Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > Oncology > हर टू (HER2)पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरवर लक्षित थेरपी प्रभावकारक

हर टू (HER2)पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरवर लक्षित थेरपी प्रभावकारक

सर्व स्तनांच्या कर्करोगांमध्ये हर टू पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण 15 ते 20 टक्के असते.1990 च्या दशकात जेव्हा पहिल्यांदा या प्रकारच्या स्तन कर्करोगाविषयी माहिती समोर आली,तेव्हा यावर फारसे परिणामकारक उपचार उपलब्ध नव्हते.उपचारच केले नाहीत तर,या प्रकारचा कर्करोग अग्रेसर होऊन जलद गतीने पसरायचा आणि बर्‍याचदा मेंदूपर्यंत पण पोहचायचा.अशा रूग्णांमध्ये जगण्याचे प्रमाण एक वर्षाहून कमी होते.मात्र गेल्या दोन दशकांत हर टू पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांत लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत.अशा प्रकारचा कर्करोग फैलावणार्‍या हर टू जनुकीय घटकांवर लक्ष्य केंद्रित करून उपचार करणारी आता सुमारे 8 चांगली औषधे उपलब्ध झाली आहेत.

हर टू पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर मध्ये ह्युमन एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर टू हा हर टू नावाचा प्रथिनाचा घटक असतो.या प्रथिनामुळे कर्करोगाच्या पेशी वाढत जातात.

2000 साली हर टू पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरवर पहिल्यांदा यशस्वीरित्या उपचाराची माहिती समोर आली.चौथ्या टप्प्यातील अशा प्रकारचा कर्करोग असलेल्या महिलेला ट्रास्टुझुमाब हे अँटी हर टू अँटीबॉडी असलेले औषध केमोथेरपीसह देण्यात आले आणि ही महिला फक्त केमोथेरपीवर सहा महिने जगली.त्यानंतर ट्रास्टुझुमाब हे स्तन कर्करोगाच्या प्राथमिक टप्प्यातील महिलांना देण्यात येऊ लागले आणि त्यामुळे पुन्हा होण्याची शक्यता अर्ध्याहून कमी झाली.

लॅपाटिनीब हे हर टू ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारावर दुसरे औषध होते,जे तोंडावाटे घ्यायचे असते. ट्रास्टुझुमाबचा परिणाम थांबलेल्या व प्रामुख्याने चौथ्या टप्प्यातील कर्करोग असलेल्या महिलांमध्ये हे उपयुक्त ठरले. लॅपाटिनीब नंतर परटूझुमाब हे औषध आले. ट्रास्टुझुमाब व परटूझुमाब चे एकत्रीकरण करून केमोथेरपीसह चौथ्या टप्प्यातील हर टू पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णांचे जगण्याचे प्रमाण 3.5 वर्षांपासून 5 वर्षांपर्यंत वाढले.त्यामुळे यकृत,फुफ्फुस व हाडांमध्ये कर्करोग पसरलेल्या महिलांनी या उपचाराला प्रतिसाद दिला तर पाच वर्षे चांगल्या पध्दतीने जगू शकतात..

आणखी एक नवीन औषध म्हणजे टीडीएम1. हे एक प्रभावी तंत्रज्ञान आहे,ज्यामध्ये केमोथेरपीचे औषध या अँटीबॉडीच्या आतमध्ये टाकले जाते.जेव्हा रूग्णाला हे औषध दिले जाते तेव्हा ते थेट कर्करोगग्रस्त पेशींपर्यंत दिले जाते.हा खर्‍या अर्थाने लक्षित दृष्टीकोन आहे.अँटी हर टू थेरपीज चे दुष्परिणाम देखील कमी असतात आणि महिला चांगले आयुष्य जगू शकतात.ही सर्व औषधे भारतात उपलब्ध आहेत.

याशिवाय ज्या महिलांमध्ये स्तनामधील कर्करोगाच्या ट्युमरचा आकार 2 सेमी पेक्षा जास्त आहे,अशांना शस्त्रक्रियेआधी केमोथेरपीबरोबर हर टू थेरपी दिली जाते. यामुळे ट्युमरचा आकार कमी होतोच,शस्त्रक्रिया देखील चांगल्या पध्दतीने करता येते आणि ट्युमर काढताना काही मागे राहिले आहे का,हे देखील सांगता येते.जर काही कर्करोग मागे राहिला असेल तर टीडीएम1 चे उपचार यामध्ये समाविष्ट केले जातात. ट्रास्टुझुमाब केमोथेरपीबरोबर वापरले गेल्यास 30 टक्के महिलांमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान हा आजार आढळून येत नाही.मात्र ट्रास्टुझुमाब व परटूझुमाब केमोथेरपीबरोबर वापरले तर 60 ते 70 टक्क्यांपर्यंत हे प्रमाण वाढते.अशा महिलांना उपचारांमध्ये चांगले परिणाम दिसून येतात.

हर टू पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारावर टुकाटिनीब आणि टीडीएक्सडी सारखी औषधे परदेशांत उपलब्ध आहेत आणि चौथ्या टप्प्यातील रूग्णांवर विशेष करून मेंदूत फैलाव झालेल्या रूग्णांवर हे उपयुक्त ठरले आहे.

दोन दशकांपूर्वी उपचार नसलेला म्हणून मानला जाणार्‍या हर टू पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरवर लक्षित थेरपीजमुळे प्रभावी उपचार उपलब्ध झाले आहेत.येत्या काळात यामध्ये अजून सुधारणा होऊन अशा रूग्णांना केमोथेरपी विरहित फक्त अँटी हर टू अँटीबॉडीजने उपचार केले जातील.

Have queries or concern ?

    About Author

    dr-supriya-puranik

    Dr. SHONA NAG

    Sr Medical Oncologist Specialties and Director Oncology Dept
    Contact: +91 88888 22222
    Email – [email protected]

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222