Home > Videos > Nutritions and Dietics > महिलांसाठी सर्वोत्तम आहार क्या होना चाहिए

महिलांसाठी सर्वोत्तम आहार क्या होना चाहिए?

महिलांचे कार्य, व्यवस्थापन, कलागुण हे पुरूषांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली असतात हे आता लोकमान्य झाले आहे.महिला शिक्षण घेतात पुढे त्या career मध्ये पण भरभराट करतात पण ह्या सगळ्या गडबडीत त्या आपल्या आरोग्य आणि आहारावर लक्ष द्यायचं विसरून जातात . तर आज ह्या विडिओ मधून जाणून घेऊया कि कुठल्या गोष्टींचा स्त्रियांच्या आहारात समावेश असावा.

महिलांसाठी सर्वोत्तम आहार (Food and Diet tips for women)

 • स्त्रियांनी आपली immunity वाढवण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम करण्याची खूप गरज आहे.
 • आपल्या आहाराचे planning / नियोजन केले पाहिजे . त्याच बरोबर time management वर पण लक्ष द्यायला हवा जेणे करून तुम्ही स्वतःवर लक्ष देता येईल.
 • आहाराची quality त्याचे पौष्टिकत्व चांगले असले पाहिजे आणि त्याचबरोबर आहाराची वेळ सांभाळणं खूप गरजेचं असत.
 • आता उन्हाळा आला , तर उन्हाळ्यात dehydration चा त्रास होतो , त्या मुळे weakness आणि दिवसभराच्या कामाला शक्ती कमी पडते . तर आहार नियोजनाची सुरुवात करताना पाण्याचे सेवन खूप केले पाहिजे . दिवसभरात दीड ते दोन लिटर पाणी पिले पाहिजे.
 • पाण्या बरोबर त्या season मध्ये मिळणाऱ्या liquid किव्हा द्रव पदार्थाचा समावेश करावा ज्या मुले त्वचा चांगली राहते , केसांचं आरोग्य चांगला राहत जसे कि आवळा , कोकम सरबत , गुल घालून केलेलं कैरीचं पन्हं , उसाचा रस. -आपला आहार चौरस असला पाहिजे आणि आपला diet mix असला पाहिजे . शाकाहारी आणि मांसाहारी असेल तर एकदम उत्तम .
 • अन्न बनवण्याच्या पद्धतीवर लक्ष दिले पाहिजे . जेवढं कमीत कमीत processing असतं तेवढी पोषण मूल्य जेवणात राहतात.
 • आहार हा पौष्टिक असावा , त्याची निवड चांगली केलेली असावी , आहार योग्य प्रमाणात आणि योग्य दर्जाचा घेतला पाहिजे.
 • मद्यपान आणि धूम्रपान टाळले पाहिजे कारण शरीराला ते अपायकारक आहे.
 • स्त्रियांमध्ये जन्म झाल्या पासून वृद्ध होई पर्यंत hormonal changes होत असतात. आपल्या hormones ला योग्य आहाराची साथ दिली तर स्त्री नक्की सक्षम होऊ शकते त्यामुळे पोषक आहार घेणं आणि स्वतःला वेळ देणं आणि योग्य वयात योग्य त्या गोष्टीने पोषण करणं खूप महत्वाचं असतं.

जर स्त्री सक्षम झाली , तीच आरोग्य चांगला राहिला तर कुटुंब सक्षम होता आणि कुटुंब सक्षम असला तर समाज सक्षम बनतो. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या immunity , आहार , व्यायामाला महत्व द्या आणि आपल्या आहारचा दर्जा वाढवा.

About Author

  Appointment Form
  For a quick response to all your queries, do call us.

  Patient Feedback

  Expert Doctors

  Emergency/Ambulance
  +91-88888 22222
  Emergency/Ambulance
  +91-88062 52525
  Call Now

  Generic selectors
  Exact matches only
  Search in title
  Search in content
  page
  post