाची activity म्हणजे सह्याद्री Paramedical Skill Development सेंटरची उभारणी. ह्या सेंटरला केंद्रीय सरकारची म्हणजे NSDC (The National Skill Development Corporation India ) या संस्थे कडून मान्यता मिळाली आहे व हे सर्व कोर्सेस NSDC मान्यता प्राप्त आहेत.

हे सेंटर पुण्याच्या मध्यवर्ती जागी म्हणजेच महिला सेवा मंडळ परिसरात, संजीवनी हॉस्पिटलच्या च्या समोर, कर्वे रोडच्या मागे आणि गरवारे कॉलेज जवळ, सुरु करण्यात येत आहे. या कोर्सेस ची पात्रता १०वी किंवा १२वी आणि किमान वय १८ ते ३५ मधील मुली व महिलांसाठी अशी आहे. खालील कोर्सेस येथे सुरवातीला शिकवले जाणार आहेत.ह्या सर्व कोर्सेस ची फि १५,०००/- इतकी आहे.

१) General Duty Assistant – जनरल ड्युटी असिस्टंट
जे रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांना मदतनीस म्हणून काम करतात आणि आरोग्यसेवा पुरवतात .

हा कोर्स पुर्ण झाल्यानंतर र्विद्यार्थ्यांना लहान मोठ्या रुग्णालयात काम करण्याच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत.
या कोर्स ची किमान शैक्षणिक पात्रता – १०वी पास
कालावधी – ४ महिने आहे.

२) Home Health Aide – म्हणजे गृह आरोग्य मदतनीस
जे रुग्णांच्या घरी जाऊन नियमित वैयक्तिकृत आरोग्य सेवा देतात.

आजच्या काळात computer चे मूलभूत ज्ञान असणे अनिवार्य झाले आहे. म्हणूनच आमच्या येथे Soft Skills, Presentation Skills सोबतच Computer चे मुलभूत ज्ञान दिले जाते. इथे Internet Connection असलेली सुसज्ज computer लॅब उपलब्ध आहे.

खरं तर वैद्यकीय क्षेत्र हे स्वार्थ आणि परमार्थ यांची सुरेख सांगड असलेला व्यवसाय आहे. या क्षेत्रात काम करणे म्हणजेच एका अर्थाने परमेश्वराची पूजाच आहे !!!

तर वाट कसली बघताय? या आणि तुमच्या करिअर ला नवीन वळण द्या

अधिक माहिती साठी संपर्क करा

“स्व-रूपवर्धिनी”
22/1, पारगे चौक, बारणे रोड, मंगळवार पेठ, कसबा पेठ, पुणे, महाराष्ट्र 411011

पुष्पा नडे

+91 9822823757

बागेश्री पोंक्षे

+91 9420481244

किरण भट्टड

+91 8329428702

श्वेता मोरे

+91 9284751709

इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील फॉर्म भरून देणे- https://forms.gle/HBunE7sRX6HnsyB76

Emergency/Ambulance
+91-88888 22222
Emergency/Ambulance
+91-88062 52525
Call Now: 88888 22222