Home > Blogs > Cardiac Surgery  > चार महिन्याच्या बाळाच्या हृदयात असलेले छिद्र बुजविण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये हायब्रिड प्रक्रिया

चार महिन्याच्या बाळाच्या हृदयात असलेले छिद्र बुजविण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये हायब्रिड प्रक्रिया

 • महाराष्ट्रात सर्वात लहान बाळांपैकी केलेली हायब्रिड प्रक्रिया.
 • हॉस्पिटल तर्फे निधी उभारण्यासाठी मदत.

पुणे जुलै 2021 : सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डेक्कन येथील डॉक्टरांच्या टीमने नुकतेच एका चार महिन्याच्या व 4.2 किलो वजन असलेल्या बाळाच्या हृदयातील छिद्र (व्हीएसडी क्लोजर) बुजविण्यासाठी हायब्रिड प्रक्रिया केली.

महाराष्ट्रात आतापर्यंत हायब्रिड प्रक्रिया केलेल्या सर्वांत लहान बाळांपैकी हे एक असून हे छिद्र बुजविण्यासाठी 12 मिमी मस्क्युलर व्हीएसडी उपकरण रोपित करण्यात आले.

(व्हेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट (व्हीएसडी) म्हणजे हृदयात असलेले छिद्र असून हृदयासंबंधी बाळांमध्ये जन्मजात आढळणारी ही सामान्य व्याधी आहे.हृदयाचे दोन कप्पे वेगळे करणार्‍या भिंतीमध्ये (सेप्टम) हे छिद्र आढळून येते.यामुळे हृदयातील रक्त हे डाव्या कप्प्यांमधून उजव्या कप्प्यांमध्ये जाऊ शकते.यामुळे प्राणवायूयुक्त रक्त आणि प्राणवायू कमी असलेले रक्त हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि बाळावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.)

यासंदर्भात बोलताना सह्याद्रि हॉस्पिटल्सचे हृदय शल्यविशारद डॉ.राजेश कौशिश आणि बाल हृदयरोग तज्ञ डॉ.पंकज सुगांवकर म्हणाले की,या चार महिने,15 दिवसाच्या बाळाला आपल्या आयुष्याच्या दहाव्या दिवशी हृदयामध्ये 10 मिमी छिद्र (मिड मस्क्युलर व्हीएसडी) असल्याचे निदान झाले.त्याचे आई वडील जेव्हा आमच्याकडे घेऊन आले तेव्हा त्याला सतत खोकला आणि सर्दीचा त्रास होत होता.या बाळाचे वजन 4.2 किलो होते आणि वजन वाढतही नव्हते.त्यावर काही औषधोपचार सुरू होते,मात्र त्याचा फारसा परिणाम दिसून येत नव्हता.

बाल हृदयरोग तज्ञ डॉ. पंकज सुगांवकर म्हणाले की,हृदयातील हे छिद्र बुजविणे गरजेचे होते आणि त्यामुळे आम्ही हायब्रिड तंत्राचा वापर निवडला.हायब्रिड तंत्रज्ञान हे अलीकडच्या काळात वापरले जाणारे प्रभावी तंत्रज्ञान असून यामध्ये हृदयशल्यविशारद व हृदयरोगतज्ञ एकमेकांशी सहयोग करून ही प्रक्रिया करतात.यामध्ये हृदयापर्यंत पोहचण्यासाठी प्रभावी प्रक्रिया केली जाते,पल्मनरी बायपासची गरज पडत नाही आणि इतर गुंतागुंतही टाळता येते.

हृदय शल्यविशारद डॉ.कौशिश यांनी स्टर्नोटॉमी ही प्रक्रिया केली.ज्यामुळे पुढील प्रक्रियेसाठी हृदयाच्या उजव्या कप्प्यापर्यंत पोहचता आले.त्यानंतरची उर्वरित प्रक्रिया ही गुंतागुंतीची होती,कारण यामध्ये या उपकरणाचे रोपण करावयाचे होते.हे रोपण डॉ.पंकज सुगांवकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या टीम तर्फे करण्यात आले.हृदयातील 10 मिमी चे हे छिद्र 12 मिमी मस्क्युलर व्हीएसडी उपकरण रोपण करून बुजविण्यात आले.हे रोपण करत असताना एपिकार्डिअल एको गायडन्सचा वापर करण्यात आला.ज्यामध्ये याबाबतीतील तज्ञांनी या छिद्र असलेल्या विशिष्ट जागेच्या प्रतिमा प्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांना उपलब्ध करून दिल्या.या प्रक्रियेतील दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे अशा प्रक्रियांमध्ये सामान्यपणे वापरल्या जाणार्‍या हार्ट लंग मशिनचा वापर न करता हृदय धडधडत असतानाच थेट प्रक्रिया करण्यात आली.प्रक्रिया झाल्यानंतर तीन तासांत बाळाला असलेले व्हेंटीलेशनचे साहाय्य काढून टाकण्यात आले आणि देखरेखीकरिता दोन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले.

सामान्यपणे वापरले जाणारे पर्क्युटेनियस व्हीएसडी उपकरण हे या प्रक्रियेमध्ये शक्य नव्हते कारण,याला लागणारे संरक्षक आवरण हे मोठे हवे होते.

डॉक्टरांच्या टीममध्ये सह्याद्रि हॉस्पिटल च्या बाल हृदयरोग तज्ञ डॉ. पंकज सुगांवकर, हृदय शल्यविशारद डॉ. राजेश कौशिश , ह्रदयरोग भूलतज्ञ डॉ.शंतनू शास्त्री,डॉ.सुहास सोनवणे आणि डॉ. प्रीती अडातेे, बालरोगचिकित्सक डॉ. प्रशांत खंडगवे आणि ऑपरेशन थिएटरमधील नर्सेस व सिस्टर्स आणि पोस्टऑपरेटिव्ह टीमचा समावेश होता.

बाळाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्याने प्रक्रियेसाठी लागणारा निधी उभारण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल डेक्कन युनिटमधील सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा महाजन व त्यांच्या टीमने मदत केली.

  Appointment Form
  For a quick response to all your queries, do call us.

  Patient Feedback

  Expert Doctors

  Emergency/Ambulance
  +91-88888 22222
  Emergency/Ambulance
  +91-88062 52525
  Call Now

  Generic selectors
  Exact matches only
  Search in title
  Search in content
  page
  post