Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > Obstetrics and Gynaecology > बाळंतपणातील सुटलेले पोट (मम्मी टम्मी) आणि पोटपट्टा

बाळंतपणातील सुटलेले पोट (मम्मी टम्मी) आणि पोटपट्टा

डिलिव्हरी नंतर पोटाचा जो वाढलेला घेर किंवा आकार मागे तसाच राहतो त्याला “मम्मी टम्मी” असे गोंडस नाव जरी असल तरी ही ‘टम्मी’ आमच्या नवीन च ‘मम्मी’ झालेल्या मुलींना अजिबात नको असते. मग काय करायचं?

नवीनच आई झालेल्या मुली एकाच वेळी अनेक गोष्टींचा सामना करत असतात जसे की स्वतः च्या शरीरात होणारे बदल, स्तनपान (breast feeding) च्या बाळाच्या गरजा पूर्ण करणे , बाळाची काळजी घेणे अपुरी झोप आणि याच वेळी हे डिलिव्हरी नंतर स्वतः चे सुटलेले पोट बघून त्या नाराज होतात स्वतः च्या शरीरात एकदम झालेला हा बदल त्यांना नवीनच असतो आणि त्यावरचा तत्काळ (instunt) उपाय त्यांना हवा असतो . अशावेळी पटकन आणि लगेच करता येणारा उपाय म्हणजे ‘पोटपट्टा’ किंवा पोट बांधणे किंवा abdominl binder.

पूर्वा पार आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही पोट बांधण्याची रीत खरोखर पोट कमी करण्यासाठी उपयोगी असते का? पोटपट्टा बांधायला च हवा का? कधी पासून पोटपट्टा (abdominal binder) वापरू शकतो? या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहूया.

बाळंतपण सुटलेले पोट आणि पोटपट्टा

सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की सुटलेले पोट कमी करण्यासाठी पोटपट्टा काहीही मदत करत नाही …

होय बरोबर वाचताय तुम्ही…

डिलिव्हरी नंतर सुटलेले पोट पोट पट्याने आत जात नाही. पोटपट्टा हा सुटलेल्या किंवा डिलिव्हरी नंतर जे पोट मागे राहते त्याला आधार देतो त्यामुळे स्त्री ला पोटाच्या थुलथूलीत पणाची जाणीव होत नाही ( she feels compactness or gathered) डिलिव्हरी नंतर पोटपट्टा बांधायला च हवा असे अजिबात नाही आणि जर बांधायचा असेल तर नॉर्मल डिलिव्हरी च्या 48 तासानंतर आणि सिझेरियन नंतर 72 तासांनी बांधला तर चांगले कारण या वेळात पेशंट चांगले हालचाल करत असतात आणि मग पट्टा बांधणे काढणे सोपे जाते .

घरगुती कॉटन ची ओढणी किंवा साडी पोटपट्टा म्हणून वापरली तरी चालेल किंवा बाजारात उपलब्ध असलेले abdominal binders ही वापरले तरी हरकत नाही. डिलिव्हरी नंतर सुटलेले पोट कमी करण्याचा कोणताही शॉर्टकट नाही आणि योग्य व्यायाम हाच त्यावरचा उपाय आहे. स्त्री रोग तज्ञांच्या सल्याने पोटाचे व्यायाम तुम्ही योग्य वेळी सुरु करू शकता

(माझा पेशंटच्या बाबतीत ला अनुभव असा आहे की बाळाची काळजी आणि स्तनपानाच्या वेळा सांभाळता सांभाळता पोटपट्याचे ‘ नव्याचे नऊ दिवस’ असे होते. आणि पोटपट्टा तसाच पडून राहतो)

Have queries or concern ?

    About Author

    Dr. Archana Belvi

    Dr. Archana Belvi

    Gynecologist
    Contact: +91 88888 22222
    Email – [email protected]

    View Profile

      Appointment Form

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222