लेख लिहिण्यास कारण की’
‘राखी सावंत’ आपली मराठी नटी हो….. ‘बिग बॉस’ मधली वय वर्ष ४२ गरोदर होणार ही बातमी वाचली. आणि आता माझ्या पेशंट….
- ‘श्रुतिका’ वय वर्ष बत्तीस नुकताच विवाह झालेला सडपातळ उंच सुडौल म्हणजे तिच्याकडे बघून वाटत नाही की ती सध्या बत्तीस वर्षाची आहे क्लिनिक मध्ये मला भेटायला आली होती कारण तिला अजून दोन वर्ष तरी मूल नको होते त्यासाठी लागणाऱ्या योग्य गर्भनिरोधकांचे मार्गदर्शन तिला हवे होते.
- ‘रावी’ वय वर्ष २८ लग्नाला दोन वर्षे झाली होती आणि तिच्या वैद्यकीय तपासण्यांनंतर तिला टेस्ट ट्यूब बेबी हीच ट्रीटमेंट सांगण्यात आली होती.
- ‘नम्रता’ वय वर्ष 30 सध्या गरोदर होती परंतु अजून एक वर्ष तरी तिला मूल नको होते त्यामुळे गर्भपात करून घेण्याची तिची इच्छा होती.
वरील तिघींचा विचार करताना एक गोष्ट लक्षात आली की या तिघींनी त्यांच्या आयुष्याचे आर्थिक दृष्टीने योग्य असे वेळापत्रक बनवले होते म्हणजे लग्नानंतर साधारण दोन वर्ष व्यवस्थित जम बसल्यानंतर मग गरोदर व्हावे आणि मुलाची जबाबदारी स्विकारावे असा त्यांचा विचार होता आणि त्यामध्ये चुकीचे असे काहीच नव्हते परंतु एक महत्त्वाची गोष्ट या मुली वेळापत्रक तयार करताना विसरल्या होत्या ते म्हणजे त्यांचे ‘वय’!
आपल्याकडे सर्वसाधारणपणे लग्नानंतर दोन वर्षांनी ‘मूल’ होऊ देण्याविषयी विचार करण्याचे नवीन लग्न झालेली जोडपी ठरवतात. ही दोन वर्षे एकमेकांबरोबर जमवून घेणे आणि त्यांचा आर्थिक दृष्ट्या जम बसवणे यादृष्टीने त्यांनी ठरवलेली असतात. या सर्व बाह्य गोष्टींचे प्लॅनिंग किंवा वेळापत्रक ठरवताना आपल्या शरीराचे ही एक घड्याळ असते(biological clock) आणि त्याप्रमाणे योग्य वेळेला योग्य गोष्टी होणे गरजेचे असते हे कित्येक जोडप्यांच्या लक्षातच आलेले नसते. ही गोष्ट लक्षात न येण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे असणारा ‘प्रजननक्षमता आणि लैंगिक’ (fertility and sexual)शिक्षणाचा अभाव!
इंग्लंड सारख्या देशात ज्या वेळेला वंध्यत्वाचे(infertility) प्रमाण वाढायला लागले त्याकाळी वंध्यत्वाच्या(infertility) या वाढत्या प्रमाण मागची कारणे शोधून काढण्यासाठी अभ्यास करण्यात आला त्यावेळी असे लक्षात आले की बहुतांश जोडप्यांना वंध्यत्व आणि कमीप्रजनन क्षमता (subfertility)यावर वाढत्या वयाचा अतिशय मोठा प्रभाव असतो हे माहीत नव्हते.
या अभ्यासातील निष्कर्षाला अनुसरून इंग्लंड मधील वंध्यत्वाचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या यामधील सर्वात महत्वाची उपाययोजना म्हणजे मुलामुलींना योग्य वयात लैंगिक शिक्षणाबरोबरच प्रजननक्षमतेच्या विषयी शिक्षण देण्यावर भर देण्यात येऊ लागला.(targeted education about fertility potential) मुळातच मूल असावे की नाही हा ज्या त्या जोडप्याचा वैयक्तिक प्रश्न आहेत परंतु मूल असावे असे वाटत असेल तर जोडप्याच्या प्रजननक्षमतेवर (fertility potential)वयाचा होणारा परिणाम हा मुला-मुलींना माहीत असणे गरजेचे आहे.
जेव्हा आपण प्रजनन क्षमतेविषयी विचार करतो त्या वेळेला कोणत्याही स्त्रीचे वय हे दोन प्रकारे मोजावे लागते.
- शारीरिक वय
- अंडाशयाचे वय(Ovarian age)
शारीरिक व याविषयी आपण सर्वजणी जाणता पण अंडाशयाचे वय(Ovarian age() म्हणजे काय हे आज जाणून घेऊ या. तुम्हाला माहित असेलच की स्त्रीबीज(ovum or eggs) हे अंडाशयामध्ये(inside ovary) तयार होत असतात आणि हे स्त्री बीज चांगले असणे हे ‘उत्तमप्रजननक्षमतेसाठी'(good fertility of couple) आवश्यक असते
शारीरिक वया बरोबरच अंडाशयाचे वयही वाढते आणि हळूहळू स्त्रीची प्रजनन क्षमता कमी कमी होऊ लागते सरळ सरळ नियम! परंतु कित्येक वेळा अंडाशयाचे वय हे शरीराच्या वया पेक्षा जास्त असू शकते आणि त्यामुळे स्त्रीची प्रजननक्षमता (fertility)ही शारीरिक वय कमी असूनही लवकर लवकर कमी होत जाते याच कारणांमुळे कित्येक स्त्रियांना शारीरिक वय कमी असताना रजोनिवृत्ती(menopause) येते कारण जरी त्यांचे शारीरिक वय कमी असले तरी अंडाशयाचे वय मात्र पटापट वाढलेले असते.
