Home > Blogs > Gastroenterology > How to prevent Acidity
अॅसिडिटीला प्रतिबंध कसा करावा ?
आपण आतापर्यंत छातीत जळजळ होत असल्याची किंवा अॅसिडिटीची समस्या असल्याची तक्रार करणार्या अनेक व्यक्ती पाहिल्या असतील.मात्र अॅसिडिटी म्हणजे नक्की काय आणि ती कशी होते याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्याला ते समजावून घेणे आवश्यक आहे. अॅसिडिटी किंवा अॅसिड रिफ्लक्स ही अत्यंत सामान्य समस्या असून काही व्यक्तींमध्ये ती नियमित होणारी दिसून येते.
तरुणांमध्ये तर ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. बैठी जीवनशैली, सतत जंकफूड किंवा बाहेरील खाद्यपदार्थांचे सेवन यामुळे अॅसिडिटीने ग्रस्त होणार्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. छातीच्या खालील बाजूस जाणवणारी जळजळ ,पोटातील आम्ल अन्ननलिकेतून उलट्या दिशेने आल्यामुळे ही समस्या उद्भवते.
अॅसिडिटीची लक्षणे-
- पोटात जळजळ होणे, तसेच घशात व छातीत जळजळ होणे
- वारंवार व विनाकारण उचक्या किंवा ढेकर येणे
- छातीत जळजळ व वेदना होणे
- तोंडात दीर्घकाळपर्यंत आंबट चव राहणे किंवा तोंडाची चव कडवट होणेे
अॅसिडिटीची प्रमुख कारणे:
आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड असते,याची पातळी ही तीव्र असते.काही लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त होते.अन्ननलिका आणि पोटामध्ये एक वॉल्व्ह असतो जो या भागाला बंद ठेवतोे.काही लोकांच्या बाबतीत हा भाग खुला राहतो,ज्यामुळे पोटातील अॅसिड वारंवार वर येते.
अॅसिडिटी कमी कशी करावी?
- विशेषत: ज्या व्यक्ती रात्री उशिरापर्यंत काम करतात,ज्यांना झोपण्याचे कोणतेही वेळापत्रक नसते त्यांना अॅसिडिटीची समस्या अधिक असते. याबरोबरच मसालेदार,तेलकट,आंबट किंवा आंबलेले पदार्थ तसेच कॉफी व चहाचे सातत्याने सेवन करणार्यांना अॅसिडिटीची समस्या भेडसावू शके. म्हणूनच अॅसिडिटीची समस्या असणार्यांनी जिभेवर नियंत्रण ठेवावेे आणि शक्यतो अशा प्रकारचे अन्नपदार्थ मर्यादित प्रमाणात खावे.वेळ पडल्यास टाळावे.
- अॅसिडिटी टाळण्यासाठी अन्नाचे पचन व आतड्यांची योग्य हालचाल होणे आवश्यक आहे,म्हणून रोज किमान अर्धा तास व्यायाम करणे गरजेचे आहे.
- थंड दुधामुळे अॅसिडिटी वर काही प्रमाणात नियंत्रण मिळविता येते. परंतु दुधाचे प्रमाणाबाहेर सेवन करू नये ज्याचा परिणाम पुन्हा अॅसिडिटीमध्ये होऊ शकतो.
- कधीतरीच अॅसिडिटी त्रास होत असेल तर प्रत्येक वेळी डॉक्टरांना भेट देण्याची आवश्यकता नाही.आपली जीवनशैली सुधारावी. मात्र आपल्याला सतत अॅसिडिटीचा त्रास जाणवत असेल तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या तपासण्या करणे व औषधे घेणे गरजेचे ठरेल.
- काही वेळा औषधांमुळे देखील अॅसिडिटी होऊ शकते.
ऍसिड रिफ्लक्स ही गंभीर स्वरूपाची समस्या नाही परंतु तीव्र (क्रॉनिक) अॅसिडिटी) च्या समस्येमुळे इतर आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात आणि अन्न नलिकेत बिघाड होऊ शकतो. कधीकधी छातीत दुखत असल्यास त्याचे कारण अॅसिडिटी आहे, असे पण काही लोकांना वाटते.मात्र, छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जावे. औषधोपचार करूनही सातत्याने व तीव्र स्वरूपाची ऍसिडिटी होत असल्यास डॉक्टर किंवा तज्ञांचा सल्ला घेणे हेच योग्य ठरू शकते.
हायपरअॅसिडिटी
आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड हा एक पाचक रस निर्माण होत असतो,ज्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे अनेक सूक्ष्म कणात विघटन होऊन ते पचनास मदत करते. जेव्हा पोटात अधिक प्रमाणात हायड्रोक्लोरिक अॅसिड निर्माण होते,या स्थितीस हायपरअॅसिडिटी असे म्हणतात.
हायपरऍसिडिटी होण्यामागील प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे :-
आपल्या पोटात अॅसिडचे प्रमाण साधारण पीएच 4 इतके असते.याचाच अर्थ पोटात आम्लीय स्थिती अधिक असते, आपण खाल्लेल्या अन्नाबरोबरच पोटात येणारे अनेक जंतू या आम्लीय वातावरणात नष्ट होत असतात.
त्यामुळे ही अॅसिडीटी निर्माण होणे महत्त्वाचे असते. मात्र काहींच्या बाबतीत आम्लाचे प्रमाण हे आवश्यक पातळीपेक्षा जास्त प्रमाणात होत असते आणि त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो.
हायपरअॅसिडिटीची लक्षणे –
1) हृदय व छातीत जळजळ होणे
2) घशात जळजळ होणे
3) तोंडात दीर्घकाळ आंबट व कडवट चव राहणे व तीच चव घशात व तोंडात राहणे
4) छातीत वेदना होणे
5) कोरडा खोकला
6) दमा
7) क्रॉनिक सायनुसायटीस
8) कानाला वेदना होणे
हायपरअॅसिडिटी कशी बरी होऊ शकते
- जास्त प्रमाणात खारट,तेलकट,आंबट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळा.पोषक व संतुलित आहाराचे सेवन करावे.
- किमान अर्धा तास व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पचनास व आतड्यांच्या हालचालींसाठी मदत होते आणि हायपरअॅसिडिटीची समस्या टळू शकते. चालणे हा उत्तम व्यायाम आहे.
- हायपरअॅसिडिटी असलेल्या रुग्णांनी जड वस्तू उचलणे टाळावे.
- पोटातील स्नायूंवर अतिरिक्त ताण पडेल असे व्यायाम प्रकार टाळावेत.
- खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी,शारीरिक हालचाली, शिस्तबद्ध जीवनशैली, आणि कोणत्याही आरोग्यविषयक समस्येबद्दल डॉक्टरांशी संपर्क करणे योग्य ठरू शकतात.
Patient Feedback
Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde
All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade
All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap
All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.