Free ebooks Library z-lib project

Home > Blogs > Gastroenterology > यकृताचे आजार

यकृताचे आजार

Liver Disease and Treatment

1) मद्यपानामुळे होणारे यकृताचे आजार : जास्त प्रमाणात आणि दीर्घकालीन मद्यसेवन केल्यामुळे यकृताचे आजार होतात. मद्यपानामुळे यकृताच्या रक्त तपासण्यांमध्ये दोष आढळणे,फॅटी लिव्हर (यकृतातील चरबीचे प्रमाण वाढणे),हेपॅटायटिस,लिव्हर सिऱ्होसिस ,कर्करोग होणे इत्यादी व्याधी उद्भवतात.

 • अल्कोहोलिक हेपॅटायटिस : ह्या आजारात तीव्र स्वरूपाची कावीळ होते. यकृताला सूज येऊन ते अतिशय मोठे होते आणि दुखू लागते. हा आजार खूप गंभीर स्वरूपाचा असतो आणि त्यामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता असते. काही वेळा यकृतामुळे मेंदूला सूज येऊन ग्लानी येणे,पोटात पाणी होणे, रक्त पातळ होणे अशा प्रकारच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. सुरुवातीच्या काळात अशा रुग्णांची भूक मंदावलेली असते.
 • अल्कोहोलिक सिरॉसिस : मद्यपानामुळे कालांतराने यकृतावर व्रण होऊन सिऱ्होसिसमध्ये रुपांतर होते आणि यकृताचा बरा न होणारा आजार होतो.एकदा सिऱ्होसिस झाला की वारंवार पोटात पाणी होणे, रक्ताच्या उलटया होणे,कावीळ होणे,ग्लानी येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

2) विषाणूंमुळे होणारे यकृताचे आजार : विषाणु बी,सी,डी,ई,ए या प्रकारच्या यकृताच्या आजारांचे दोन भाग केले जातात. पहिल्या प्रकारात ए किंवा ई विषाणूंमुळे होणारी कावीळ मोडते.या प्रकारात दुषित पाणी अथवा अन्न पदार्थांचे सेवन केल्यामुळे कावीळ होते. हा आजार अल्पकाळासाठी असतो आणि अगदी क्वचित प्रसंगी रौद्ररूप धारण करतो. ए आणि ई विषाणूंची होणारी कावीळ यकृतावर दीर्घ परिणाम करत नाही.

दुसऱ्या प्रकारात बी,सी आणि डी विषाणूंमुळे होणारी कावीळ होते. दुषित रक्ताभिसरण, योनीसंबंध,सुयांचा वापर,इतर काही प्रक्रिया ( टॅटू, अस्वच्छतापूर्वक पद्धतीने केलेली प्रक्रिया) या कारणांमुळे अशा प्रकारची कावीळ होते. यकृतावर दीर्घकालीन परिणाम दिसू शकतात. दीर्घकालीन हेपॅटायटिस, लिव्हर सिऱ्होसिस , अथवा यकृताचा कर्करोग इत्यादी परिणाम आढळून येतात. योग्य वेळी निदान आणि तज्ञांकडून उपचार या आजारांपासून पुढे येणारा धोका टाळू शकते.

Have queries or concern ?

  About Author

  DrSheetalMahajani

  Dr. Sheetal Mahajani (Dhadphale)

  Director – Transplant Hepatology
  Contact: +91 88888 22222
  Email – [email protected]

   Appointment Form

   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Expert Doctors

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222