Home > Blogs > Neonatology > नवजात बालकांमधील आजार
नवजात बालकांमधील आजार

नवजात बालकांमध्ये जन्मतः काही अनुवंशिक समस्या असू शकतात किंवा ही बालके सहजरित्या संसर्गाने देखील बाधित होऊ शकतात. नव्यानेच माता-पिता झालेल्यांनी नवजात बालकांना आरोग्याच्या कोणत्या सामान्य समस्या असू शकतात आणि या समस्या कशा हाताळाव्यात हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जेणे करून शक्य तितक्या चांगल्या प्रकारे आपल्या बाळाची काळजी घेता येईल.
नवजात बालकांना नियमितरीत्या स्तनपान दिले जात असेल आणि बाळाच्या आसपासचे लोकं नियमितपणे स्वच्छता बाळगत असतील तर, ती नवजात बालकांना शक्यतो सहजपणे कोणताही आजार होत नाही. मात्र असे असूनही भारतात 100 पैकी 3 बालके आजारी पडतातच.
भारतातील नवजात बालकांना होणारे सर्वसामान्य आजार पुढीलप्रमाणे :
मुदतपूर्व जन्मलेली किंवा कमी वजनाची बालके
जी बालके मूदतपूर्व जन्माला येतात त्यांना प्रिमॅच्युअर असे म्हणतात.अशा जन्मलेल्या बालकंाचे वजन कमी असते, ही सुद्धा एक समस्या असून हे जन्म दर कमी होण्याचे एक कारण आहे. भारतात अंदाजे 40 टक्के नवजात बालकांचे वजन हे 2.5 किलोहून कमी असते. त्यातही 2 किंवा 1.5 किलो वजनाच्या बालकांना जन्मतः अधिक समस्या असू शकतात. तसेच या बालकांमध्ये तापमानही नियंत्रण प्रणालीच्या समस्या उद्भवू शकतात.
या बाळांना स्तनपान करताना समस्या उद्भवतात. त्यांना कावीळ होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यामुळेचअशा बालकांना अधिक देखरेखीसाठी बालरोग चिकित्सा अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. भारतात सुमारे 15 टक्के बालके मुदतपूर्व जन्माला येतात व त्यांना बालरोग चिकित्सा अतिदक्षता विभागाची आवश्यकता भासते.
जंतुसंसर्ग
नवजात बालकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असते व त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. आपले हात व कपडे यांमुळे देखील संसर्ग होऊ शकतो, म्हणूनच बाळाच्या आजूबाजूला असणार्या व बाळाला हाताळणार्या सर्वांनी स्वच्छ राहणे आणि बाळाशी संपर्क येण्यापूर्वी आपले हात धुऊन स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
याशिवाय न्युमोनिआ, रक्तातील संसर्ग,मेंदूत होणारा संसर्ग असे अनेक आजार नवजात बालकांना होऊ शकतात.जर अशा प्रकारचा संसर्ग होऊन बालकाला त्रास झाल्यास अशा परिस्थितीत त्यांना बालरोग चिकित्सा अतिदक्षता विभागात दाखल करावे लागते. हे सामान्य आढळणार्या आजारांपैकी आहेत.
कावीळ
संपूर्ण जगभरातील नवजात बालकांना होणारा सर्वात सामान्य आजार म्हणजे कावीळ. बाळाचे यकृत सक्षम नसल्यामुळे ही कावीळ होत असून त्यास फिजिओलॉजीकल जाँडीस असे म्हणतात. मात्र फक्त 5 ते 6 टक्के बालकांना गंभीर स्वरूपाच्या कावीळीचा सामना करावा लागत असून त्यांना ङ्गोटोथेरपी चे उपचार घ्यावे लागतात. ही बालके 3 ते 4 दिवसात बरी होतात. परंतु जर मातेचा रक्तगट निगेटिव्ह किंवा ओ पॉझिटिव्ह असेल तर बाळाचा रक्तगट जरी पॉझिटिव्ह किंवा ए किंवा बी असूनही त्याच्या रक्तातील रक्तपेशींचे वेगाने प्रभावी होऊ शकतात.त्यामुळे कावीळीची तीव्रता अधिक वाढते.
थोडक्यात सांगायचे झाल्यास ज्या नवजात बालकांचा रक्तगट निगेटिव्ह किंवा ओ पॉझिटिव्ह असतो,अशा बालकांच्या मातांना विशेष काळजी घ्यावी लागते.यापूर्वी अशा बालकांच्या रक्ताचे संपूर्ण संक्रमण करून त्यांना वाचविण्यात येत होते. परंतु आता उत्कृष्ट दर्जाचे अतिदक्षता उपचार आणि फोटोथेरपी यामुळे ही बालके 3 ते 5 दिवसांत बरी होतात.
श्वास घेण्यास अडथळे
बाळाच्या फुफ्फुसातील सर्फेक्टंटची पातळी कमी झाल्याने त्याला श्वास घेण्यास अडचणी येतात आणि म्हणूनच बाळाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते. या अवस्थेला वैद्यकीयभाषेत आरडीएस (रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम) असे म्हणतात.
जन्मजात दोष
एकूण 3 ते 5 टक्के बालके काही दोषांसह जन्माला येतात या अवस्थेला जन्मजात विकार किंवा काँजिनेटल डिसऑर्डर असे म्हणतात. यांतील 40 ते 50 टक्के समस्या गर्भावस्थेच्या प्राथमिक टप्प्यात सोनोग्राफीमुळे समजू शकतात. परंतु सर्व प्रकारच्या आजारांचे निदान सोनोग्राफी ने होऊ शकत नाही. 3 ते 5 टक्के बालके जन्मजात विकारांमुळे ग्रस्त असतात,ज्यामध्ये त्यांना हृदय किंवा मेंदूशी संबंधित आजार असू शकतात. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करावे लागते.
नवजात बालकांना असलेल्या बहुतांश सर्वसाधारण समस्या ही बालके जसजशी वाढू लागतात व शारीरिक दृष्ट्या सक्षम होतात तसतशा बर्या होत जातात आणि ही बालके सुद्धा हळुहळु या समस्यांचा सामना करण्यास शिकतात.त्यामुळे अशा रोगांना घाबरून जाऊ नये फक्त योग्य वेळी काळजी घ्यावी.त्यासाठी पालकांनी नवजात बालकांच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्या बाळाला नियमितपणे बालरोगतज्ज्ञाकडे नेऊन त्याच्या तपासण्या व लसीकरण करणे,त्याचप्रमाणे बाळाला वाढवताना नियमित स्वच्छता व आरोग्य उपाययोजना यांचे पालन करावे.
Have queries or concern ?
About Author
Patient Feedback

Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde

All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade

All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap

All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.