Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > Oncology > कर्करोगाच्या उपचारांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन,संयम,सातत्य महत्वाचे असते.

कर्करोगाच्या उपचारांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन,संयम,सातत्य महत्वाचे असते.

National Cancer Survivors Day

अनेकवेळा कर्करोगामुळे होणारे मृत्यु टाळण्याजोगे असतात,मात्र अंतिम टप्प्यात उपचारासाठी आल्यामुळे हे शक्य करणे कठीण जाते.म्हणूनच काही लक्षणे जाणवल्यास लगेचच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.दुसरीकडे कर्करोग होऊ नये म्हणून लोकांनी आपल्या जीवनशैली आणि सवयींबाबत जागरूक राहावे,आहाराबाबत चांगले पर्याय निवडावे.

महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग हा सामान्यत: आढळून येतो.चाळीशीच्या वरील महिलांनी नियमितपणे तपासण्या,गाठींची स्वपरीक्षा इत्यादी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.ज्यांच्या कुटुंबामध्ये कर्करोगाचा वैद्यकीय इतिहास आहे,त्यांनी विशेष करून काळजी घ्यावी.

कर्करोगाच्या उपचारामध्ये सातत्य व संयम हे अतिशय महत्त्वाचे असते आणि नेमक्या याच गोष्टींसमोर कोरोना महामारीमुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे.त्याचा विपरीत परिणाम जगभर दिसून आला.मात्र कर्करोग रुग्णांना वैद्यकीय दृष्ट्या प्रगतीपथावर येण्यासाठी उपचारांतील सातत्य हा एकमेव मार्ग आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक सुसह्य

कर्करोगाच्या उपचारांमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत.केमोथेरपी,रेडिएशन थेरपी सह इम्युनो थेरपी,लक्षित थेरपी,रोबोटिक शस्त्रक्रिया,जेनेटिक कन्सल्टेशन अशा अनेक अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत.रेडिएशन व केमोथेरपीचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी नवीन तंत्र विकसित झाले आहेत.गरज आहे ती वेळेवर निदान होण्याची आणि इथेच आपण मागे राहिलो आहे.

कर्करोगाचे वाढते प्रमाण बघता प्रतिबंधात्मक उपाय देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.त्यामध्ये योग्य आहार,तंबाखु-धुम्रपानासारख्या चुकीच्या सवयी टाळणे,वजन नियंत्रणात ठेवणे,चाळीशीपुढील महिलांनी नियमित चाचण्या करून घेणे यांचा समावेश आहे.स्तनामध्ये गाठी,सतत खोकला,लाळेमध्ये रक्त,मलामध्ये रक्त,न समजलेला रक्ताशय अशी जर लक्षणे असतील तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. एकंदरच कर्करोगाचा सामना करण्यासाठी योग्य वेळी निदान व योग्य उपचाराबरोबरच सकारात्मक दृष्टीकोन तितकाच महत्त्वाचा आहे.

Have queries or concern ?

    About Author

    dr-supriya-puranik

    डॉ.शोना नाग

    वरिष्ठ कर्करोग तज्ञ व आँकोलॉजिस्ट विभागाच्या संचालिका,सह्याद्रि हॉस्पिटल्स
    Contact: +91 88888 22222
    Email – [email protected]

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222