Home > Blogs > Gastroenterology > यकृताचे आजार आणि उपचार

यकृताचे आजार आणि उपचार

Liver Disease and Treatment

यकृत हा आपल्या शरीरातील सर्वांत मोठा अवयव आहे. यकृताचे वजन शरीराच्या एकूण वजनाच्या १५० म्हणजेच ढोबळमानाने १२०० ते १५०० ग्रॅम असते. शरीराच्या उजव्या बाजूस बरगड्यांमध्ये यकृताची आंत रचना असते. चयापचयाच्या सर्व क्रियांमध्ये यकृताच्या महत्वाचा वाटा असतो आणि त्यामुळेच यकृताला शरीराची केमिकल फॅक्टरी असे संबोधले जाते आणि ५०० हून अधिक कार्य यकृत करत असते. शरीरातील विशेषत: आतड्यांमधून येणाऱ्या अशुद्धी यकृतात शुद्ध केल्या जातात (अमोनिया इत्यादी). तसेच शरीरातील प्रमुख प्रथिने तसेच रक्त गोठविण्यासाठी लागणारे घटक यकृतात बनविले जातात. अशी अनेक कार्य यकृतात होतात. शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीचाही यकृत एक प्रमुख घटक आहे.आणि म्हणूनच यकृताला आजार झाल्यावर शरीरात अनेकविध गुंतागुंतीचा प्रादुर्भाव होतो आणि काही प्रसंगी शरीराचे अस्तित्वही धोक्यात येऊ शकते.

यकृताचे सर्वसाधारण अपाय कोणते आणि त्यावरील उपचारपद्धती कोणत्या हे जाणून घेऊयात.

यकृताचे आजारांची लक्षणे

यकृताच्या आजारात काहीवेळा पूर्णपणे किंवा थोड्या प्रमाणात बिघाड आढळतो.बिघडलेले यकृत शरीराचा डोलारा पूर्णपणे दुरुस्त करू शकते आणि तसेच अन्य अवयव सुद्धा बिघडवू शकते उदा. मूत्रपिंड, मेंदू, फुफ्फुसे, रक्ताभिसरण इत्यादी.

यकृताच्या आजाराची अनेक लक्षणे आढळतात. यकृताच्या आजाराची लक्षणे खालीलप्रमाणे आढळतात –

  1. कावीळ
  2. जलोदर / पोटात पाणी होणे
  3. रक्ताच्या उलट्या होणे
  4. मळमळ होणे / भूक न लागणे
  5. अंगावर सूज येणे (पायांवर आणि सर्वांगावर)
  6. थकवा येणे अगदी दररोजची कामे करतानाही थकवा जाणविणे
  7. शरीरातील स्नायूंचा ऱ्हास होणे, वजन कमी होणे
  8. मेंदूवर सूज येणे : सूरतातीला झोपेचा दिनक्रम बदलतो, आणि नंतर खूप झोप येणे, शुद्ध हरपणे, गुंगी येणे,कोम्यात जाणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात
  9. शरीराला खाज येणे
  10. पांढरट रंगाची विष्ठा होणे
  11. ताप येणे
  12. उजव्या बरगडी खाली दुखणे
  13. त्वचा कोरडी पडणे, काळे निळे डाग पडणे
  14. लघवीचे प्रमाण कमी होणे

यापैकी एक किंवा अनेक लक्षणे आढळल्यास ताबडतोब यकृत तज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. यकृताचा आजार हे जगातील सर्वमानवी मृत्युंच्या कारणातील एक कारण समजले जाते तसेच यकृत व्याधींमुळे आजारी रुग्णांची संख्याही पुष्कळ आहे.

Have queries or concern ?

    About Author

    DrSheetalMahajani

    Dr. Sheetal Mahajani (Dhadphale)

    Director – Transplant Hepatology
    Contact: +91 88888 22222
    Email – ask@sahyadrihospitals.com

      Book Appointment

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1238" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222