Farmacia en línea Farmacia Ortega Martinez on los mejores precios de España. Farmacia del Centro Online pharmacy MJD Health Pharmacy with the best prices in Australia.

Home > Blogs > Infectious Diseases > म्युकरमायकॉसिस – महामारीत आणखी एक आव्हान

म्युकरमायकॉसिस – महामारीत आणखी एक आव्हान

पुरूषांमधील वंध्यत्व

एकीकडे संपूर्ण देश महामारी चा सामना करत असताना म्युकरमायकॉसिस हे एक नवीन आव्हान आपल्यासमोर उभे राहिले आहे. कोविड-१९ मधून बरे झालेल्या रुग्णांना एका कठीण आजाराच्या परिस्थितीतून बरे होता होता दुसर्‍या , जास्त त्रासदायक परिस्थितीत अडकल्याचा अनुभव येत आहे.या आजाराबाबत लोकांमध्ये पुरेशी जागरूकता आहे अशी परिस्थिती अजूनतरी दिसत नाही. शहरांबरोबर ग्रामीण भागातील लोकांना देखील म्युकरमायकोसिसचा सामना करावा लागत आहे. पण वेळेवर निदान व उपचार झाल्यास आपण यावर नक्कीच मात करू शकतो .निदान , व औषधोपचार रोगाच्या प्राथमिक अवस्थेत केले गेले नाहीत तर मात्र म्युकरमायकोसिसचे गंभीर परिणाम शरीरावर दिसून येतात. या रोगामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील चिंताजनक आहे.

म्युकरमायकोसिस हा दुर्मिळ बुरशीजन्य आजार हा म्युकोरेल्स या बुरशीच्या गटामुळे होतो. हे पर्यावरणात नैसर्गिकदृष्ट्या उपस्थित असतात (प्रामुख्याने हवेत , मातीत, उघड्यावरील ओलसर पदार्थ इ. ..). मात्र मानवी शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली कमकुवत झाली तर या बुरशीचा प्रभाव दिसायला लागतो.

बुरशीजन्य बीजाणू (स्पोअर्स)श्वासावाटे आत गेले तर याचा प्रभाव डोळे, सायनसेस व फुफ्फुसावर आणि कधी कधी मज्जासंस्थेवर देखील होऊ शकतो व संसर्गाचा धोका बळावू शकतो. याशिवाय हे बुरशीचे गट त्वचेला झालेल्या जखमेतून देखील शरीरात शिरकाव करू शकतात. हे बुरशीचे गट शरीरात अनुकूल ठिकाणी पोहोचल्यावर पेशींमध्ये स्थिर होतात. इथे या बुरशीच्या बीजाणूंची अंकुरण्याची प्रक्रिया सुरु होते. हे विध्वंसक रस तयार करतात ज्यामुळे उतींवर परिणाम होतो आणि वाढणार्‍या बुरशीला पोषण मिळते. नाक व डोळ्यामधील हाडांच्या पोकळ्या (सायनस)मेंदूची आवरणे (मेनिंजेस)शिरकाव करतात म्हणजेच इन्व्हेजिव होतात. कोव्हिडच्या रुग्णांमध्ये रक्तातील लोहघटक फेरीटीन वाढते जे या म्युकोरचे खाद्य असते ,म्यूकोरची वाढ रक्त वाहिन्यांच्या आतील भागातच होते ज्यायोगे वाहिन्या रक्तप्रवाहासाठी बंद होतात यामुळेच शरीराचा तो भाग निर्जीव होतो व त्या निर्जीव भागावर इतरही जीवजंतू वाढतात.

नाकात किंवा नाकातील पोकळीमध्ये वाढत असताना ते आजूबाजूच्या पेशी नष्ट करतात. तसेच येथील हाडे देखील नष्ट होतात. नाकातील आणि चेहर्‍यातील या अवयवांवर परिणाम केल्यावर ते डोळ्यातील खाचेत शिरकाव करू शकतात. असे झाल्यास डोळ्यात वेदना,डोळे फुगणे,दृष्टी जाणे, डोळे उघडणे अवघड जाणे असे गंभीर परिणाम दिसून येतात.कवटीच्या पोकळीत शिरल्यावर मात्र मुख्य रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम होतो आणि रक्तस्त्राव,पक्षाघात होऊन जीवाला धोका निर्माण होतो. याशिवाय हे बुरशीचे बीजाणू कधी कधी श्वसन संस्थेमध्ये खोलवर पोहोचू शकतात आणि फुफ्फुसातील वायुमार्गात आपला जम बसवतात. इथे ते झपाट्याने वाढत आणि उती नष्ट करत फुफ्फुसाच्या कार्यावर विपरीत परिणाम करतात. म्हणूनच म्युकरमायकोसिसच्या लक्षणांबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. शरीराच्या कुठल्या भागामध्ये या बुरशीचा फैलाव होतो आहे त्यानुसार याची लक्षणे दिसून येतात.

या लक्षणांबाबत कोणी जागरूक राहावे

म्युकरमायकोसिस जरी सामान्यपणे आढळणारा रोग नसला तरी, सध्याच्या महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर लोकांना हा रोग झाल्याचे दिसून येत आहे. जे कोविड -१९ मधून बरे झाले आहेत आणि ज्यांना स्टिरॉइड्स औषधे दिली गेली आहेत, ज्यांनी अतिदक्षता विभागात काही काळ उपचार घेतले आहेत, ज्यांना मधुमेहसारखे सह्व्याधी आहेत अशा लोकांनी या लक्षणांबाबत जागरूक राहावे. अशा प्रत्येकालाच म्युकरमायकोसिसचा धोका असेलच असं नाही, पण ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती खूप कमी झाली आहे,त्यांना जोखीम असते. मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजार असलेल्या, स्टिरॉइड्स औषधांवर असलेल्या, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झालेल्या, भाजून किंवा इतर कारणांनी मोठी जखम झाली असलेले,किंवा प्रत्यारोपण झाल्यावर इम्युनोसप्रेसंट औषधांवर ( नवीन अवयवाचा स्वीकार व्हावा म्हणून रोगप्रतिकार शक्ती कमी करणारी औषधे ) असलेल्या रुग्णांनी देखील सतर्क राहावे.

कोविड मधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकॉसिसची कुठलीही लक्षणे आढळल्यास लागेचच डॉक्टरांशी संपर्क करणे गरजेचे आहे. याचे निदान करण्यासाठी काही चाचण्यांचा सल्ला दिला जाऊ शकतो. यामध्ये डायग्नोस्टिक नेझल एन्डोस्कोपी चाचणीचा समावेश आहे. ही बुरशी जर नाक आणि नाकाच्या पोकळीमध्ये ( सायनसेस ) मध्ये खोलवर गेली असेल तर ही चाचणी उपयुक्त ठरते कारण याचे पारंपरिक नाकाच्या तपासणीमध्ये खोलवर गेलेली बुरशी दिसून येणे कठीण असते. याशिवाय नाक, नाकाची पोकळी, जबडा व मेंदूचा एमआरआय कॅांट्रास्ट व सिटी स्कॅन देखील निदानासाठी केला जाऊ शकतो. या निदानाच्या आधारावर उपचाराची दिशा व पद्धती ठरते.

Have queries or concern ?

  About Author

   Appointment Form

   For a quick response to all your queries, do call us.

   Patient Feedback

   Expert Doctors

   Emergency/Ambulance
   +91-88888 22222
   Emergency/Ambulance
   +91-88062 52525
   Call Now: 88888 22222