Home > Blogs > Obstetrics and Gynaecology > सिझेरियन मातांना वंदन!

सिझेरियन मातांना वंदन!

बाळंतपण सुटलेले पोट आणि पोटपट्टा

ममता ..9 महिने पूर्ण झाले होते आणि एक दिवस सकाळी अचानक अंगावरून पाणी गेलं म्हणून इमर्जन्सी विभागात दाखल झाली आतून तपासून बघितलं तर हातामध्ये बाळाची नाळ लागली नाळे मध्ये अजून बाळाचे ठोके चालू होते परिस्थितीची पूर्ण कल्पना देऊन अक्षरशः अर्ध्या तासाच्या आत ममताचे गडबडीने सिझर करावे लागले आणि बाळ सुखरूप होते.

नववा महिना संपता संपता एक दिवस संध्याकाळी श्वेता अंगावरून रक्तस्त्राव होत आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल झाली बघितलं तर श्वेताला बऱ्यापैकी रक्तस्त्राव झाला होता गडबडीने सोनोग्राफी केली असता त्यामध्ये आत मध्ये बाळाची वार सुटलेली दिसली परंतु अजूनही बाळाचे ठोके चांगले होते पुन्हा एकदा गडबडीने सिझेरियन करून श्वेताचे बाळ वाचवावे लागले.

क्षितिजाला डिलिव्हरीच्या कळा छान सुरू होत्या परंतु एकाएकी कळा वाढल्यानंतर बाळाचे ठोके कमी होऊ लागले घाईने क्षितिजाच्याही सिझर चा निर्णय घ्यावा लागला आणि बाळ सुखरूप होते.

मिताचे बाळ ‘पायाळू ‘असल्यामुळे पहिल्यावेळी बाळाचा जन्म सिझर करून झाला कारण हेच बाळासाठी सर्वाधिक सुरक्षित होते.

तुमच्यापैकी अशा कितीतरी जणी ज्या स्वतःचा विचार न करता केवळ बाळाच्या सुरक्षिततेसाठी सिझेरियन ला सामोऱ्या केल्या त्या सर्वांच्या धैर्याला सलाम करण्यासाठी एप्रिल महिना हा ‘इंटरनॅशनल सिझेरियन अवेअरनेस मंथ’ म्हणून साजरा केला जातो.

धैर्याला सलाम अशासाठी की कोणाला ही स्वतः च्या शरीरावर छेद/कट/ व्रण तोही चांगला मोठा दहा सेंटिमीटर किंवा तीन ते चार इंचाचा , दुःखणारा देऊन घेणे तेही फक्त आपले बाळ सुरक्षित राहावे म्हणून याला नक्कीच धाडस हवे.

इतरवेळी स्वयंपाक वगैरे करताना हाताला अगदी लहानसे कापले किंवा छेद गेला तरी त्यामुळे होणाऱ्या वेदना आणि त्रास आठवून बघा … आणि सिझेरियन चा छेद सहन करणाऱ्या तुम्ही ..नक्कीच धाडस आणि धैर्य हवे नाही का?

एक स्त्री रोग तज्ञ म्हणून ‘नॉर्मल डिलिव्हरी ‘ आणि ‘सिझेरियन’ च्या हिंदोळ्यावर नेहमीच आम्हाला काम करावे लागते.

कित्येकदा अक्षरशः काही क्षणात पेशंट ची डिलिव्हरी कशी करायची याचा निर्णय घ्यावा लागतो आणि पेशंट आणि तिच्या नातेवाईकांना तो समजावून देऊन तातडीने अमलात आणावा लागतो.

स्त्री रोग तज्ञ म्हणून आपल्या प्रत्येक पेशंटची डिलिव्हरी नार्मल आणि सुलभ व्हावी असे नेहमीच वाटते पण काही वेळा ते शक्य नसते .

