Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.
Home > Blogs > Oncology > स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान डॉक्टरांना विचारायचे प्रश्न

स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान डॉक्टरांना विचारायचे प्रश्न

अनेक वेळा रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचार करणारे कर्करोगतज्ञ/आँकोलॉजिस्टला कोणता प्रश्न विचारायचा याबाबत साशंकता असते.सर्वप्रथम म्हणजे कर्करोगाचे निदान झाल्याने धक्का बसलेला असतो आणि त्यातून बाहेर यायला थोडा वेळ लागतो.

आपल्या डॉक्टरांना विचारून सर्वोत्कृष्ट उपचार पर्याय जाणून घेण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी विचारायचे काही प्रश्न खालीलप्रमाणे.

यातील काही प्रश्न काही जणांना लागू होऊ शकतील किंवा काही जणांना लागू होऊ शकणार नाहीत. अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया सह्याद्रि हॉस्पिटल्समधील वरिष्ठ कर्करोग तज्ञ व आँकोलॉजी विभागाच्या संचालिका डॉ.शोना नाग यांच्याकडून.

स्तनांच्या कर्करोगासंबंधित डॉक्टरांना विचारायचे काही प्रश्न

प्रश्‍न 1. मला कोणत्या प्रकारचा स्तनाचा कर्करोग आहे? तुम्ही मला बायोप्सीचे परिणाम समजावून सांगू शकाल का?

स्तनाचा कर्करोग हा 3 वेगवेगळ्या प्रकारचे असून वैद्यकीय निर्णय हे या विशिष्ट प्रकारांवर अवलंबून असतात. यामध्ये मुख्यत: हार्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर, एचईआर2 पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आणि ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर यांचा समावेश आहे. हे अर्ली (प्राथमिक टप्प्यातील) प्रगत (अ‍ॅडव्हान्स्ड) किंवा मेटास्टॅटिक (इतर भागात पसरलेले) देखील असू शकते.

कर्करोगाच्या निदानाकरिता बायोप्सी आवश्यक असते,ज्यामध्ये पेशींचा नमुना प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात येतो. बायोस्पीद्वारे कर्करोगाचे निदान झाले की, एमआरआय, सीटी स्कॅन किंवा पेट -स्कॅनद्वारे कर्करोग कोणत्या टप्प्यात आहे हे समजते.

प्रश्‍न 2. स्तनाचा कर्करोग कोणत्या टप्प्यात आहे?

कर्करोग कोणत्या टप्प्यात आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यानुसार उपचारांचे नियोजन करता येते. स्तनाच्या कर्करोगाचे जितक्या लवकर निदान होईल तितके उपचाराचे परिणाम हे चांगले दिसू शकतात.जर एखाद्या व्यक्तीला पहिल्या ते तिसर्‍या टप्प्यात निदान झाल्यास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जाऊ शकतो.

जर ट्युमरचा आकार मोठा असेल तर,केमोथेरपीने आधी ट्युमरचा आकार कमी केला जातो.सध्या उपचारपध्दती आणि तंत्रज्ञानामधील मोठ्या प्रगतीमुळे उपचार सुसह्य झाले आहेत

प्रश्‍न 3.ट्युमरची ईआर पीआर आणि एचईआर2 स्थिती म्हणजे काय ?

ईआर किंवा हार्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह ट्युमर्स सामान्यत: हार्मोनल थेरपीजच्या उपचारांना चांगला प्रतिसाद देतात,तर एचईआर2 पॉझिटिव्ह ट्युमर्सकरिता केमोथेरपीसह टार्गेटेड थेरपीच्या उपचारांची आवश्यकता असते. याबाबत अधिक माहिती कर्करोगतज्ञांद्वारे दिली जाते.इस्ट्रोजेन रिसेप्टर्स असलेल्या स्तनाच्या कर्करोगांना ईआर-पॉझिटिव्ह कर्करोग म्हणतात.

प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर्स असलेल्या स्तनाच्या कर्करोगाला पीआर-पॉझिटिव्ह कर्करोग म्हणतात.एचईआर2 हे एक प्रोटीन आहे जे स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी जलदरित्या वाढतात. एचईआर2 च्या सामान्य पातळीपेक्षा जास्त पेशी असलेल्या कर्करोगाला पेशींना एचईआर2 -पॉझिटिव्ह म्हणतात.

प्रश्‍न 4. माझ्यासाठी कोणत्या उपचार पर्याय योग्य आहे आणि का?

उपचार सुरू करण्यापूर्वी संपूर्ण उपचाराचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे – सामान्यत: शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि वैद्यकीय चिकित्सा हे सर्व 3 उपचार आवश्यक असतात. उपचार सुरू करण्यापूर्वी सुरुवातीस योग्य क्रम ठरवावा लागतो.

प्रश्‍न 5. शस्त्रक्रियेआधी कुठला उपचार पर्याय निवडला जाऊ शकतो का?

आजच्या काळात अनेक रूग्णांच्या बाबतीत शस्त्रक्रियेआधी आम्ही टार्गेटेड थेरपी किंवा केमोथेरपीचा पर्यायाचा विचार करतो.यामुळे ट्युमरचा आकार कमी होतो,शस्त्रक्रियेचा आवाका कमी होतो आणि याबरोबरच या उपचारांची कार्यक्षमता देखील कळते.

