Home > Blogs > Urology and Nephrology > मूत्रपिंडाचे आरोग्य आणि संबंधित विकार

मूत्रपिंडाचे आरोग्य आणि संबंधित विकार

Kidney Health and Kidney Disease

आपल्या शरीरात अनेक अवयव महत्त्वाचे कार्य करत असतात.या अनेक अवयवांपैकी महत्त्वाचा असणारा एक अवयव म्हणजे मुत्रपिंड(Kidney). मुत्रपिंड हे शरीराच्या पाठीच्या बाजूला असणारे दोन लाल-तपकिरी रंगांचे व बीनच्या आकाराचे अवयव असतात.

मुत्रपिंडाचे प्रमुख कार्य म्हणजे शरीरात दररोज निर्माण होणार्‍या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांना बाहेर काढणे. मूत्रपिंडे रक्तदाब नियंत्रित करणे, सोडियम-पोटॅशियम, मॅग्नेशियम सारख्या क्षारांचे संतुलन ठेवणे, रक्तातील आम्लाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे, ड जीवनसत्त्व सक्रिय करून हाडांचे आरोग्य चांगले राखणे आणि हार्मोन एरिथ्रोपोएटिन तयार करून हिमोग्लोबिनची पातळी सामान्य राखणे यासारखी इतर अनेक कार्ये देखील करतात. 

मुत्रपिंडाच्या कार्यामध्ये अनेक कारणांमुळे बिघाड होऊ शकतो.त्यामध्ये मुत्रपिंडाला झालेली इजा (अ‍ॅक्युट किडनी इंजुरी), दीर्घकालीन मुत्रपिंडाचा आजार (क्रॉनिक किडनी डिसीजेस) हे दोन प्रमुख प्रकार दिसून येतात. याबरोबरच मधुमेह,उच्चरक्तदाब,स्वयंप्रतिकार रोग (ऑटोइम्युन डिसीज) यामुळे मुत्रपिंडावर होणारे परिणाम,मुत्रमार्गामधील जंतूसंसर्ग,पॉलिसिस्टिक किडनी डिसीज सारखे अनुवंशिक आजार,मुतखडा इत्यादींचा देखील समावेश आहे. 

किडनी चे आजार (Kidney Disease)

मुत्रपिंडाच्या प्रमुख आजारांमध्ये क्रॉनिक किडनी डिसीज किंवा दीर्घकालीन मुत्रपिंडाचा आजार हा सर्वसामान्यपणे दिसून येतो.यामध्ये मुत्रपिंडाचे कार्य कालांतराने कमकुवत होत जाते.

शरीरातून टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव्य बाहेर काढण्याची क्षमता कमी झाल्यामुळे या टाकाऊ व अतिरिक्त द्रव पदार्थांची पातळी शरीरात वाढत जाते आणि यामुळे गुंतागुंत झाल्यास शरीराच्या सर्वच अवयवांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.अतिरिक्त द्रव साठल्याने हाता-पायामध्ये सूज, उच्च रक्तदाब आणि फुफ्फुसात देखील हे द्रव साठू शकते.

रक्तातील पोटॅशियमची पातळी वाढल्यास हृदयाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.याशिवाय रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे,हाडे कमकुवत होणे,अशक्तपणा,मध्यवर्ती मङ्खाासंस्थेवर परिणाम होणे अशा प्रकारची गुंतागुंत होऊ शकते,म्हणूनच याबाबत लक्षणे आणि संभाव्य जोखमीच्या घटकांबद्दल आपण जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.

या स्थितीला कारणीभूत ठरण्यामध्ये टाईप 1/टाईप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब,दीर्घकालीन मुत्रमार्गाचा संसर्ग इत्यादी जोखमीचे घटक आहेत.

किडनी फेल होण्याची लक्षणे (Symptoms of chronic kidney disease in marathi)

मुत्रपिंडाच्या कार्यावर किती परिणाम झाला आहे,त्यानुसार लक्षणे दिसू शकतात.त्यामध्ये मळमळणे,उलट्या,भुक मंदावणे,अशक्तपणा,झोप न येणे,जास्त किंवा कमी वेळा लघवीला जावे लागणे,पाय सुजणे,त्वचा कोरडी पडणे व खाज सुटणे,उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे कठिण जाणे,फुफ्फुसावर परिणाम झाला असल्यास श्‍वास घ्यायला त्रास होणे,छातीत दुखणे इत्यादींचा समावेश आहे.

याचे निदान करण्यासाठी रक्त, लघवीच्या चाचण्या,इमेजिंग चाचण्या,बायोप्सीचा सल्ला दिला जाऊ शकतो.

रक्ताच्या चाचणीतून क्रियाटिनिन,युरिया सारख्या टाकाऊ पदार्थांची रक्तातील पातळी समजू शकते,तर लघवीच्या चाचण्यांद्वारे दीर्घकालीन मुत्रपिंडाच्या आजाराचे कारण कळण्यास मदत होऊ शकते.

इमेजिंग चाचण्यांमुळे मुत्रपिंडाचा आकार आणि संरचनेचे मुल्यांकन केले जाऊ शकते.

बायोप्सीमध्ये मुत्रपिंडातील पेशींचा नमुना काढून लॅब मध्ये पाठविला जातो,जेणे करून मुत्रपिंडाच्या विकाराचे कारण कळण्यास मदत होऊ शकते.या निदानानुसार आणि विकार होण्याचे कारण आणि जोखमीचे घटक या आधारावर उपचार केले जातात.

