Home > Blogs > Infectious Diseases > म्युकरमायकॉसिस – लक्षणांविषयी जागरुकता गरजेची

म्युकरमायकॉसिस – लक्षणांविषयी जागरुकता गरजेची

म्युकरमायकॉसिस–लक्षणांविषयी-जागरुकता-गरजेची

जर याचा फैलाव नाकाच्या पोकळीत किंवा सायनस मधून होत असेल, किंवा डोळ्यापर्यंत फैलाव झाला असेल तर खालील लक्षणांबाबत सतर्क राहावे.

  • चेहर्‍यावर एका बाजूला सूज येणे.
  • सतत प्रचंड प्रमाणात डोकं दुखणे.
  • नाकात घट्टपणा जाणवणे.
  • नाकातून घट्ट स्त्राव (शिंकरूनही साफ न करता येणारा).
  • नाकातून रक्तमिश्रित स्त्राव बाहेर येणे.
  • धूसर दृष्टी.
  • चेहरा व दातांमध्ये मुंग्या येणे.
  • पापणी न हलणे.
  • डोळे उघडणे अवघड जाणे.
  • ताप.
  • जर फुफ्फुसांवर परिणाम होत असेल तर खालील लक्षणे दिसून येतात.
  • खोकला.
  • श्वसनाचा त्रास.
  • छातीत दुखणे.

त्वचेवाटे जर या बुरशीने शरीरात प्रवेश केला असेल तर त्वचेवरील जखमेभोवती अतिरिक्त लालसरपणा,सूज,वेदना आणि पचनसंस्थेतील अवयवांवर परिणाम होत असेल तर मळमळणे,उलट्या होणे, ओटीपोटात दुखणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात.

Have queries or concern ?

    या लक्षणांबाबत कोणी जागरूक राहावे

    म्युकरमायकोसिस जरी सामान्यपणे आढळणारा रोग नसला तरी, सध्याच्या महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर लोकांना हा रोग झाल्याचे दिसून येत आहे. जे कोविड -१९ मधून बरे झाले आहेत आणि ज्यांना स्टिरॉइड्स औषधे दिली गेली आहेत, ज्यांनी अतिदक्षता विभागात काही काळ उपचार घेतले आहेत, ज्यांना मधुमेहसारखे सह्व्याधी आहेत अशा लोकांनी या लक्षणांबाबत जागरूक राहावे. अशा प्रत्येकालाच म्युकरमायकोसिसचा धोका असेलच असं नाही, पण ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती खूप कमी झाली आहे,त्यांना जोखीम असते.

    मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजार असलेल्या, स्टिरॉइड्स औषधांवर असलेल्या, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झालेल्या, भाजून किंवा इतर कारणांनी मोठी जखम झाली असलेले,किंवा प्रत्यारोपण झाल्यावर इम्युनोसप्रेसंट औषधांवर ( नवीन अवयवाचा स्वीकार व्हावा म्हणून रोगप्रतिकार शक्ती कमी करणारी औषधे ) असलेल्या रुग्णांनी देखील सतर्क राहावे .

    कोविड मधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकॉसिसची कुठलीही लक्षणे आढळल्यास लागेचच डॉक्टरांशी संपर्क करणे गरजेचे आहे. याचे निदान करण्यासाठी काही चाचण्यांचा सल्ला दिला जाऊ शकतो. यामध्ये डायग्नोस्टिक नेझल एन्डोस्कोपी चाचणीचा समावेश आहे. ही बुरशी जर नाक आणि नाकाच्या पोकळीमध्ये ( सायनसेस ) मध्ये खोलवर गेली असेल तर ही चाचणी उपयुक्त ठरते कारण याचे पारंपरिक नाकाच्या तपासणीमध्ये खोलवर गेलेली बुरशी दिसून येणे कठीण असते. याशिवाय नाक, नाकाची पोकळी, जबडा व मेंदूचा एमआरआय कॅांट्रास्ट व सिटी स्कॅन देखील निदानासाठी केला जाऊ शकतो. या निदानाच्या आधारावर उपचाराची दिशा व पद्धती ठरते.

    About Author

      Book Appointment

      For a quick response to all your queries, do call us.

      Patient Feedback

      Expert Doctors

      [dgbc_blog_carousel posts_number="4" type="3" include_categories="1238" show_excerpt_length="200" show_categories="off" show_author="off" show_date="off" show_more="on" read_more_text="Get An Appointment" show_items_xlarge="1" show_items_desktop="1" show_items_tablet="1" dot_nav="on" image_size="default_image" button_alignment="center" button_at_bottom="on" title_margin="16px||||false|false" meta_padding="||||false|false" admin_label="Divi Blog Carousel" module_id="doctors-crouser" _builder_version="4.9.3" _module_preset="default" header_font="|700|||||||" header_text_align="center" content_text_align="center" custom_padding="|30px||30px|false|true" hover_enabled="0" locked="off" sticky_enabled="0"][/dgbc_blog_carousel]
      Emergency/Ambulance
      +91-88888 22222
      Emergency/Ambulance
      +91-88062 52525
      Call Now: 88888 22222