अंडाशयाच्या या वयाबद्दल आणि त्याच्या कमी होत जाणाऱ्या प्रजनन क्षमतेविषयी ‘सेलिब्रेटी’ नेहमीच जागरूक आणि काळजीत असतात म्हणून आपण नेहमी बातम्या वाचतो की अमुक अमुक नटीने तिचे स्त्रीबीज योग्य वयातच शरीराबाहेर काढून ठेवले आहेत आणि आता ती गरोदर राहू इच्छी ते तेव्हा आता ती त्या स्त्रीबिजांचा वापर करणार आहे.(म्हणूनच आपली ‘राखी सावंत’ ४२ व्या वर्षी गरोदर होऊ शकत होती) वैज्ञानिक प्रगतीमुळे हे आता शक्य झाले आहे आणि नवीन पिढी या विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. (Preservation of eggs)
Have queries or concern ?
आता पुढचा प्रश्न असा आहे की मग ह्या अंडाशयाच्या वया विषयी आपण जाणून घेऊ शकतो का? तर या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आहे काही महत्त्वाच्या तपासण्या करून तुम्ही तुमच्या अंडाशयाच्या क्षमतेविषयी जाणून घेऊ शकता . या चाचण्या जरी अगदी शंभर टक्के खऱ्या नसल्या तरी आपल्याला साधारणपणे या चाचण्यांवरून आपल्या ‘अंडाशयाच्या वयाचा’ अंदाज येऊ शकतो. नैसर्गिकरित्या गरोदर राहण्यासाठी नव्हे तर पुढे जाऊन ‘टेस्टट्यूब बेबी’ सारख्या उपाययोजनांची मदत घ्यावी लागली तरी त्यामध्ये सुद्धा अंडाशयाच्या वयाला महत्व आहे कारण टेस्ट ट्यूब बेबी सारख्या उपाययोजनांमध्ये सुद्धा चांगल्या प्रतीचे स्त्रीबीज मिळणे हे अंडाशयाच्या वयावरच अवलंबून असते.
तर मग गरोदर होण्यासाठी योग्य वय कोणते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जगातील वेगवेगळ्या मनुष्य प्रजातींचा अभ्यास करण्यात आला आणि त्यावरून असा निष्कर्ष निघाला की प्रत्येक प्रजातीसाठी हे वय वेगवेगळे आहे आपल्या भारतीय स्त्रीयांसाठी २४ते २६ वर्ष हा प्रजननासाठी चा उत्तम काळ समजला जातो. कारण या वयात मुलीच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली असते आणि निरोगी गर्भधारणा करण्याची क्षमता तिला मानसिक आणि शारीरिकरीत्या आलेली असते. सव्वीस वर्षानंतर मात्र भारतीय स्त्रियांची प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि कमी होण्याचा वेग हा प्रत्येक स्त्रीमध्ये कमी-अधिक असतो.
२४ ते २६वर्ष हा काळ नेमका मुलींच्या वयातला करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा काळ असतो सहाजिकच त्यामुळे मुली आणि मुले सुद्धा करिअरला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे आपोआपच लग्न आणि लग्नानंतर संतती हे मागे पडत जाते आणि एकदा संततीचा विषय मागे पडायला लागला की मग चार-पाच वर्षे अशीच निघून जातात जाग येते ती तिशी जवळ आल्यावर!
मग आता या सगळ्याचा सुवर्णमध्य कसा साधायचा? तर उत्तर असे आहे की तरुण मुला-मुलींमध्ये मध्ये प्रजननक्षमतेविषयी(fertility potential) जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे असे वाटते. लैंगिक शिक्षणाबरोबरच ‘प्रजननक्षमतेविषयी’ शिक्षण तरुण मुला-मुलींना द्यायला हवे. प्रजननक्षमतेवर होणारा वयाचा परिणाम तसेच इतर अनेक गोष्टी जसे की जीवनपद्धती(lifestyle) वजन जास्त असणे इत्यादी या गोष्टींचा परिणाम तरुण पिढीला माहीत असणे गरजेचे आहे.
अशा पद्धतीच्या जागरूकतेला ‘टार्गेटेड एज्युकेशन’ असे म्हणतात. हे सर्व माहीत करून घेतल्यानंतर तरुण पिढीला खरोखरच मुले असावीत की नाही? असली तर ती किती असावीत आणि कोणत्या वयात असावीत याविषयी निवड करणे सोपे जाईल आणि त्यांना त्यांच्या मताप्रमाणे योग्य तो पर्याय(informed choice) ‘योग्यवयात’ निवडता येईल.
प्रजननक्षमतेवर होणारा वयाचा परिणाम ज्ञात असताना सारासार विचार करून जो काही मार्ग तरुण जोडपी निवडतील त्याचा त्यांना भविष्यकाळात पश्चाताप होणार नाही. वंध्यत्वाकडे बघण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन, वंधत्वसाठी करावे लागणारे उपचार, त्यासाठी लागणारा वेळ त्यात येणारे अपयश यामुळे तरुण जोडप्यांची जी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक ससेहोलपट होते ती टाळण्यासाठी योग्य ‘वेळ’ साधणे हेच खरे उत्तर!
About Author
Dr. Archana Belvi
Gynecologist
Contact: +91 88888 22222
Email – ask@sahyadrihospitals.com
Patient Feedback
Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde
All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade
All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap
All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.