Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Videos > Orthopedic > What is Arthritis and Their Types, Stages? (Marathi)

What is Arthritis and Their Types, Stages? (Marathi)

संधिवात म्हणजे काय?

जेव्हा दोन हाड एकामेकांच्या जवळ येतात तेव्हा सांधा तयार होतो. ह्या हाडांवर जाड आणि गुळगुळीत आवरण असता ज्यांना खुर्च्या किव्हा cartilage अस म्हंटलं जात . जेव्हा हाड एकामेकांवर घासायला लागतात . त्याला संधिवात असे म्हणतो .

संधिवाताची मुख्य कारणे

संधिवाताची ३ मुख्य कारणे आहेत ( Causes of Arthritis)

1. Osteoarthritis

वयो मानामुळे सांध्यामध्ये होणारे बदल , ज्यामुळे सांध्याच्या खुर्च्यात झीज होते. हि झीज जमिनीला उठ बस केल्यामुळे , पायऱ्या चड उतार केल्यामुळे, वेड्या वाकड्या जमिनीवर चालल्यामुळे , कुर्चांची झीज होते. हि काम जेव्हा प्रमाणाच्या बाहेर होतात तेव्हा Osteoarthritis होतो.

2. Rheumatoid arthritis

Rheumatoid arthritis किव्हा आमवात ह्या मध्ये आपल्या प्रतिकारशक्ती मध्ये बिघाड होतात ज्यामुळे पांढऱ्या पेशी सांध्याच्या आवरणावर हल्ला करतात . ज्यामुळे तिथे सूज किव्हा वेदना होतात.

हे दोन्ही प्रकारचे संधिवात उतरत्या वयात दिसतात . साधारतः ज्यांचं वय ५०-६० वयोगटातील लोकांना Osteoarthritis आणि Rheumatoid arthritis दिसून येत.

3. Post-traumatic arthritis

तरुण वयामध्ये एखाद्याला fracture झालेला असेल आणि fracture व्यवस्थित जोडल गेल नसेल, किव्हा वेड्या वाकड्या प्रकारे हाड जुळलेली असतील किव्हा ligament injury असतील तर ह्यांच्यामुळे कमी वया मध्ये arthritis होतो .

Arthritis चा प्रॉब्लेम हा फक्त medically नसून patient च्या social व psychological aspect वर होतो . Arthritis चा प्रॉब्लेम patient च्या diabetes किव्हा hypertension च्या प्रॉब्लेम ला वाढवू शकतो . Arthritis मुळे patient ला social inhibition होत . सतत लोकांवर depend राहावं लागत ह्या विचारामुळे psychologically पण परिणाम होतो .

संधिवाताचे Stages ( Stages of Arthritis)

Stage 1 : हाडांची जिझ ती कमी प्रमाणात होते. आपली रोजची कामं करताना त्रास होत नाही , जास्त चालणं किव्हा मोठा प्रवास झाला किव्हा खूप कामं झाली, तरच हा त्रास उदबवतो.

Stage 2 & Stage 3 : दुखण्याचं प्रमाण वाढत , रोजची कामं करताना त्रास व्हायला सुरु होतो.

Stage 4: जिझ इतकी झालेली असते कि रोजची कामं करताना त्रास व्हायला सुरु होतो. वेदना असह्य असतात , गोळ्यांची गरज पडते त्या वेळी surgery करणं हा एक उपाय असतो .

Have queries or concern ?

    संधिवात कसा टाळता येतो ?

    • आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल करणे . अश्या गोष्टी करू नये जेणेकरून आपल्या गुडग्यांवर ताण कमी येईल .
    • वजन कमी करणं .
    • तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा. व्यायामुळे ताठावलेले स्नायू मोकळे होतात. स्नायूंची ताकत वाढते .
    • व्यायाम नियमित केले पाहिजे . व्यायामामध्ये सुद्दा असे व्यायाम केले पाहिजे जेणेकरून गुडघ्यांवर ताण नाही पडणार.
    • पट्टा किव्हा braces वापरणं. ( simple knee cap , hinge brace and off loading brace )
      चालताना शक्यतो काठीचा वापर केला पाहिजे .

    हे सगळे उपाय करून जर दुखणं कमी होत नसेल तर patient ने painkiller घ्यावी . अतिशय mild प्रकारचे painkiller घेणे . Painkillers घेऊनही दुखणं कमी होता नसेल तर patient ने तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे . गुढघ्यासाठी काही injections पण उपलब्द आहेत . Steroids च्या injections चा फायदा Rheumatoid arthritis असलेल्या patients ला होतो. पण ज्यांची वयोमान प्रमाणे हाडांची जिझ झालेली असते त्यांच्यासाठी gel based injections उपलब्द आहेत.

    About Author

    Dr Sachin Karkamkar

    Dr. Sachin Karkamkar

    Consultant Orthopaedic
    Contact: +91 88888 22222
    Email – [email protected]

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222