Free ebooks Library z-lib project

Home > Blogs > Neurosurgery > पार्किन्सन म्हणजे काय?

पार्किन्सन म्हणजे काय?

what+is+Parkinson's

पार्किन्सन आजार हा एक न्युरोडिजनरेटिव्ह (मेंदू झिजण्याचा आजार) आहे.यामध्ये मेंदूतील पेशी,न्युरॉन्स या हळूहळू निकृष्ट होत जातात.यामुळे त्यातून निघणारे रासायनिक घटक विशेष करून डोपामीन कमी होत जाते. यामुळे पार्किसन्स आजाराची लक्षणे दिसायला लागतात.

पार्किन्सन आजाराची लक्षणे कोणती ?

शरीराला कंप सुटणे,हालचाली मंदावणे,हात-पायांत कंप निर्माण होणे,शरीर कडक होणे,ज्यामुळे चालण्यास व बोलण्यास समस्या निर्माण होतात.ही लक्षणे हळूवार एक हात किंवा एका पायापासून दिसून पुढे वाढत जातात.

वयाच्या 50-60 वर्षानंतरच्या व्यक्तींमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहेे. वाढत्या वयाप्रमाणे या पेशी निकृष्ट होत गेल्यास पार्किसन्सचा आजार बळावू शकतो. पार्किसन्सच्या आजाराचे कारण बऱ्याच रुग्णांमध्ये सापडत नाही,त्यामुळे त्यावेळी त्याला इडिओपथिक पार्किन्सनचा आजार असे म्हणतात. (इडिओपथिक कारणांशिवाय आढळून येणारा)

या आजारावर कसे नियंत्रण ठेवले जाते?

जसजसे वय वाढत जाते तसे या आजाराची तीव्रता वाढत जाते. या आजारामध्ये संपूर्णपणे आजार बरे करण्याची उपचार पद्धती आज अस्तिवात नाही मात्र,यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही औषधे उपलब्ध आहेत.नियंत्रणात ठेवल्यास रूग्ण आपले सामान्य आयुष्य जगू शकतो.

Have queries or concern ?

  पार्किसन्सकरिता नवीन उपचार कोणते विकसित झाले आहेत?

  नवीन उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, डीप ब्रेन स्टिम्युलेशन यांचा समावेश आहे. डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) या शस्त्रक्रियेमध्ये १.२७ मिमी जाडीचे इलेक्ट्रोडसचे मेंदूच्या सखोल आणि नाजूक भागांमध्ये रोपण करण्यात येते व त्याला उच्च वारंवारता (फ्रिक्वेंसी) असलेल्या पेसमेकरशी जोडण्यात येते.

  विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यात येते. इलेक्ट्रोडसच्या रोपणातील अचूकता अत्यंत आवश्यक असते,कारण याचे टोक मेंदूच्या मध्यभागी असते आणि कोणतीही छोटी चूक किंवा विसंगतीचा परिणाम गंभीर होऊ शकतो.

  About Author

   Appointment Form

   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222