Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > Obstetrics And Gynaecology > Covid Vaccination and Pregnancy

Covid Vaccination and Pregnancy

covid-vaccination-and-pregnancy

आज कोव्हीड ला येऊन २ वर्ष झालीत आणि ३ लाटा तरीही पेशंटसना कोव्हीड लसीकरण व pregnancy बद्दल खूप शंका अन् मनात भीती आहे. चला तर आज हा प्रयत्न, तुमच्या मनातील शंका व भीती दूर करण्याचा –

प्रश्नोतरांच्या स्वरूपात !

 #1 – प्र: गर्भवती महिलांनी कोव्हीड लसीकरण घ्यायला हवेच का? 

उ: निश्चितच हो. तीव्र प्रकारचा कोव्हीड व त्यामुळे होणारे मृत्यु टाळण्यासाठी संपूर्ण कोव्हीड लसीकरण होणे अत्यंत महत्वाचे आहे.
#2 – प्र: गर्भवती महिलांनी ३रा डोस (Booster dose) घ्यायला हवा का?
उ: नक्कीच ! पहिले २ डोस होऊन ३ महिने पूर्ण  झाले असतील तर ३रा म्हणजे Booster डोस घ्यायलाच हवा. डेल्टा व ओमीक्राॅन पासुन संरक्षण मिळण्यासाठी Booster घेणे महत्त्वाचे आहे.

 

#3 – प्र: कोव्हीड लसीकरण गर्भवती महिलांसाठी व त्यांच्या गर्भातील बाळांसाठी सुरक्षित आहे का?
उ: कोव्हीड लसीकरण गर्भवती महिलांना तीव्र (severe) कोव्हीड पासून वाचवते तसेच लसीकरणामुळे आईच्या शरिरात तयार होणार्‍या Antibodies गर्भातील बाळांसाठी फायदेशीर ठरतात.

 

#4 – प्र: मी Pregnany Plan करत आहे, मी कोव्हीड लसीकरण करणे सुरक्षित आहे का?
उ: निश्चितच हो. कोव्हीड लसीकरण तुम्हाला गर्भावस्थेत तीव्र (severe) कोव्हीड पासून वाचवते.

 

#5 – प्र: मी Pregnancy Try करत आहे. माझा पहिला डोस झाला आहे, २ र्‍या डोससाठी मी माझी Planning Delay करु का?
उ: नाही. तुम्ही तुमचा डोस वेळेत पूर्ण करा तुम्ही गर्भवती असाल तरीही !

 

#6 – प्र: गर्भावस्थेच्या कोणत्या काळात कोव्हीड लसीकरण करणे सुरक्षित आहे? का?
उ: गर्भावस्थेच्या कुठल्याही तिमाही (Trimester) मध्ये तुम्ही तुमचे लसीकरण पूर्ण करू शकता.

 

#7 – प्र: माझी IVF treatment चालू असताना मी कोव्हीड लसीकरण घेऊ शकते का?
उ: निश्चितच ! कोव्हीड लसीकरणाने वंध्यत्व अथवा गर्भपात यांचा धोका वाढत नाही.

 

#8 – प्र: कोव्हीड लसीकरणानंतर गर्भावस्थेत घेतले जाणारे इतर लसीकरण घेता येते का?
उ: गर्भावस्थेत घेतले जाणारे इतर लसीकरण जसे की swine flu, tetanus and tDAP vaccine यांमध्ये १४ दिवसांचा किमान अवधी असावा .

 

#9 – प्र : मी स्तनपान करताना कोव्हीड लसीकरण घेऊ शकते का?
उ: निश्चित घेऊ शकता! लसीकरणामुळे आईच्या शरिरात तयार होणार्‍या Antibodies नवजात बालकांसाठी फायदेशीर ठरतात.

 

Have queries or concern ?

  About Author

  dr stock

  Dr. Manisha Kulkarni

  Consultanat Obstetrics & Gynecology
  Contact: +91 88888 22222
  Email – [email protected]

   Appointment Form

   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Expert Doctors

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222