Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > Neonatology > नवजात बालकांमध्ये कावीळीची जोखीम कोणाला जास्त असते?

नवजात बालकांमध्ये कावीळीची जोखीम कोणाला जास्त असते?

Dr. Pradeep Suryawanshi | Neonatologist
jaundice-in-newborns-in-marathi

जन्मानंतर अनेक बालकांना कावीळ होते. मुदतपूर्व जन्माला आलेल्या बालकांमध्ये हे प्रमाण थोडे जास्त दिसून येते. ज्यांचे वजन 1800 ग्रॅम पेक्षा कमी असतेे,अशांमध्ये कावीळ जास्त दिसून येते आणि या बालकांना नवजात अतिदक्षता विभागात उपचार दिले जातात. मात्र ज्या बालकांना पहिल्याच दिवशी कावीळ होते,त्यांच्यावर मात्र लगेचच उपचार करण्याची गरज असते.

फिजिओलॉजिकल कावीळ व पॅथालॉजिकल कावीळ म्हणजे काय?

नवजात बालकांमध्ये यकृत पुरेसे विकसित झालेले नसल्याने रक्तातील बिलीरूबिन हा पिवळा घटक पूर्णपणे बाहेर काढला जात नाही.अतिरिक्त बिलीरूबीन साठल्यावर त्वचा आणि डोळे हे पिवळे दिसायला लागतात.या स्थितीला लहान मुलांमधील सामान्य किंवा फिजिओलॉजिकल कावीळ असे म्हणतात.

तर ज्या बाळांना उपचारांची आवश्यकता असू शकते याला पॅथालॉजिकल कावीळ असे म्हणतात. या प्रकारची कावीळ तिसर्या किंवा चौथ्या दिवशी सुरू होते आणि आठवड्याने कमी व्हायला लागते.बहुतांश बालकांमध्ये हे आढळून येते,त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.

नवजात बाळांमध्ये काविळीचे निदान कसे केले जाते ?

नवजात बाळांमध्ये काविळीचे निदान करण्यासाठी ट्रान्सक्युटेनियस बिलीरूबिनोमेट्री या उपकरणाद्वारे चाचणी केली जाते.तसेच बाळामध्ये पिवळसरपणा दिसणे,बाळाचे वजन तपासणे,उपकरणाद्वारे कावीळीची पातळी तपासणे, कावीळीची पातळी जास्त असेल तर रक्ताचा नमुना घेऊन चाचणी केली जाते.

Have queries or concern ?

    About Author

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222