कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे का?
गेल्या दहा वर्षांची तुलना करता कॅन्सररुग्णांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते. यामागे अनेक कारणे आहेत. बदलेली जीवनशैली, कॅन्सरच्या तपासण्या करुन घेण्याचं वाढलेलं प्रमाण अशा अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे कॅन्सररुग्णांच्या संख्येतील वाढ, असे म्हणता येईल.
आपल्या दैनंदिन जीवनात झालेल्या बदलांची यात मोठी भूमिका आहे. मग ते बदल बाहेरचे म्हणजेच वातावरणीय असतील किंवा अंतर्गत म्हणजे जीवनशैलीत झालेले बदल असतील. पाश्चात्य जीवनशैलीचा सरसकट स्वीकार होताना दिसतो.
त्यातूनच मग फास्ट फूड कल्चर आपल्याकडे रुजतं आहे. सहज उपलब्ध असणारे फास्ट फूड, शारीरिक व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनता, स्थुलत्वाचे वाढते प्रमाण हे सारं या जीवनशैलीशी संबंधित आहे. याच संदर्भाने, स्त्रियांच्या बाबतीत काही महत्त्वाची निरीक्षणे सांगता येईल.
उशीरा लग्न होणे, पहिल्या अपत्यास लागणारा विलंब, या गोष्टी स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवतात. आपल्या जीवनशैलीतील आरोग्यास हानीकारक असणाऱ्या सवयींचा शरीरावर हळूहळू परिणाम होत असतो आणि काही वर्षांमध्ये मग आजारांना निमंत्रण मिळू लागते. कॅन्सरबाबतही असेच म्हणता येईल.
कॅन्सर हा वय बघून होतो का?
पूर्वी असं म्हटलं जायचं की कॅन्सर हा वयस्क लोकांमध्येच अधिक आढळतो. पण आता कमी वयातल्या लोकांमध्येही कॅन्सरचा शिरकाव झालेला पाहायला मिळतो आहे. ज्याप्रमाणे हृदयरोग तरुणांमध्येही अधिक प्रमाणात आढळू लागला आहे, तसेच कॅन्सरचे प्रमाणही वाढू लागलेले दिसते. कॅन्सरला आता वय बघून होत नाही. तो कुणामध्येही आढळू शकतो.
Testing
अनुवंशिकता आणि कॅन्सर यांचा संबंध आहे? त्यांना प्रतिबंध करता येऊ शकतो का?
अनुवंशिकतेमुळेही कॅन्सर होऊ शकतो. मात्र, त्याचे प्रमाण १० ते १५ टक्के आहे. अनुवंशिकतेमुळे होणाऱ्या कॅन्सरमध्ये प्रामुख्याने स्तनाचा कॅन्सर (breast cancer), अंडाषयाचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, प्रोस्टेटचा कॅन्सर यांचे प्रमाण अधिक आढळते.
अनुवांशिकतेमुळे उद्भवू शकणाऱ्या कॅन्सरमध्ये आतड्यांच्या कॅन्सरचाही समावेश होतो. एखाद्या रुग्णाला कॅन्सर नाही, मात्र जनुकीय तपासणी केल्यानंतर काही एब्नॉर्मलीटी दिसून आली तर अशा रुग्णांना अनुवंशिकतेमुळे कर्करोगाचा धोका आहे, हे लक्षात येतं आणि त्यावर आधीच उपचार करुन संभाव्य कॅन्सरपासून त्याचा बचाव करता येऊ शकतो.अनेकांनी त्याचा प्रत्यय घेतला आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्या सर्वांच्या परिचयाची हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना ज्युली हिचं देता येईल. तिने जनुकीय चाचणी केली. त्यात तिला बीआरसीए नावाच्या जनुकाची एबनॉर्मलिटी आढळली. मग तिने स्वतःला बायलॅटरल प्रोफायलॅटिक मॅस्टिक्टोमी (bilateral prophylactic mastectomy) करुन घेतली आहे.
या प्रक्रियेत, कोणत्याही जेनेटिक एबनॉर्मेलिटीचे रुपांतर कॅन्सरमध्ये होण्याआधी आपण तो धोका कमी करु शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला स्तनाचा कर्करोग आहे आणि आपण त्या रुग्णाची जनुकीय चाचणी केली आणि त्यात बीआरसीए जनुक खराब आढळले तर त्या रुग्णात ओव्हेरियन कॅन्सरचा धोका आपण कमी करु शकतो.
दोन्ही बाजूचे अंडाषय काढून भविष्यात उद्भवू शकणाऱ्या ओव्हेरियन कॅन्सरचा धोका ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणात आपण कमी शकतो. वैद्यकशास्त्र आता इतके प्रगत झाले आहे, की जेनेटिक टेस्टिंग आणि प्रोफायलॅटिक मॅस्टिक्टोमीसारख्या शस्त्रक्रियांमुळे आता आपण अनुवंशिकतेमुळे उद्भवू शकणाऱ्या कॅन्सरला प्रतिबंध घालू शकतो.
कॅन्सरची चाहूल लागल्यानंतर रुग्णाने नेमके काय करायला हवे? निदान ते उपचार हा प्रवास कसा असतो?
जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कॅन्सरसदृश्य लक्षणं दिसू लागतात तेव्हा ती अंगावर न काढता, मित्रपरिवार, शेजारीपाजारी यांना कोणतेही प्रश्न न विचारता थेट आपल्या फॅमिली डॉक्टर अथवा फिजिशियनकडे जाऊन योग्य वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा.
कॅन्सरची लक्षणे दिसू लागतात, तेव्हापासून ते कॅन्सरचे निदान होईपर्यंतचा टप्पा हा फार महत्त्वाचा आहे. कारण, कॅन्सरवरील उपचारानंतरची प्रगती ती ही या टप्प्यावर अधिक अवलंबून असते. थोडक्यात, लक्षणे आढळल्याचा काळ ते निदान होईपर्यंतचा काळ यात जितके अंतर कमी, तितकी उपचारात यश येण्याची शक्यता अधिक.
म्हणून जेव्हा कोणालाही कॅन्सर सदृश्य कोणतेही लक्षण आढळले तर वेळ जराही न दवडता तातडीने आपल्या फॅमिली फिजिशियनला भेटा, त्यांचा सल्ला घ्या. म्हणजे निदान लगेच होऊन उपचारही त्वरित सुरु करता येणे शक्य असते आणि जितक्या आधीच्या टप्प्यात उपचार सुरु होतात, तितका त्यास प्रतिसादही चांगला मिळतो आणि रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता वाढू शकते.
इथे, घाबरुन जाण्याची, भिण्याची किंवा कोणाला काय वाटेल याची चिंता करण्याची जराही गरज नाही. मनात धैर्य बाळगा, आत्मविश्वास राखा, उपचारांवर विश्वास ठेवा मग कॅन्सरचं आव्हान तुम्ही खंबीरपणे परतवून लावू शकता.
About Author
Patient Feedback
Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde
All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade
All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap
All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.