Home > Blogs > Neonatology > हिवाळ्यात बाळांच्या त्वचेची काळजी

हिवाळ्यात बाळांच्या त्वचेची काळजी

हिवाळ्यात बाळांच्या त्वचेची काळजी

थंडी सुरू झाल्यानंतर कोरड्या,थंड हवेमुळे बाळांच्या त्वचेमध्ये बदल होण्यास सुरू होतो,त्वचा कोरडी व्हायला लागते.अशा वेळी त्यांच्या त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. बाळांची त्वचा ही प्रौढांपेक्षा अधिक नाजूक आणि संवेदनशील असते, ज्यामुळे त्यांच्या त्वचेतील ओलावा कमी होण्याची शक्यता अधिक असते. तसे पाहता नवजात बालकाची त्वचा ही प्रौढ व्यक्तीच्या त्वचेच्या तुलनेत 30 टक्के पातळ, कमी द्रव असलेली आणि कमी नैसर्गिक मॉइश्चरायझिंग घटक असलेली असते. थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडणे, अ‍ॅलर्जी आणि खाज सुटणे ही लक्षणे सामान्यत: दिसून येतात.

त्वचेचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी

बाळाच्या मालिश,आंघोळ किंवा अन्य गोष्टींसाठी पालकांनी मॉइश्चरायझिंग घटकांनी युक्त उत्पादने वापरणे आवश्यक आहे. ई जीवनसत्त्व, बी 5 जीवनसत्त्व,प्रथिने आणि तांदूळाचा अर्क अशा प्रकारच्या घटकांमुळे बाळाच्या त्वचेला सखोलरित्या पोषण मिळू शकते व त्यामुळे बाळाची त्वचा सौम्य होण्यास मदत होऊ शकते.

आंघोळ करताना जास्त गरम पाणी टाळा

आंघोळ हा बाळाच्या त्वचेच्या देखभालीशी निगडीत एक महत्त्वाचा भाग आहे.बराच वेळ, खूप गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा, कारण त्यामुळे बाळाची त्वचा कोरडी होऊ शकते. त्वचेतील ओलावा कमी करण्यासाठी कोमट पाण्याने आंघोळ करणे योग्य ठरू शकते, कारण पाण्याच्या संपर्कात आल्याने, विशेषत: गरम पाण्यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो व त्वचा कोेरडी होऊ शकते.

बाळाला स्पंजने पुसून आंघोळ घालणे हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच पीएच संतुलित, हायपोअलर्जेनिक आणि विशेषतः बाळाच्या नाजूक आणि संवेदनशील त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या सौम्य क्लीन्सर वापरू शकता.

बाळाच्या आंघोळीनंतर किंवा स्पंज नंतर तुमच्या बाळाला मॉइश्चरायझिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. त्वचा थोडीशी ओलसर असताना मॉइश्चरायझिंग लोशन लावणे चांगले असते. तांदळाचा अर्क आणि मिल्क प्रोटीन हे घटक असलेले सौम्य बेबी लोशन बाळाच्या त्वचेचे पोषण करण्यास मदत करते. अशा घटकांसह असणारे लोशन अत्यंत मऊ असतात आणि त्यात जीवनसत्त्व ई,बी 5 चे प्रमाण अधिक असते जे दिवसभर ओलावा टिकवून ठेवते.

बाळाच्या शरीरासाठी लोशन आणि चेहर्‍यासाठी क्रीम वापरणे खूप महत्त्वाचे आहे.थंड वातावरणात बाळाचे गाल लगेचच कोरडू पडू शकतात.क्रीम लावताना गोलाकार पध्दतीने लावा.बाळाच्या चेहरा सतत थंड हवा,वार्‍याच्या संपर्कात असतो, म्हणूनच बाळाला बाहेर नेण्याआधी व बाहेरून आल्यानंतर त्याला क्रीम लावणे गरजेेचे आहे.

डायपरमुळे येणार्‍या रॅशबाबत काळजी

थंडीच्या दिवसात बाळाला आपण अतिरिक्त कपडे घालतो आणि वारंवार डायपर बदलणे थोडे कठिण जाते.डायपरमुळे येणारे पुरळ व जळजळ टाळण्यासाठी मॉईश्‍चररायझरचे गुणधर्म असणारे व अल्कोहोलमुक्त तसेच साबणमुक्त वाईप्सने डायपरचा भाग स्वच्छ करावा.वेट डायपर्स नियमित अंतराने बदलले पाहिजे,कारण यामुळे संक्रमण होऊ शकते किंवा पुरळ उठू शकतात.

Have queries or concern ?

    त्वचेतील कोरडेपणा

    बाळाची त्वचा कोरडी असल्यास किंवा एक्झेमासारखी स्थिती असल्यास हिवाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. एक्झेमा किंवा कोरडेपणासारख्या स्थितीमुळे त्वचेतील संरक्षणात्मक अडथळा कमकुवत होतो. मॉईश्‍चरायझिंगचे गुणधर्म असलेल्या क्रीम्समुळे हा संरक्षणात्मक अडथळा कायम राहण्यास मदत होते आणि त्वचेला होणारे नुकसान टळू शकते आणि संक्रमणाचा धोका कमी होतो.

    About Author

      Book Appointment

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1186" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222