Die Geheimnisse des Gewinnens bei Online-Slots auf dieser Website – 888Casino !

Home > Blogs > Urology and Nephrology > मुतखडा म्हणजे काय?

मुतखडा म्हणजे काय?

मुतखडा म्हणजे मुत्रपिंडात क्षारयुक्त घटकांचे प्रमाण वाढल्यामुळे तयार होणार्‍या कठिण स्फटिकजन्य पदार्थ.

मुतखड्याची लक्षणे कोणती

मुतखड्याचे सर्वांत प्रमुख लक्षण म्हणजे वेदना.मुतखडा कुठे आहे यावर पाठीपासून ते पोटापर्यंत वेदना होऊ शकतात.जर हा मुतखडा 8 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल तर वेदना सुरू होऊ शकतात.जर मुतखडा मुत्रवाहक नलिकेमध्ये गेला तर अचानक तीव्र वेदना सुरू होऊ शकतात.या स्थितीला युरेटरिक कोलिक असे म्हणतात.या स्थितीत इंजेक्शन देऊन वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.जर ते पुढच्या टप्प्यात असेल तर लेझर उपचार करून मुतखडा काढावा लागतो.

जर हा मुतखडा मुत्राशयापर्यंत पोहचला तर त्या व्यक्तीला लघवी बाहेर काढणे कठिण जाते.अशा वेळेस वेदना होऊ शकतात किंवा लघवीतून रक्त बाहेर पडू शकते.जर हा मुतखडा मुत्रमार्गात गेला तर खूप जास्त वेदना होऊ शकतात आणि अशा वेळी लेझर शस्त्रक्रिया करून मुतखडा काढावा लागतो.

मुतखड्याची अन्य लक्षणे कोणती ?

मुतखड्याचे दुसरे लक्षण म्हणजे रक्तस्त्राव.मुतखड्याचा पृष्ठभाग हा कडक व असमान असू शकतो.त्याला तीक्ष्ण कडा असू शकतो.त्यामुळे जेव्हा मुत्रप्रणालीच्या भागाशी त्याचे घर्षण होते त्यामुळे लघवीतून रक्त बाहेर पडू शकते.

मुतखड्याचे तिसरे लक्षण म्हणजे मुत्रमार्गातील संसर्ग.काही लोकांमध्ये यापैकी कुठलेही लक्षण दिसून येत नाहीत,मात्र आरोग्य शिबिर,इतर कारणासाठी केलेली पोटाची सोनोग्राफी,रक्त लघवीची चाचणी यातून मुतखड्याचे निदान होते.

Have queries or concern ?

    About Author

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222