Home > Blogs > Pulmonary Care > कोविडनंतर फुफ्फुसांची काळजी कशी घ्यावी

कोविडनंतर फुफ्फुसांची काळजी कशी घ्यावी?

कोविडनंतर फुफ्फुसांची काळजी कशी घ्यावी

कोरोनाच्या प्रादूर्भावमुळे अनेकांना फुफ्फुसांशी निगडित आजारांना सामोरे जावे, काहींना हे आजार अगदी नवीन असल्याने त्यावरील उपचारपद्धतींबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यामुळे या आजारांबद्द्ल त्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले, आणि या प्रश्नांचं, शंकांचं योग्य प्रकारे निरसन केलं आहे प्रसिद्ध पल्मनोलॉजिस्ट डॉ. अजित कुलकर्णी यांनी…

पल्मनोलॉजी म्हणजे काय?

फुफ्फुसांवर होणाऱ्या उपचारपद्धतींना पल्मनोलॉजी (Pulmonology) असं संबोधलं जातं. फुफ्फुसं आणि त्या निगडित असणाऱ्या असंख्य आजारांचे हे पल्मनोलॉजीच्या माध्यमातून निदान होते व उपचार केला जातो. लंग स्पेशालिस्ट, चेस्ट फिजिशीयन, आणि पल्मनोलॉजिस्ट या एकच टर्मिनोलॉजी आहेत.

यात मुख्यतः इंटरमेन्शन पल्मोनोलोजी या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. ज्यामध्ये  दुर्बिणीद्वारे फुफ्फुसांची शस्त्रक्रिया करणे, श्वासनलिकेतील गाठ काढणे इत्यादी समस्यांवर उपचार होऊ शकतो.

कोरोना आणि पल्मनोलॉजी

कोरोनाचे विषाणू हे श्वसनामार्गे शरीरात प्रवेश करतात. हे विषाणू शरीराला घातक असल्याने लगेचच कोरोनाबाधित होण्याची शक्यता असते. कोरोना हा आपल्या शरीराला हानी पोहोचवणारा घटक असल्याने आपल्या शरीरातील पेशी त्याच्यावर हल्ला करतात.

या हल्ल्याचा परिणाम असा की, आपल्याला न्युमोनिया होतो. हा न्युमोनिया ऑक्सिजनला आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करू देत नाही, त्यामुळे जेव्हा न्युमोनिया बरा होतो तेव्हा त्या जागेत फायब्रॉयसीस होतो आणि म्हणून कोरोना झालेल्या लोकांना ऑाक्सिजन कमी पडतो.

या व्यतिरिक्त कोरोनामुळे श्वसनाचे प्रमाण कमी होतो ज्यामुळे शरीरातील इतर अवयवांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे पुढे जाऊन ऑर्गन फेल्युअरचा धोका असतो. कोरोना हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो व तो फुफ्फुसांपर्यंत जाऊन मोठा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे आपण आपली काळजी घेणे गरजेचे आहे.

पूर्व कोरोना ज्यांना रक्तदाब, मधुमेह असे इतर आजार आहेत, अशांना कोरोनाचा संसर्ग लगेच होतो. त्यामुळे फुफ्फुसांसह इतर अवयवांनाही धोका होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना असे आजार आहेत त्यांनी सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

फायब्रोसिस हा नेमका काय आजार आहे?

फायब्रोसीस या शब्दाचा अर्थ आहे व्रण पडणे. फायब्रोसीसचे अनेक प्रकार असतात. पण फुफ्फुसांमध्ये मुख्यत्वे दोन प्रकारचे फायब्रोसीस संभवतात. पहिला, पल्मोनरी फायब्रोसिस आणि दुसरा पोस्ट कोव्हिड लंग फायब्रोसिस.

पोस्ट कोव्हिड लंग फायब्रोसिस  म्हणजे न्युमोनिया होऊन गेल्यानंतर झालेला फायब्रोसिस आणि पल्मोनरी फायब्रोसीस म्हणजे छातीतील रक्तपेशींना होणारा फायब्रोसिस.

फायब्रोसिसमध्ये इडोपॅथिक फायब्रोसिस  हा देखील एक प्रकार असतो. ज्यामध्ये कारण माहिती नसते पण फायब्रोसिस होतो. फायब्रोसिस होणे ही एक मेडिकल कंडिशन आहे आणि योग्य उपचार मिळाले तर कमी त्रासात ते बरे होऊ शकतात.

Have queries or concern ?

  उपचारानंतर मी आता एकदम बरा झालेलो आहे, हे नेमकं कसं समजू शकेल?

  कोरोना झाल्यानंतर किती दिवसात लंग फायब्रॉसिस बरा होतो हे सांगता येत नाही त्यामुळे काही दिवस दम लागण्याचा त्रास होऊ शकतो. त्याच्यासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये (Sahyadri Hospital)‘अफ्टर कोव्हिड केअर सेंटर’ चालू केलेले आहे.

  पोस्ट कोव्हिड लंग फायब्रोसिस झालेल्या लोकांना श्वसनाचे व्यायाम करावे लागतात. या  आफ्टर कोव्हिड केअर सेंटरमध्ये  22 प्रकारचे श्वसनाचे व्यायाम शिकवले जातात. ज्यामुळे रूग्णांचा एक्सरसाईज टॉलरन्स वाढतो. त्यामुळे पोस्ट कोव्हिड केअर हे गरजेचे आहे. यामुळे रूग्ण लवकर बरा होण्याची आशा असते.

  कोरोनानंतर रूग्णाच्या श्वसनक्रिया सुरळीत राहण्यासाठी काही उपाय?

  नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून आपण नदी स्वच्छ ठेवा, कचरा टाकू नका असे बोर्ड लावू शकतो. पण अशुद्ध झालेली हवा दिसून येत नाही आणि हिच दूषित हवा श्वसनाच्या आजारांना आमंत्रण देते.

  फुफ्फुसांना होणारे बरेचसे आजार हे हवेद्वारे गेलेल्या विषाणूंपासूनच होतात. त्यामुळे आपण हे आजार होऊ नयेत यासाठी योग्य ते उपाय केले पाहिजेत. जसे की, वाहनांमधून येणारा धूर कमी करणे त्यासाठी वाहनांची नियमित चाचणी करून घेणे, पियूसी काढणे, नियमीत सर्व्हिसिंग करवून घेणे.

  या व्यतिरीक्त श्वसनाचे आजार हे पक्षांच्या पंखांमुळे किंवा त्यांच्या विष्ठेमुळे पसरतात. त्यामुळे विनाकारण कबुतरांना किंवा इतर पक्षांना घराच्या आजूबाजूला खायला घालणं टाळा. तसेच फुफ्फुसांचे आजार टाळण्यासाठी धूम्रपान न करणे हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे.

  About Author

   Appointment Form

   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Expert Doctors

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222