Home > Blogs > Liver Transplant > Get to Know Your Liver Health Question and Answer By Dr. Bipin Vibhute (Marathi)
Get to Know Your Liver Health Question and Answer By Dr. Bipin Vibhute (Marathi)
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे काय ?व त्याची लक्षणे कोणती ?
मद्यपानाशिवाय देखील यकृतामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे अतिरिक्त चरबी साठू शकते, त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) म्हणतात. ही चरबी लठ्ठपणा,अतिरिक्त वजन,उच्च मधुमेह,उच्च कोलेस्ट्रॉल या कारणांमुळे जमा होऊ शकते. याच्या लक्षणांमध्ये अशक्तपणा,थकवा,त्वचा व डोळे पिवळे पडणे,पोटात वेदना होणे (उजव्या भागात),पोटाला सूज येणे,यकृताच्या आकारात वाढ होणे, भुकेत बदल होणे, मानसिक संभ्रम यांचा समावेश आहे.
नॅश म्हणजे काय ?
नॅश (नॉन-अल्कोहोलिक स्टीअॅटोहिपॅटायटीस)हा नॉन-अल्कोहोलीक फॅटी लिव्हर (एनएएफएल) पुढील टप्पा आहे. नॅशच्या स्थितीत यकृतातील अतिरिक्त चरबीमुळे पेशींचे नुकसान होऊन दाह होण्यास सुरूवात होते. नॅश या आजाराचे निदान वेळेवर न झाल्यास त्याचे रूपांतर लिव्हर सिर्हॉसिससारख्या धोकादायक स्थितीमध्ये होऊ शकते. थकवा,ओटीपोटाच्या वरील उजव्या भागात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे,ओटीपोटाला सूज येणे,त्वचा व डोळे पिवळसर पडणे ही नॅशची लक्षणे आहेत.
लिव्हर सिर्हॉसिस म्हणजे काय?
यकृत प्रमाणाबाहेर खराब होऊन त्यात गाठी होणे यालाच वैद्यकीय भाषेत लिव्हर सिर्हॉसिस’ असे म्हणतात.नवीन पेशी तयार करून पुन्हा वाढू शकणारा यकृत हा शरीरातील एकमेव अवयव; पण जेव्हा ही प्रक्रिया यकृताला वारंवार करावी लागते, तेव्हा कधी तरी पेशींची फेरनिर्मिती करण्याची त्याची क्षमता संपते. त्यानंतर यकृताच्या पेशी मृत होत राहिल्या तर अशा पेशींच्या गाठी बनतात. यकृतात जिथे-जिथे असे घडते, तो भाग अशा रीतीने खराब होत जातो.
यकृत कशामुळे खराब होते?
यकृत खराब होऊन लिव्हर सिर्हॉसिस होण्याची अनेक कारणे आहेत. लिव्हर सिर्हॉसिसच्या 30 टक्के रुग्णांमध्ये दारूचे अतिसेवन हे कारण असते. 30 टक्के लोकांमध्ये हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी’, विषाणुजन्य कावीळ किंवा काही विशिष्ट औषधांमुळे ही प्रक्रिया घडते. पॅरॅसिटॅमॉल किंवा काही पेनकिलर्स आणि इतरही काही औषधांचे अतिसेवन केल्यामुळे यकृत खराब होऊ शकते. उर्वरित रुग्णांमध्ये मात्र त्याची निश्चित कारणे सांगता येत नाहीत. तरीही मधुमेह,उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, थायरॉइडचा त्रास आणि स्थूलता असलेल्या व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येवर वेळीच उपचार केले गेले नाहीत, तर त्याचे पर्यावसान लिव्हर सिर्हॉसिसमध्ये होऊ शकते.
Have queries or concern ?
About Author
Dr. Bipin Vibhute
Liver & Multi-organ Transplant & Hepatobiliary Surgeon
Contact: +91 88888 22222
Email – ask@sahyadrihospitals.com
Patient Feedback
Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde
All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade
All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap
All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.