Home > Blogs > Cardiac Surgery > हृदय प्रत्यारोपण

हृदय प्रत्यारोपण

हृदय प्रत्यारोपण

हृदय प्रत्यारोपण ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये रूग्णाचे निकामी झालेले हृदय काढून दात्याचे आरोग्यदायी हदय प्रत्यारोपित केले जाते. हदय प्रत्यारोपण ही उपचार पध्दती सामान्यत: अशा लोकांसाठी वापरली जाते,ज्यांची स्थिती कोणतेही औषध किंवा अन्य शस्त्रक्रियांमुळे सुधारलेली नसते आणि पुढे कोणताही पर्याय उपलब्ध नसतो.हृदय प्रत्यारोपण जरी मोठी शस्त्रक्रिया असली तरी रूग्णाला शस्त्रक्रियेनंतर एक चांगले आयुष्य जगण्याची संधी मिळू शकते.

हृदय निकामी होण्याची कारणे

 • हृदयातील स्नायू कमकुवत होणे (कार्डिओमायोपॅथी)
 • हृदयाच्या रक्तवहिन्यांचा विकार
 • हृदयाच्या झडपांमध्ये बिघाड
 • हृदयातील जन्मजात दोष
 • अनियमित हृदयाचे ठोके (वेंट्रीक्युलर एरिथिमिया)

हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही ओपन हार्ट शस्त्रक्रिया असून त्यासाठी बरेच तास लागू शकतात. एखाद्या व्यक्तीची पूर्वी हृदयाची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अधिक गुंतागुंतीची व अधिक वेळ घेणारी ठरू शकते. शस्त्रक्रियेपूर्वी भूलतज्ञांद्वारे भूल दिली जाते.

डॉक्टर संपूर्ण शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्तप्रवाह सुरू ठेवण्यासाठी तुमचे हृदय व फुफ्फुसांना बायपास मशीनशी जोडतात. त्यानंतर छातीमध्ये छिद्र करून छातीतले हाड व पिंजरा हा वेगळा केला जातोे,ज्यामुळे हृदयापर्यंत पोहचता येते.त्यानंतर निकामी झालेले हृदय काढून दात्याचे हृदय प्रत्यारोपित केले जाते.साधारणत: रक्ताचा प्रवाह पूर्वव्रत झाल्यावर नवीन हृदय धडधड करायला लागते.रूग्णाच्या शरीराने नवीन अवयव स्वीकारला आहे की नाही,यावर देखरेख केली जाते.कालांतराने ही जोखीम कमी होते. जीवनशैली व आरोग्याबाबत दिलेल्या सूचना नीट पाळणे गरजेेचे असते.यामध्ये नियमित व्यायाम,समतोल आहार,तंबाखूजन्य पदार्थ टाळणे इत्यादींचा समावेश आहे.

दाता कोण असू शकतो

ज्या व्यक्तीला मेंदूमृत घोषित केले आहे व ज्याचे हृदय निरोगी आहे अशा व्यक्तीच्या कुटुंबाने संमती दिल्यास दाता बनू शकतो. भारतात अवयव प्रत्यारोपणाबाबत जागरूकता वाढविण्याची गरज आहे.यासाठी अवयवदानाशी निगडीत असलेले गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. अवयवदान केल्यास गरजूला काय फायदा होतो हे समजून सांगणे देखील गरजेचे आहे.

हृदय प्रत्यारोपणानंतर रूग्णाला आहाराची काळजी घेणे महत्त्वाचे असून आहार आणि व्यायाम यांमुळे योग्य प्रमाणात वजन नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.त्यामुळे उच्च रक्तदाब,हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या गुंतागुंत टाळता येऊ शकतात.

About Author

dr-supriya-puranik

Dr. Manoj Durairaj

Cardio-Thoracic Surgeon/ Heart Transplant Surgeon
Contact: 8806252525
Email – ask@sahyadrihospitals.com

  Appointment Form
  For a quick response to all your queries, do call us.

  Patient Feedback

  Emergency/Ambulance
  +91-88888 22222
  Emergency/Ambulance
  +91-88062 52525
  Call Now

  Generic selectors
  Exact matches only
  Search in title
  Search in content
  page
  post