Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > Gastroenterology > नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर – एनएएफएलडी

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर – एनएएफएलडी

Liver Disease and Treatment

या आजारात चयापचयाच्या क्रियेत बाधा झाल्याने यकृतामध्ये मेदाचे प्रमाण वाढते आणि चरबी प्रमाणाबाहेर आढळते. यामध्ये सुरुवातीला फॅटी लिव्हर होते आणि नंतर हिपॅटायटिस,फायब्रोसिस होतो आणि कालांतराने सिऱ्होसिसची बाधा होते. बदलत्या जीवनशैलीमुळे ओढविलेला हा आजार आहे. स्थूलता, बैठी जीवनशैली,फास्ट फूड चे सेवन, मधुमेह, रक्तातील वाढलेले मेदाचे प्रमाण या आजाराचे मूळ कारण समजले जाते. ९ ते ३२ % जनसामान्यांमध्ये हा फॅटी लिव्हरचा आजार आढळतो. वजन कमी केल्यास आणि योग्य जीवनपद्धती अवलंबल्यास फॅटी लिव्हर पूर्ववत होऊ शकते.

 • ऑटोइम्यून लिव्हर डिसीज: या प्रकारात रोगप्रतिकारशक्ती मध्ये बिघाड झाल्यामुळे यकृतावर परिणाम होतो. रोगप्रतिकार शक्ती बाह्य संसर्गावर काम करण्याऐवजी यकृत पेशींवर हल्ला चढविते आणि यकृतावर परिणाम होतो. वेळीच निदान न झाल्यास, कायमस्वरूपी दीर्घकालीन आजार उद्भवतो.स्त्रियांमध्ये या प्रकारची यकृताची समस्या अधिक प्रमाणात आढळते.
 • यकृताच्या रक्तवाहिन्यांमधील बिघाड : अनेकवेळा यकृतामधून हृदयाकडे जाणाऱ्या वाहिन्या बंद झाल्यामुळे यकृताचा आजार उदभवतो. लवकर निदान झाल्यास अँजिओग्राफी सदृश प्रक्रियेमुळे हा अडथळा दूर करता येतो आणि पुढे ओढविणारी गंभीर समस्या टाळली जाऊ शकते.

 • अयोग्य औषधांचा परिणाम यकृतावर होत असतो : अंगदुखी, डोकेदुखीच्या औषधांचे अति सेवन केल्यास यकृतात बिघाड होऊ शकतो. तसेच काही प्रतिजैविके,कर्करोगावरील औषधे, क्षयरोगावरील औषधे त्यांचा यकृतावर विपरीत परिणाम आढळतो.

 • अन्य काही चयापचयाच्या आजारांमधे यकृत खराब होऊ शकते. यात लहान मुलांमध्ये आढळणारे आजार किंवा तरुणांमध्ये आढळणारे आजार येतात. कॉपर मेटाबॉलिजम मध्ये बिघाड झाल्यामुळे विल्सन डिसीज आजार उद्भवतो.
 • यकृताचा कर्करोग : यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामध्ये सिऱ्होसिसच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असते. त्यातल्या त्यात हेपॅटायटिस बी आणि सी मुळे यकृताचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे.

 • इतरही काही आजारांमध्ये यकृतावर विपरीत परिणाम होतात. जसे कि हृदय निकामी होणे. हृदय निकामी झाल्यामुळे यकृतावर दबाव पडून यकृत खराब होऊ शकते तसेच अलिकडच्या काळात आढळणाया डेंग्यू,लेप्टोस्पायरोसिस इत्यादी संसर्गामुळे यकृत खराब होऊ शकते. तसेच गर्भार महिलांमध्येही यकृताचे आजार आढळून येतात. खाज येणे, कावीळ होणे इत्यादी लक्षणे आढळतात. वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास गर्भारपणी मातेचा मृत्यू ओढवू शकतो.

 • यकृतातील जंतू संक्रमण : Liver abscess.

 • तीव्र यकृत बिघाड Acute Liver failure : यकृताच्या आजारांपैकी आपत्कालीन आजारात हयाचा समावेश होतो.अत्यल्प कालावधीत यकृत पूर्ण खराब होत (पूर्वीचा यकृताचा आजार नसताना) आणि प्रत्यारोपणाशिवाय हे रुग्ण जगू शकत नाहीत.या आजाराचे उपचार युद्धपातळीवर करावा लागतो.

Have queries or concern ?

  About Author

  DrSheetalMahajani

  Dr. Sheetal Mahajani (Dhadphale)

  Director – Transplant Hepatology
  Contact: +91 88888 22222
  Email – [email protected]

   Appointment Form

   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Expert Doctors

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222