Home > Blogs > Organ Transplant > यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी
यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी
यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर जेव्हा रूग्ण बरा होऊन घरी येतो,तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की,आता पुढे काय? याचे एकच उत्तर म्हणजे लवकर बरे होणे. पण पूर्णपणे बरे झाल्याची खात्री पुढील काही महिन्यांमध्ये तुम्ही बरे कसे होऊ शकता याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील 6 उपाययोजना फायदेशीर ठरू शकतात.
- हालचाल करणे : तुम्ही घरी आल्यानंतर चालण्याची सवय ठेवा आणि दीर्घ श्वास घेण्याची सवय घालून घ्या.दीर्घ श्वसनामुळे तुमच्या फुप्फुसांचा विस्तार होऊन खोकल्यावाटे जमा होणारा कफ बाहेर पडेल. पहिल्या तीन महिन्यांमध्ये 6 ते 10 किलो वजनापेक्षा जास्त कोणतीही वस्तू उचलू नका. यकृत प्रत्यारोपणानंतर ही खबरदारी घेतल्यास हार्नियापासून देखील बचाव होऊ शकतो. शस्त्रक्रियेनंतरच्या तीन महिन्यामध्ये पोटाचे व्यायाम केल्यास एक गंभीर जोखीम उद्भवू शकते. बरे होताना वजन वाढू देऊ नका,वजन नियंत्रणात ठेवल्यास हदयाच्या रक्तवाहिन्यांसाठी चांगले असते.
- औषधे वेळेवर घ्या : आपल्याला डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचे एक वेळापत्रक बनवा,जेणे करून औषधे घेणे विसरणार नाही. आपल्याला आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार आहेत,ही कल्पना जरी कठिण असेल तरी जर हा मार्ग आपल्याला चांगल्या आरोग्याकडे घेऊन जात असेल तर हा मार्ग स्विकारायला हवा. तुमच्या यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद ने सांगितलेली इम्युनो सप्रेसंट औषधे ही निश्चितच महत्त्वाची असतात. ही औषधे तुमच्या रोगप्रतिकारक प्रणालीला नवीन यकृतावर आक्रमण करण्यापासून रोखतात. यकृत प्रत्यारोपणानंतरचे आयुष्य अनेक औषधोपचारांनी व्यापलेेले असते म्हणूनच आपल्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा नियुक्त केलेल्या केअर टेकर ने आपणाला कोणती औषधे कधी,कोणत्या वेळी द्यावयाची आहेत,याच्याशी परिचित व्हावे.
- योग्य आहाराचे सेवन करा : लक्षात ठेवा की,यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर भूक लागणे हे एक चांगले लक्षण आहे. तरी तंतूमय आणि प्रथिनयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला काही शंका असेल तर,आहारतज्ञांची मदत घ्या. याची खात्री करा की,तुम्ही अशुध्द पाणी आणि कच्चे अन्न किंवा सॅलड,जंक फूड आणि गोड पदार्थ खाणे टाळा.चिकट गोड फळांचे सेवन टाळा कारण ती,तुमच्या रक्तातील साखरेची प्रमाण वाढवू शकतात आणि तुम्ही एकाच वेळी खात असलेल्या अनेक औषधांमुळे देखील रक्तातील साखर वाढू शकते.त्यामुळे तुम्ही काय खाताय याकडे लक्ष द्या.प्रत्यारोपणानंतर धुम्रपान व मद्यसेवन कटाक्षाने टाळा,यामुळे गुंतागुंत वाढू शकते.
- डॉक्टरांशी नियोजित भेट टाळू नका : जर आपण डॉक्टरांच्या नियोजित भेटी व्यवस्थित पाळल्यास यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर उद्भवणार्या समस्या कमी होऊ शकतात. रक्ताच्या चाचण्या आणि इम्युनोसप्रेशनवर देखरेख करण्याकरिता देखील या नियोजित भेटी महत्त्वाच्या आहेत,कारण यामुळे यकृत प्रत्यारापेणानंतर तुमच्यात किती सुधारणा होते यंाचा अंदाज येेतो.
- स्वच्छतेची काळजी घ्या : शस्त्रक्रियेनंतर 14 व्या दिवसापासून 21 व्या दिवसापर्यंत कधीही शस्त्रक्रियेतील टाके काढले जाऊ शकतात. केवळ या काळातच नाही तर अन्यथा देखील आपल्या सभोवतालकडे बारकाईने लक्ष द्या आणि आपल्या आजूबाजूला कोणतीही घाण किंवा धूळ जमा होत नाही याची खात्री करा. आपल्या शरीरावर जीवाणू व जंतू येणे टाळण्यासाठी स्पाँज बाथ किंवा सामान्य नियमित आंघोळ करा. पण हे करण्याआधी तुमच्या यकृत प्रत्यारोपण तज्ञाचा सल्ला घ्या. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनीही स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी,जेणेकरून तुम्ही स्वच्छ वातावरणात बरे होऊ शकता.
- सकारात्मक दृष्टीकोन ठेवा : तुमच्या बरे होण्याच्या प्रक्रियेदरम्यान हे विसरू नका की,तुम्ही निरोगी आहात आणि तुम्हाला सामान्य जीवनात लवकरात लवकर परत येता येईल. बरे होण्याच्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो.पण तुम्ही निराश होऊ नका,कारण त्याने तुमचे जीवनमान सुधारण्याऐवजी बिघडू शकते. रोज चांगले सुविचार वाचा.शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरे होण्यास एखादे वर्ष लागू शकते पण शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यातच तुम्ही स्वावलंबी होऊ शकता. जेव्हा अशा प्रकारच्या गंभीर शस्त्रक्रिया होतात तेव्हा संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यासाठी कोणतीही आरोग्याची समस्या उद्भवल्यास आपले डॉक्टर/सर्जन यांच्याशी संपर्क ठेवा.ताप,उलट्या,अतिसार,कावीळ इत्यादी लक्षणे म्हणजे एखाद्या संसर्गाचा धोका असू शकतो किंवा तुमच्या यकृताशी पूर्णपणे असंबंधित समस्या असू शकते,ज्याची तपासणी करणे आणि लवकरात लवकर उपचार करणे आवश्यक आहे. वरील सल्ल्यांचे अनुसरण करा आणि आरोग्याच्या प्रगतीपथावर वाटचाल करा.
Have queries or concern ?
About Author
Dr. Bipin Vibhute
Liver & Multi-organ Transplant & Hepatobiliary Surgeon
Contact: +91 88888 22222
Email – ask@sahyadrihospitals.com
Patient Feedback
Great doctors, Good facilities, caring and helping staff. I recommend this hospital for day care services.
Sangram Shinde
All doctors r very good. There treatments is best. Other staff also good. The service of nurses is great...Hospital is always clean.
Vaishali Aitawade
All services provide by hospital are nice and on time. Doctors are polite and co-operative with patient.
Ankita Jagtap
All services provided by hospital is good. Hygiene maintained well.Even at night good care provided.