‘शिवानी’ ची प्रेग्नंन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर पहिल्या तपासणी च्या वेळेला च तिची सासू म्हणाली ,

“डॉक्टर आमच्या कडे सगळ्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे ; सिझर ची पध्दत नाही आमच्या कडे त्यामुळे हिची सुध्दा नॉर्मल च डिलिव्हरी व्हायला हवी “

या गोष्टी चा शिवानी ने इतका धसका घेतला की पूर्ण 9 महिने आपली डिलिव्हरी नॉर्मल होईल ना या चिंतेत च ती होती. गरोदरपणाचा कोणताही आनंद तिला घेता आला नाही.

अगदी पहिल्या महिन्यापासून नार्मल की सीझर याचा विचार करणे बरोबर नाही . नवव्या महिन्यापर्यंत मी आणि माझे बाळ सुरक्षितरित्या कसे पोचू ज्यामुळे माझ्या बाळाची वाढ पूर्ण होईल याकडे गरोदर स्त्री आणि तिच्या कुटूंबाचे लक्ष हवे.

प्रसूत होणे हा गरोदरपणातील शेवटचा टप्पा किंवा रिझल्ट आहे त्यामुळे पहिल्या पासून रिझल्ट ‘नॉर्मल डिलिव्हरी’ चा लागेल की ‘सीझर’ होईल याचा ताण नसावा तर लक्ष हे गरोदरपणात स्वतःची नीट काळजी घेण्याकडे असावे.

सिझेरियन बद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने काही गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात.

1. आताच्या काळामध्ये सिझेरियन डिलिव्हरी ही पूर्ण सुरक्षित आहे.

2.
सिझेरियन करताना दिली जाणारी भूल ही सुद्धा पूर्णपणे सुरक्षित आहे.

3.
सिझेरियन करताना पाठीच्या मणक्यातून भूल दिली जाते आणि त्यामुळे पाठदुखीचा त्रास होत नाही.

4.
भूल दिल्यावर सिझेरियन करताना पेशंटला कोणत्याही वेदना जाणवत नाहीत.

5.
सिझेरियन नंतर साधारण सहा तासाने पेशंटला घोट घोट पाणी दिले जाते आणि बारा तासानंतर पातळ पदार्थ पेशंट घेऊ शकतो.

6.
साधारणतः सिझेरियनची भूल उतरल्यावर दोन तासाने पेशंटला हात पाय हलवता येतात आणि पेशंट बेड वरती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळू शकतो.

7.
सिझेरियन चालू असताना एकीकडे लगेचच बाळाला स्तनपान देता येते.

8.
दुसऱ्या दिवशीपासून पेशंट पूर्ण हालचाल करू शकतो आंघोळ करू शकतो आणि बाळाला व्यवस्थित स्तनपान करू शकतो.

9.
एकदा सिझेरियन झाल्यानंतर पुढच्या वेळेला सिझेरियन होण्याची शक्यता जरी जास्त असली तरी प्रत्येक वेळेला दुसऱ्या वेळेला सिझरच होईल असे नाही.

10.
सिझेरियन करताना ‘फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन’ अर्थात ‘स्त्री नसबंदी’ शस्त्रक्रिया करणे सोपे असते आणि त्यामुळे पेशंटला जास्त त्रास होत नाही.

11.
हल्लीच्या काळामध्ये सिझरच्या वेळेला घेतले जाणारे टाके हे विरघळणारे असतात आणि एकच मोठा टाका असतो जो दिसत नाही.

12.
सिझेरियन नंतरही शेक/ शेगडी आणि बॉडी मसाज करणे सुरक्षित आहे


13.
अगदी दोन सिझेरियन नंतर सुद्धा तुम्ही तुमची रोजची कामे  पूर्ण क्षमतेने शेवटपर्यंत करू शकता.

या सर्व गोष्टी जाणून घेऊन काळजी करणे सोडून द्या आणि गरोदरपणात स्वतः ची चांगली काळजी घ्या .

डिलिव्हरी ‘नार्मल’ झाली की ‘सीझर झाले’ हे महत्वाचे नसून डिलिव्हरी च्या वेळी आई आणि बाळ दोन्ही सुरक्षित आणि सुखरूप राहिले हे महत्वाचे आहे

धन्यवाद !

Have queries or concern ?


    About Author

    Dr. Archana Belvi

    Dr. Archana Belvi


      Appointment Form







      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222