Home > Blogs > Cardiac Surgery > व्हीएडी Ventricular assist device

व्हीएडी Ventricular assist device

व्हीएडी

व्हीएडी

व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस हे एक मेकॅनिकल उपकरण असून हृदयातील डाव्या बाजूस असलेले चेंबर (लेफ्ट व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस – एलव्हीएडी),उजव्या बाजूस असलेले चेंबर (राईट व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस – आरव्हीएडी) किंवा दोन्ही (बाय व्हेंन्ट्रीक्युलर असिस्टेड डिव्हाईस- बीआयव्हीएडी) च्या कार्यामध्ये सहाय्य करते.

व्हीएडी रोपणचा सल्ला कधी दिला जातो

ज्या लोकांचे हृदय कमकुवत झाले असेल (हृदय निकामी होण्याच्या अंतिम टप्प्यात) किंवा ज्यांचे हृदय निकामी झाले असेल अशांमध्ये या मेकॅनिकल उपकरणाचे रोपण केले जाऊ शकते.हे हृदयाच्या दोन्ही बाजूस केले जाऊ शकते किंवा बर्‍याच वेळा हे डाव्या बाजूस केले जाते. लेफ्ट व्हेंन्ट्रीकल हे शरीरातील सर्व उती किंवा पेशींना प्राणवायुयुक्त रक्ताचा पुरवठा करते.जेव्हा इतर सर्व उपचारांचे पर्याय बंद होतात तेव्हा एलव्हीएडीचा पर्याय निवडला जाऊ शकतो. हा कायमस्वरूपी उपचार (डेस्टीनेशन थेरपी) किंवा हदय प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेल्या रूग्णांसाठी हा एक पूल समजला जातो. याशिवाय काही रूग्ण आपले वय व इतर वैद्यकीय स्थितीमध्ये पात्र ठरत नाहीत किंवा हृदय प्रत्यारोपणाची प्रतिक्षा ही जास्त असेल तर अशा रूग्णांमध्ये हे उपकरण उपयोगी ठरू शकते.

Have queries or concern ?

    रोपण कसे केले जाते

    या प्रक्रियेमध्ये ओपन हार्ट शस्त्रक्रिया केली जाते. ही अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया असून रूग्णाचे हदय निकामी होण्याच्या अंतिम टप्प्यातील आजार असलेल्या कारणाने शस्त्रक्रियेदरम्यान व शस्त्रक्रियेनंतर रूग्णाच्या वैद्यकीय परिस्थितीचे व्यवस्थापन कौशल्यपूर्ण करावे लागते आणि यासाठी प्रशिक्षित डॉक्टर्स व आरोग्य सेवा पुरवठादारांची अधिक गरज असते. रोपण केलेल्या उपकरणाचे नियंत्रण प्राथमिक टप्प्यात बाहेरून केले जाते,ज्यामुळे त्याचे काम अचूक होण्यामध्ये मदत होते. हे उपकरण छोट्या मोबाईल बॅटरी कंट्रोल युनिटवर चालते जे रूग्णाला आपल्या बरोबर ठेवावे लागते व त्याला दर 8 ते 12 तासांनी रिचार्ज करण्याची गरज असते.या युनिटचे व्यवस्थापन व बॅटरीच्या काळजीबाबत रूग्णाला आणि त्याची काळजी घेणार्‍या व्यक्तीला प्रशिक्षण दिले जाते.रूग्णाला रक्त पातळ करणारी औषधे देखील घ्यावी लागतात.

    या शस्त्रक्रियेसाठी कौशल्यवान व अनुभवी तज्ञांची गरज असते.कारण यात रक्ताच्या गुठळ्या,रक्तस्त्राव,संसर्ग,उपकरणांमध्ये बिघाड अशा अनेक जोखीम असतात.शस्त्रक्रियेआधी डॉक्टर रूग्णांबरोबर प्रक्रियेदरम्यान व नंतर काय अपेक्षित करू शकतो,जोखीम व घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन करतात.व्हीएडी रोपणासाठी रूग्ण पात्र आहेत की नाही यासाठी एकोकार्डिओग्राम,चेस्ट एक्स-रे,रक्ताच्या चाचण्या,ईसीजी यासारख्या अनेक चाचण्या केल्या जाऊ शकतात.

    हदय निकामी होण्याच्या अंतिम टप्प्यातील रूग्णांचे वाचण्याचे प्रमाण एक वर्षात केवळ 5 टक्के असते. जमेची बाब म्हणजे एलव्हीएडीमुळे हे प्रमाण पहिल्या वर्षात 90 टक्क्यांवर असू शकते आणि दीर्घकाळात याचे चांगले परिणाम मिळू शकते.अशा प्रकारचे रूग्ण शस्त्रक्रियेनंतर देखील चांगले कौटुंबिक व सामाजिक आयुष्य जगू शकतात.

    शस्त्रक्रियेनंतर साधारणत: एक आठवडा रूग्णाची काळजी अतिदक्षता विभागात घेतली जाते. त्यानंतर दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये मशिनद्वारे शरीरात रक्त पुरवठ्याचा दर व प्रवाह समायोजित करण्यासाठी राहावे लागते.त्यानंतर रक्त पातळ करण्याची औषधे दिली जातात,जी आयुष्यभर पुढे सुरू ठेवावी लागतात.त्यानंतर रूग्णाला घरी पाठविण्यात येते.

    About Author

    dr-supriya-puranik

    Dr. Manoj Durairaj

    Cardio-Thoracic Surgeon/ Heart Transplant Surgeon
    Contact: +91 88888 22222
    Email – ask@sahyadrihospitals.com

      Book Appointment

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1218" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222