काही प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीत ट्युमर पूर्णपणे जाण्याची साधारण 50 टक्के शक्यता असते.अशा रूग्णांच्या बाबतीत कर्करोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी असते.

हे जर झाले नाही आणि ट्युमर जर राहिला असेल तर कर्करोग पुन्हा होण्याची जोखीम कमी करण्यासाठी आणखी उपचार केले जाऊ शकतात.

Have queries or concern ?

    प्रश्‍न 6. प्रत्येक उपचाराचे उद्दिष्ट काय आहे? कर्करोगापासून मुक्तता मिळणे की केवळ आजारावर नियंत्रण मिळवून मला बरे वाटावे?

    हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून रुग्ण आणि कुटुंब त्यानुसार नियोजन करू शकतील.

    प्रश्‍न 6. प्रत्येक उपचाराचे उद्दिष्ट काय आहे? कर्करोगापासून मुक्तता मिळणे की केवळ आजारावर नियंत्रण मिळवून मला बरे वाटावे?

    हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून रुग्ण आणि कुटुंब त्यानुसार नियोजन करू शकतील.

    प्रश्‍न 7. माझ्यावर उपचार करणार्‍या टीममध्ये कोण कोण असेल ? प्रत्येक टीम सदस्याची भूमिका काय असते?

    स्तनाच्या कर्करोगावर उपचार केवळ एका तज्ञ व्यक्तीद्वारे केला जात नाही.यामध्ये शल्यविशारद व रेडिएशन आँकोलॉजिस्ट यांसह तज्ञ रेडिओलॉजिस्ट, परिचारिका, फिजिओथेरपीस्ट, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, जेनीटिसिस्ट आणि सायकोलॉजिस्ट यांचा समावेश असतो.या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणे महत्त्वाचे आहे,जेणे करून या सर्वांमध्ये पुरेसा संवाद असेल आणि रूग्णाला उपचारांचे सर्वोत्कृष्ट परिणाम मिळू शकतील.

    उपचारांच्याबाबतच्या या प्रश्‍नांबरोबरच उपचारांच्या दुष्परिणामांबाबत देखील अनेक प्रश्‍न लोकांच्या मनात असतात.उपचार करणार्‍या टीमला काही अन्य विचारायचे प्रश्‍न खालीलप्रमाणे

    प्रश्‍न 8. या उपचारांमुळे माझ्या दैनंदिन आयुष्यावर कोणता परिणाम होणार आहे ? मी माझी दैनंदिन कामे, व्यायाम करू शकेल का?

    हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण उपचारांदरम्यानच्या दिवसांचे व वेळेचे नियोजन तुम्ही करू शकता.

    प्रश्‍न 9. उपचारांचे दीर्घकालीन दुष्परिणाम काय आहेत?

    बहुतेक उपचार हे दीर्घकाळाचा विचार करता सुरक्षित असतात. परंतु अगदी कमी बाबतीत नसांना दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

    प्रश्‍न 10. या उपचारांमुळे गर्भधारणेच्या माझ्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो का?माझी प्रजनन क्षमता टिकवण्यासाठी काय करता येईल?

    स्तनाचा कर्करोग काही वेळा तरूण महिलांमध्ये होतो.आतापर्यंत लग्न न झालेल्या तरूण महिला किंवा दुसरे मूल व्हावे अशी इच्छा असलेल्या महिलांना त्यांची प्रजनन क्षमता टिकविण्याबाबत काळजी असते.यासाठी अनेक पध्दती आहेत,म्हणून याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

    प्रश्‍न 11. कर्करोग उपचाराच्या खर्चाबाबत साहाय्य लागल्यास मला मदत कोण करू शकेल?

    अनेक रूग्णालयांमध्ये संपूर्ण उपचार परवडू न शकणार्‍या किंवा विमा नसलेल्या रूग्णांसाठी निधी उपलब्ध असतो.अनेक खासगी ट्रस्ट देखील मदतीसाठी पुढे येतात.काही सरकारी योजनांद्वारे देखील मोफत उपचार होऊ शकतात.

    प्रश्‍न 12. मला आणि माझ्या कुटुंबाला भावनिक आधार कोण देऊ शकते?

    यासाठी सपोर्ट ग्रुप्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.यामधील सदस्य तुमच्या निदान आणि उपचारादरम्यान तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात.कर्करोगाशी यशस्वी लढा दिलेेले रूग्ण व मानसोपचारतज्ञ हे या टीमचा भाग असतात व ते मदत करू शकतात.

    स्तनाचा कर्करोग असलेल्या प्रत्येक रूग्णाला ही माहिती मिळण्याचा हक्क आहे. आपल्या डॉक्टरांना हे प्रश्‍न विचारायला घाबरू नका.माहिती मिळाल्याने रोगाशी अधिक प्रभावीपणे लढता येईल.

    आपल्या कर्करोगतज्ञांशी भेटण्याआधी प्रश्‍नावली तयार करून महत्त्वाचे मुद्दे विसरू नका. ही यादी केवळ मार्गदर्शक असून याशिवाय तुमच्या मनात अधिक प्रश्‍न असतील तर ते जरूर विचारा.

    About Author

    dr-supriya-puranik

    Dr. SHONA NAG

    Sr Medical Oncologist Specialties and Director Oncology Dept
    Contact: +91 88888 22222
    Email – [email protected]

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222