Free ebooks Library z-lib project

Home > Videos > Neurology > Fits (Epilepsy) म्हणजे काय

Fits (Epilepsy) म्हणजे काय?

Fits/Epilepsy या बद्दल रुग्ण आणि नातेवाईकांना बऱ्याच शंका कुशंकां असतात. त्या शंकांचं निरसन डॉक्टर आज ह्या विडिओ मध्ये करणार आहेत . ह्या व्हिडिओमध्ये Dr. Dhananjay Duberkar, Fits किंवा Epilepsy ह्या विषयावर आपल्याला महत्वपूर्ण माहिती देत आहे.

डॉ सांगतात कि Epilepsy/ fits / आकडी येणं / मिर्गी / झटके येणं हि सर्व नाव लोकांनी दिलेली आहेत . या मध्ये मेंदूमध्ये जो विद्युत प्रवाह होतो , तो अनियंत्रित होतो आणि तत्यामुळे रुग्णाला त्रास होत असतो . Fits चे प्रकार भरपूर असतात ,लोकांना वाटत कि fits येणे म्हणजे हात पाय घट्ट होणे , डोळे पांढरे होणे व तोंडातून फेस येणे , हि काही लक्षण दिसली तरच रुग्ण fits आले असे समजतात.

डॉ फिट्स च्या प्रकारां बद्दल माहिती देताना समजावतात कि Fits चे काही प्रकार असतात , त्याच्यामध्ये थोड्या वेळासाठी माणूस बेशुद्द होणं , लहान मुलांमध्ये आणखीन एक वेगळ्या प्रकारची असते ज्याच्यात अगदी काही सेकंदासाठी ते आपल्याला कुठलाच प्रतिसाद देत नाहीत , थोड्यावेळासाठी त्याची डोळ्याची पापणी हलत असते , काही काही लोकांच्या हातातून वस्तू पडतात , धक्का लागल्यासारखे होते, तर हे तर हे पण fits चे प्रकार असतात . सगळे fits चे प्रकार असतात.

Fits आल्यानंतर काय गोष्टी कराव्यात ह्या बद्दल डॉक्टर सांगतात, जर कुणाला fits येत असतील तर त्यावेळी सर्वप्रथम रुग्णाला आपण गळ्याच्या आसपास काही घट्ट असेल तर ती वस्तू सैल करावी. दुसरी गोष्ट एका कुशीवर झोपवणे आणि तोंडात कोणीतही वस्तू न टाकणे हे सर्वात महत्वाचं असत. कांदा , लसूण, चप्पल ह्याचा काही उपयोग नसतो , हे सर्व गैर समाज आहेत. तर त्याचा वापर करू नये आणि त्यामुळे रुग्णाला नुकसान होण्याची जास्त शक्यता असते.

डॉक्टर सांगतात कि Fits आलेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यायची याच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमजुती आहेत Fits च्या रुग्णांनी औषध कश्या प्रकारे घ्यावीत व कोणकोणत्या गोष्टी पाळाव्या लागतात व एखाद्या रुग्णाला फिट येत असेल तर नातेवाईकांनी काय काळजी घेतली पाहिजे ह्याच्या बद्दल डॉक्टर माहिती देतात.

व्हिडिओमध्ये डॉक्टर सांगतात कि , तीन प्रकारच्या तपासण्या बद्दलही सांगतात. कधी फिट्स चा त्रास असेल तर काय तपास करायचे हे मेंदूविकारतज्ज्ञ किंवा neurologist ह्यांच्याकडून योग्य सल्ला घेऊ शकतात. काही रुग्णमध्ये surgical /epilepsy surgery ने हा आजार बारा केला जातो. तर त्याच्यासाठी काही तपासण्या असतात. जर फिट्स कंट्रोल होत नाहीत तर तपासण्या कराव्यात , अश्या फिट्सना refractory epilepsy म्हणतात.

Have queries or concern ?

  About Author

  dr stock

  Dr. Dhananjay Duberkar

  Neuro Physician
  Contact: +91 88888 22222
  Email – [email protected]

   Appointment Form

   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222