Home > Blog > Neurosurgery > ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतील रक्तस्त्राव

ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतील रक्तस्त्राव

Dr. Sameer Futane | Consultant Brain & Spine Surgeon

brain-hemorrhage-in-hindi

मेंदूमध्ये रक्तस्त्राव मुख्यतः खालील कारणाने होऊ शकतो.

मेंदूमध्ये रक्तस्त्राव मुख्यतः खालील कारणाने होऊ शकतो.

१) अपघात (डोक्याला जबर मार लागणे)

२) अति उच्च रक्तदाबाने मेंदूतील रक्तवाहिनी फुटणे

३) मेंदूतील ट्युमर मध्ये रक्तस्त्राव होणे ( उदा pituitary apoplexy)

४) मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये फुगा (aneurysm ) तयार होऊन तो कधीतरी अचानक फुटणे

५) मेंदूत उद्भवलेला (बहुतेक जन्मतः ) रक्तवाहिनीचा गुच्छ फुटणे ( Arterio-venous malformation , cavernoma)

६) रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा दुष्परिणाम

७) काही अतिशय दुर्मिळ कारणे (उदा moya-moya disease)

मेंदूला एखाद्या घरातल्या स्विचबोर्ड सारख समजा. विविक्षित बटन खराब झाल्यास त्याला नियंत्रित करणारे उपकरण चालणार नाही. उदा फॅन किंवा बल्ब बंद होईल. त्याचप्रकारे मेंदू मधला प्रत्येक भाग हा कुठल्यातरी शारीरिक अवयवाला किंवा प्रक्रियेला नियंत्रित करतो. रक्तस्त्राव कुठल्या भागात होतो आहे त्यावर नक्की कुठला भाग निकामी होतो आहे हे अवलंबून आहे. उदाहरणार्थ डाव्या मेंदूत मोठा रक्तस्त्राव झाल्यास वाचा जाते , शिवाय शरीराचा उजवा भाग (हात पाय आणि उजवा चेहेरा) निकामी /पॅरलाइज होऊ शकतो.

रक्तस्त्राव

१) कुठल्या मेंदूच्या भागात आहे

२) आकाराने किती मोठा आहे

३) किती वेगात झाला आहे

४) रुग्णाचे वय आणि शारीरिक परिस्थिती

५) रुग्ण मेंदूरोग तज्ज्ञ किंवा मेंदू शल्यविशारद कडे किती वेळाने पोहोचला आहे कशी आहे यावर पेशंट ची लक्षणे , उपचार आणि रिकव्हरी किंवा मृत्यू होणार ते अवलंबून असते.

मेंदूचा एखादा भाग डॅमेज झाल्यावर तो पुनः पूर्ववत/ पुनर्जीवित करता येत नाही. त्या भागाचे कार्य नेहेमीसाठी निकामी होऊ शकते. इतर मेंदूचा (डॅमेज नसलेला ) भाग त्यातले किती कार्य आपल्या अंगावर घेऊन पूर्ण करू शकतो या नैसर्गिक चमत्कारावर फायनल रिकव्हरी अवलंबून असते (Neuronal plasticity). अर्थात अशी neuronal plasticity फार कमी रुग्णात आढळून येते. कमी वय आणि चांगली फिजिओथेरपी याला मदत करू शकते.

ऑपरेशन करून रक्ताचा क्लॉट/गुठळी काढण्याचा निर्णय खालील बाबींवर अवलंबून असतो,

१) रुग्णाचे वय ( खूप वयस्कर पेशंट मध्ये शक्यतो टाळले जाते )

२) मेंदूतील कुठल्या भागात रक्तस्त्राव आहे ( मध्यमेंदूत , मेन्दूस्तंभात बरेचदा ऑपरेशन चा काहीही फायदा होत नाही)

३) रुग्णाची बेशुद्धावस्था (कोमा ) किती गहिरी (deep) आहे आणि किती वेळ झालेला आहे ( डीप कोमा मध्ये फार वेळ झाल्यास फारसा फायदा होत नाही)

४) मेंदू वर सूज किती आहे

५) नातेवाईकांची इच्छा आणि अपेक्षा काय आहेत

ऑपरेशन चा उद्देश रक्ताची गाठ काढून , बाजूच्या नॉर्मल मेंदू वरील दाब कमी करणे हा असतो. जेणेकरून जेवढा नॉर्मल मेंदू वाचेल तेवढी रिकव्हरी च्या आशा जास्त असतात. अर्थात जो पूर्णतः डॅमेज झालेला भाग आहे त्याला ऑपरेशन ने पूर्ववत करता येत नाही. अश्या प्रकारचे ऑपरेशन्स अतिशय धोकादायक आणि क्लिष्ट असतात.

वर उल्लेख केलेल्या काही विशिष्ट आजारांमध्ये रक्तस्रावाचे कारण बंद करण्याची सर्जरी करावी लागू शकते (उदा aneurysm किंवा AVM असल्यास ते बंद करणे , ट्युमर संपूर्ण काढून टाकणे इत्यादी. हा एक स्वतंत्र मोठा विषय आहे त्यावर प्रश्न आल्यास त्याचे उत्तर नंतर देता येईल )

मृत्यू: मेंदूतील रक्तस्त्राव हा अचानक मृत्यू चे महत्वाचे कारण असू शकतो. मोठ्या रक्तस्रावा मुळे कोमामध्ये गेल्यावर होणारे जंतुसंसर्ग , फुफ्फुसात रक्ताची गुठळी तयार होणे, हार्ट अटॅक येणे इत्यादी कारणे सुद्धा मृत्यूस कारणीभूत असतात. जीव वाचला तरी कायमचे अपंगत्व किंवा बेशुद्धावस्था, परावलंबी आयुष्य नाकारता येत नाही. अर्थात काही नशीबवान रुग्ण वेळेत योग्य उपचार मिळाल्यास आणि रक्तस्त्राव छोटा किंवा कमी गंभीर जागेवर साध्या कारणाने असल्यास पूर्णतःनॉर्मल आयुष्य जगू शकतात.

वरील सगळ्या चर्चेवरून लक्षात आले असेल की , ब्रेन हॅमरेज मध्ये जीव वाचणार की नाही आणि वाचला तरी किती अर्थपूर्ण जीवन राहील हे बऱ्याच फॅक्टर्स वर अवलंबून आहे.

Have queries or concern ?

  About Author

  Dr. Mangesh Udar DNB (Internal Medicine) DNB (Neurology

  Dr. Sameer Futane

  Consultant Brain & Spine Surgeon
  Contact: +91 88888 22222
  Email – ask@sahyadrihospitals.com

  View Profile

   Appointment Form
   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Expert Doctors

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222