Home > Blogs > Organ Transplant > लिव्हर फिट, तो जिंदगी हिट

लिव्हर फिट, तो जिंदगी हिट!

लिव्हर फिट, तो जिंदगी हिट

शरीरशास्त्राच्या दृष्टीने लिव्हरचे महत्त्व काय?

काळीज, जिगर अशा नावाने आपण ज्या अवयवाला संबोधतो, त्यालाच यकृत किंवा लिव्हर म्हणतात. लिव्हरबद्दल आपल्यापैकी अनेकांना कमी माहिती असते. मात्र, शरीरातील लिव्हरचे कार्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

लिव्हरचं वैशिष्ट्य म्हणजे ते कापलं तरी पुन्हा वाढतं, आणि शरीरातील त्याचं कार्य हे ३०% ते ४०% इतकं असतं. आपल्या शरीराची बॅटरी किंवा पॉवरहाऊस म्हणून लिव्हर ओळखलं जातं. त्यामुळे लिव्हरची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. इतर अवयवांना उर्जा किंवा शक्ती देणं हे मुख्यतः लिव्हरचं कार्य आहे. इतर अवयव उत्तमरित्या चालवण्यासाठी लिव्हरचं आरोग्य उत्तम राहणं महत्त्वाचं आहे.

इतर अवयवांचा कोणताही आजार झाल्यास त्याचा लिव्हरवर कसा परिणाम होतो?

शरीरातील सर्व अवयवांना शक्ती देण्याचं किंवा त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचं काम लिव्हर करतं. त्यामुळे इतर कोणत्याही अवयवाला इजा, आजार झाल्यास त्याचा परिणाम लिव्हरवर होऊ शकतो.

जर इतर अवयवांच्या आजारासाठी औषधे घेतल्यास, कोणतीही शस्त्रक्रिया झाल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी जी काही शक्ती लागते ती लिव्हरकडूनच मिळते. अशा वेळी लिव्हरला जास्त प्रमाणात कार्यरत राहावं लागतं, त्यामुळे काही काळाने लिव्हरची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे लिव्हर उत्तम राहिल्यास आरोग्य उत्तम राहतं.

लिव्हर हेल्दी कसं ठेवावं?

आपलं लिव्हर व्यवस्थित चालू आहे ना, त्याची कार्यक्षता किती आहे, हे जाणून घेण्यासाठी चाचण्या करणं गरजेचं, लिव्हरच्या आवडी-निवडी जाणून घेणं गरजेचं आहे.

लिव्हर फक्शन टेस्ट (LFT) या टेस्टमुळे लिव्हरची अवस्था कळण्यास मदत होते. अवेळी खाणं, अवेळी झोपणं, मद्यपान, धूम्रपान या गोष्टींमुळे लिव्हरवर वाईट परिणाम होतात, त्यामुळे या गोष्टी टाळाव्यात. तसेच लिव्हर संदर्भातील आजारासाठी वेळेत डॉक्टरांकडून उपचार घेणं जरूरीचं आहे. उत्तम आहार व व्यायामामुळे लिव्हर हेल्दी राहतं.

लिव्हरसाठी तपासण्या कोणत्या?

लिव्हरसंदर्भातील आजार किंवा काही त्रास असल्यास लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच लिव्हरच्या सोनोग्राफीतूनही अनेक गोष्टी कळू शकतात.

वयाच्या २० वर्षांपर्यंत ५ वर्षातून एकदा या दोन टेस्ट कराव्यात. हिपिटॅटिस ए व बी चे लसीकरणर घ्यावे. तर वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येक वर्षी या टेस्ट करून लिव्हरचं आरोग्य तपासावं. फॅटी लिव्हर हा प्रकार आपल्यापैकी अनेकांना असतो. तो ताणतणावामुळे होतो.

Have queries or concern ?

    लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज कोणाला भासते? ट्रान्सप्लांटचा निर्णय कसा घेतला जातो?