या उपचारांचे उद्दिष्ट हे लक्षणांवर नियंत्रण आणणे,संभाव्य गुंतागुंतीची जोखीम कमी करणे,गुंतागुंत असल्यास ती कमी करणे आणि रोगाची वाढण्याची गती मंदावणे हे आहे.उच्च रक्तदाब,हातापायावर आलेली सूज, अशक्तपणा,कोलेस्ट्रॉलची पातळी,साचलेले टाकाऊ पदार्थ यासारख्या गुंतागुंतींवर औषधे दिली जाऊ शकतात.

दीर्घकालीन मुत्रपिंडाच्या आजाराचे निदान व उपचार वेळेत न झाल्यास मुत्रपिंडाचे कार्य संपूर्णपणे निकामी होण्याचा धोका उद्भवू शकतो.हा मुत्रपिंडाच्या आजाराचा शेवटचा टप्पा असतो आणि यामध्ये डायलिसिस किंवा मुत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज पडू शकते.

 

किडनी खराब झाल्यास हे करतात उपचार -Treatment of Kidney Failure in marathi

डायलिसिस प्रक्रिया (Dialysis Procedure)
जेव्हा रक्तातील नको असलेल्या किंवा टाकाऊ घटकांचा योग्यरित्या निचरा करण्यास मुत्रपिंड असक्षम ठरू लागते,तेव्हा डायलिसिसचा सल्ला दिला जाऊ शकतो. जेव्हा मुत्रपिंड निकामी होते आणि त्याची लक्षणे दिसू लागतात,तेव्हा विविध चाचण्यांचे निकाल,रूग्णाचे वय,आरोग्य याच्या आधारावर डॉक्टर डायलिसिस कधी सुरू करायचे हे सांगतात.

असक्षम ठरत चाललेल्या मुत्रपिंडाचे कार्य बाहेरील उपकरणाद्वारे डायलिसिस प्रक्रियेमध्ये केले जाते.मशिनमध्ये नको असलेले सर्व घटक,टाकाऊ पदार्थ,द्रव्य रक्तातून काढून ते बाहेर टाकले जातात आणि शुध्द रक्त शरीरात परत सोडले जाते,याला हिमोडायलिसिस (Hemodialysis) म्हणतात.

पेरिटोनियल डायलिसिसमध्ये (Peritoneal Dialysis) पोटात नळीवाटे अशुध्द पदार्थ बाहेर काढण्यास मदत करणार्या व डेक्स्ट्रोज द्रव्य असणारे डायलिसेट हे द्रव्य टाकण्यात येते.हे द्रव्य सहा तासात तसेच ठेऊन सहा तासानंतर बाहेर काढण्यात येेते. नळीबरोबर असलेल्या पिशवीत टाकाऊ पदार्थ जमा होतात.

मुत्रपिंड प्रत्यारोपण (Kidney Transplant)
मुत्रपिंड निकामी झालेल्या रूग्णामध्ये जिवंत किंवा मेंदूमृत दात्याचे कार्यक्षम मुत्रपिंड प्रत्यारोपित करण्याची ही प्रक्रिया असते.मुत्रपिंडाच्या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या रूग्णांना याचा सल्ला दिला जाऊ शकतो. यामध्ये प्रत्यारोपणासाठी रक्तगट जुळणे गरजेचे असते,त्यामुळे सहसा जवळचे नातेवाईक जिवंत दाते म्हणून पुढे येतात.

आधुनिक काळामध्ये रक्तगट जुळत नसले तरी एबीओ एनकंपॅटिबल टान्सप्लांट हे केले जाऊ शकते.मात्र ही आव्हानात्मक प्रक्रिया असून यासाठी वैद्यकीय कुशलता,पायाभूत सुविधा आणि शस्त्रक्रियेपश्चात वैद्यकीय सेवा अतिशय महत्त्वाची ठरते.

ज्यांना आधीपासून सहव्याधी आहे,जसे की मधुमेह,अनियंत्रित उच्च रक्तदाब,कर्करोग,हेपॅटायटिस,तीव्र संसर्ग इत्यादी.ते दाता होण्यास पात्र ठरत नाहीत.प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या पारंपरिक,खुल्या (ओपन सर्जरी),लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया किंवा रोबोटिक पध्दतीने केल्या जाऊ शकतात.

आपल्या शरीरामध्ये बाहेरचे अवयव स्विकारण्यामध्ये काही आव्हाने येऊ शकतात,म्हणूनच प्रत्यारोपणानंतर डॉक्टरांनी दिलेल्या औषधोपचार आणि जीवनशैलीचे काटेकोररित्या पालन करणे महत्त्वाचे ठरते.शरीराने बाहेरचा अवयव स्विकारावा म्हणून इम्युनोसप्रेसंट औषधे दिली जाऊ शकतात,ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते.अशा परिस्थितीत अधिक काळजी घेणे गरजेचे असते.
 
निरोगी जीवनशैली मुत्रपिंडाच्या निगडित आजारांपासून आपल्याला लांब ठेऊ शकते.योग्य प्रमाणात पाणी पिणे, सकस आहार घेणे,नियमित व्यायाम करणे,रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवणे मुत्रपिंडाच्या आजारापासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. मुत्रपिंडाच्या आजारावर प्रतिबंध व उपचारांसाठी योग्य वेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे.

About Author

dr stock

Dr. Atul D. Sajgure

    Book Appointment

    For a quick response to all your queries, do call us.

    Patient Feedback

    Expert Doctors

    [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1252" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
    Emergency/Ambulance
    +91-88888 22222
    Emergency/Ambulance
    +91-88062 52525
    Call Now: 88888 22222