    आपल्या शरिरात लिव्हरच्या कार्यक्षतेसंदर्भातील मागणी व पुरवठ्यात तफावत आढळल्यास लिव्हर ट्रानेसप्लांटचा (Liver Transplant) सल्ला डॉक्टर देतात. तसेच लिव्हरसिरॉसिस, सिरॉसिस विथ कॅन्सर, मेटॅबोलिक डिसऑर्डर, पित्ताच्या नळ्यांचा त्रास, होर्मोन्ससंबंधी आजार असल्यास लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला जातो. असे आजार असलेल्या रूग्णांची संपूर्ण तपासणी केली जाते. औषधे देऊन बरे करण्याचा प्रयत्न केला जातो. व यानंतर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला जातो.

    लिव्हरसिरॉसिस झाल्यानंतर लिव्हर पुन्हा पूर्ववत येऊ शकत नाही. मात्र, फॅटी लिव्हर, लिव्हर फायब्रोसिस यांसारखे आजार बरे होऊ शकतात. ट्रान्सप्लांटनंतर ९९ टक्के निरोगी जीवन जगता येतं. ट्रान्सप्लांट संपूर्ण तपासण्या करून कोणत्याही वयात करता येतं.

    ट्रान्सप्लांटसाठी डोनरचे निकष काय?

    लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये डोनरचे दोन पर्याय असतात.

    एक डिसिज डोनर ट्रान्सप्लांट, दुसरा लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट.

    डिसिज डोनस ट्रान्सप्लांट म्हणजे मेंदूमृत (ब्रेनडेड पेशंट) रूग्णाचा डोनर म्हणून वापर करणे. यासाठी त्याने मृत्यूपूर्वी अवयवदान केलेले असणे गरजेचे आहे. तसेच त्या मृताच्या नातेवाईकांच्या संमतीनेच हे ट्रान्सप्लांट होऊ शकते.

    दुसरा पर्याय म्हणजे, लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट – यात जिवंत माणूस आपलं लिव्हर दान करू शकतो. अशा ट्रान्सप्लांटमध्ये मुख्यतः कुटुंबातील व्यक्तीनेच लिव्हर दान करावे लागते. लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये दात्याचे लिव्हर कापून रूग्णाच्या शरीरात बसवावे लागते.

    यानंतर दात्याचे लिव्हर साधारणे ४ ते ६ आठवड्यात लिव्हरची वाढ होते. ट्रान्सप्लांटनंतर दात्याला कोणताही त्रास होत नाही. संपूर्ण तपासणी करून लिव्हर देण्याची परवानगी मिळते.

    कोविडनंतर लिव्हरचे आजार

    सुरवातीला सांगितल्याप्रमाणे लिव्हरचे काम हे इतर अवयवांना उर्जा देणे व त्यांची कार्यक्षमता वाढवणे हे आहे. कोविडच्या काळात अनेकांनी अवाजावी औषधे घेतली, शरीरातील इम्युनिटी वाढविण्यासाठी औषधांचा मारा केला.

    अचानक इतकी औषधं घेतल्यामुळे त्याचा अनेकांच्या लिव्हरवर परिणाम झालेला दिसला. यामुळे अनेकांना लिव्हर फेल्युअरला सामोरं जावं लागलं, तर काही जण वेळेत डॉक्टरांकडे गेल्यामुळे वाचू शकले.

    सह्याद्रि हॉस्पिटल- ऑर्गन ट्रान्सप्लांट विभाग

    सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये लिव्हरसह स्वादुपिंड, किडनी, इंटेस्टाइन या अवयवांचेही प्रत्यारोपण केले जाते. सह्याद्री हॉस्पिटल स्वादुपिंड प्रत्यारोपणासाठी भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    लिव्हरची काळजी कशी घ्यावी?

    व्यायामाला दुसऱा कोणताही पर्याय नाही. लिव्हर निरोगी ठेवायचे असल्यास वजन कमी व दररोज व्यायाम आवश्यक आहे. दिवसभर उत्साहवर्धक राहणं गरजेच. मद्यपान/धूम्रपानाववर नियंत्रण ठेवणं. वैयक्तिक आयुष्यात वेळ काढून सर्व तपासण्या करू घेणं अत्यंत गरजेच आहे व त्याप्रमाणे पुढील औषधोपचार घेणं गरजेचं आहे.

    About Author

    dr-supriya-puranik

    Dr. Bipin Vibhute

    Liver Transplant & Hepato-Pancreatic & Billiary Surgeon
    Contact: +91 88888 22222
    Email – ask@sahyadrihospitals.com

    View Profile

      Book Appointment

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1246" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222